Breaking News

राज्यात पूरस्थितीमुळे DMER वैद्यकीय शिक्षण विभागाची गट-क परीक्षा पुढे ढकलली

🛑 राज्यात पूरस्थितीमुळे वैद्यकीय शिक्षण विभागाची गट-क परीक्षा पुढे ढकलली

सुधारित तारीख लवकरच जाहीर होणार – उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवावे

नागपूर, २६ सप्टेंबर: राज्यात अनेक भागांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखाली होणारी गट-क संवर्गातील पदभरती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही ऑनलाइन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा २९ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र, सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीमुळे ही परीक्षा तत्काळ स्थगित करण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. या परीद्वारे शासकीय वैद्यकीय आणि दंत महाविद्यालये व रुग्णालयांतील तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील रिक्त पदे भरली जाणार होती.

✅ परीक्षेची नवीन तारीख लवकरच

विभागाने कळवले आहे की, या परीक्षेची सुधारित तारीख लवकरच जाहीर केली जाईल.

 उमेदवारांसाठी सूचना

सर्व उमेदवारांनी परीक्षेसंबंधी अद्ययावत माहितीसाठी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://dmer.maharashtra.gov.in/ नियमितपणे भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


स्रोत: वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, महाराष्ट्र राज्य
दिनांक: २६ सप्टेंबर २०२५




No comments