Breaking News

विशाखा विद्यालयातून चंचल लाऊत्रेने मारली बाजी!

 विशाखा विद्यालयातून चंचल लाऊत्रेने मारली बाजी!

नागपूर: शैक्षणिक क्षेत्रात आपल्या उत्कृष्टतेचा ठसा उमटवणाऱ्या विशाखा माध्यमिक विद्यालय हिंदी व भदंत महापंथ ज्युनिअर कॉलेज, बिनाकी ले-आऊट येथील  इयत्ता दहावीच्या (एसएससी) परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले आहे. शाळेचा निकाल तब्बल ९९% लागला असून  विद्यार्थिनी  चंचल लाऊत्रे हिने ९१% गुण मिळवून  शाळेतून अव्वल स्थान पटकावले आहे.

 तिच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श निर्माण झाला आहे. केवळ चंचलच नव्हे, तर तपस्या गेंद्र (८६%), चैतन्य मोहाडीकर (८५%), मीनाक्षी कोटले (८४%) यांनीही गुणवत्ता यादीत आपले स्थान निश्चित केले आहे. याशिवाय अर्शूनुमा खान (८३%), गोपाल अडील (७९%),जान्हवी कोसरे (७५%) यांच्यासह  शाळेतील तब्बल सात विद्यार्थ्यांनी प्रावीण्य प्राप्त यश संपादित केले. २८ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत बाजी मारली आहे. हे यश शिक्षकवृंदाच्या अथक प्रयत्नांमुळे आणि पालकांच्या सहकार्यामुळे शक्य झाले आहे असे मत विद्यालयाचे मुख्याध्यापक  प्रदीप जांगडे यांनी  व्यक्त केले. प्राविण्य प्राप्त गुणांबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक - पाटील सर, वासनिक मॅडम, तागडे मॅडम, जांभुळकर मॅडम, भावे सर, मेश्राम सर, वाहने सर, खोब्रागडे मॅडम, साखरे मॅडम उपस्थित होते आणि त्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Chanchal Lautre Emerges Victorious from Vishakha Vidyalaya!

Nagpur: Vishakha Madhyamik Vidyalaya Hindi & Bhadant Mahapanth Junior College, Binaki Layout, a prominent name in the educational sector, has achieved remarkable success in the Class X (SSC) examinations. The school recorded an impressive result of 99%, with its student, Chanchal Lautre, securing the top position in the school with 91% marks.

Her outstanding performance has set a benchmark for other students in the school. Not only Chanchal, but other students have also secured notable positions in the merit list, including Tapasya Gendra (86%), Chaitanya Mohadikar (85%), and Meenakshi Kotle (84%). Furthermore, Arshunuma Khan (83%), Gopal Adil (79%), and Janhavi Kosre (75%), along with a total of seven students from the school, have achieved success with distinction. Additionally, 28 students have passed in the first class.

The Principal of the school, Pradeep Jangde, expressed his opinion stating that this success was made possible due to the relentless efforts of the teaching staff and the cooperation of the parents. He heartily congratulated all the students who achieved distinction. On this occasion, all the teachers of the school - Patil Sir, Wasnik Madam, Tagde Madam, Jambhulkar Madam, Bhave Sir, Meshram Sir, Wahane Sir, Khobragade Madam, and Sakhare Madam - were present and congratulated the successful students.

No comments