MPSC संयुक्त पूर्व परीक्षा-२०२५ पुढे ढकलली
MPSC संयुक्त पूर्व परीक्षा-२०२५ पुढे ढकलली
अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे आयोगाचा निर्णय; सुधारित दिनांक ९ नोव्हेंबर जाहीर
नागपूर,ता.२६ : महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ने मोठा निर्णय घेतला आहे. २८ सप्टेंबर २०२५ रोजी होणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२५ आता पुढे ढकलण्यात आली असून, ही परीक्षा आता ९ नोव्हेंबर २०२५ रोजी घेतली जाणार आहे.
जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ अंतर्गत ही परीक्षा राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवरील ५२४ उपकेंद्रांवर पार पडणार होती. मात्र, राज्यातील अनेक भागांत गंभीर पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक गावांचा व तालुक्यांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे कोणताही उमेदवार परीक्षेपासून वंचित राहू नये, या उद्देशाने सामान्य प्रशासन विभागाने आयोगाला परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली होती.
या पार्श्वभूमीवर MPSC ने तात्काळ निर्णय घेत परीक्षा पुढे ढकलली असून, उमेदवारांना सुधारित वेळापत्रकानुसार तयारी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
गट-ब परीक्षेच्या दिनांकातही बदल होणार
९ नोव्हेंबर २०२५ रोजीच नियोजित असलेली महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२५ देखील पुढे ढकलण्यात येणार आहे. या परीक्षेची सुधारित तारीख आयोग लवकरच स्वतंत्र शुद्धिपत्रकाद्वारे जाहीर करणार आहे.
उमेदवारांसाठी सूचना
सर्व संबंधित उमेदवारांनी ही माहिती लक्षात घेऊन www.mpsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी भेट देत अद्ययावत माहिती घेणे आवश्यक आहे.
Maharashtra Civil Services Combined Preliminary Examination-2025
postponed
Commission's decision due to heavy rains and floods; Revised
date 09 November
Nagpur, 26: Maharashtra Civil Services Gazetted Combined Preliminary
Examination-2025 organized by Maharashtra Public Service Commission (MPSC) has
been postponed due to flood-related conditions and the Meteorological
Department's warning of heavy rains. As per advertisement number 012/2025, this
examination was to be conducted on 28th September, 2025 at 524 sub-centres
across 37 district centres in the state. However, due to floods in many
districts of the state, connectivity of villages and talukas has been lost. In
such a situation, the General Administration Department had requested the
Commission (dated September 26, 2025) to ensure that no candidate is deprived
of the examination. As per this request, the Commission has decided to postpone
the examination and this examination will now be held on November 09, 2025.
Change in the date of Group-B examination also As the revised date of
Maharashtra Civil Services Gazetted Combined Preliminary Examination-2025 has
been fixed as November 09, 2025, the date of Maharashtra Group-B (Non-Gazetted)
Services Combined Preliminary Examination-2025 scheduled on the same day will
also be changed.
The revised date of Group-B examination will be announced by the Commission
soon through a separate corrigendum. The Maharashtra Public Service Commission
has appealed to all the concerned candidates to take note of this and prepare
for the examination as per the revised date.
No comments