Breaking News

विद्यार्थ्यांनी अनुभवली बॅलेट पेपरची निवडणूक प्रक्रिया

जाईबाई चौधरी ज्ञानपीठाचा  उपक्रम  शिक्षक झाले निवडणूक अधिकारी, विद्यार्थी मतदार  

अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी प्रत्यक्ष इलेक्शन बूथवर भेट देऊन उपस्थित विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले 
नागपुर : सदर येथील  जाईबाई चौधरी ज्ञानपीठ माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात  विद्यार्थ्यांकरिता प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया, इव्हीएम  मशीन उपलब्ध नसल्यामुळे प्रत्यक्ष बॅलेट पेपरने कशी होते व लोकसभा, विधानसभेचे निवडून आलेले प्रतिनिधि आपले मंत्रिमंडळ कसे बनवितात तसेच निवडणूक प्रक्रियेत सहभागी यंत्रणा प्रत्यक्ष कसे कार्य करते याचे प्रात्यक्षिक ३५० विद्यार्थ्यानी निवडणूक प्रक्रियेत भाग घेऊन सादर केला.  आम्हा भारताच्या लोकांचे मूलभूत हक्क, संविधानाच्या कलमा इत्यादी संबंधी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. हा शैक्षणिक प्रबोधनाचा प्रकल्प जेसीडीच्या संशोधन विभागातर्फे तयार करण्यात आला. आचार्य सुधाकर चौधरी, डायरेक्टर संशोधन विभाग जेसीडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या प्रकल्प उपक्रमात प्रमुख अतिथी, मार्गदर्शक वक्ते म्हणून  अतिरिक्त जिल्हाधिकारी  तुषार ठोंबरे, व पूज्य भिक्षुणि आयु. सुनीती (एल.एल.एम.), संचालिका प्रभा चौधरी आमंत्रित होत्या.  या प्रकल्पाचे प्रमुख  वैशिष्ट्ये  
होते की द्वितीय महापर्व आषाढ पौर्णिमेच्या सोबत भारतीय संविधांनावर आधारित या कार्यक्रमाची सुरुवात बौद्धकालीन नृत्याने करण्यात आली. त्यात प्रमुख नृत्यांगना आठव्या वर्गातील  तेजस्विनी निंबुरकर, सहयोगी विद्यार्थिनी होत्या. लोकशाही प्रशासन ही भारताला बौद्ध संस्कृतीची देन आहे. संविधानाची प्रास्ताविक, ध्वजावरील अशोकचक्र व भारताची मुद्रा त्याची साक्ष आहे. 
अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी प्रत्यक्ष इलेक्शन बूथवर भेट देऊन उपस्थित विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले व विद्यार्थ्यांना समजेल अश्या सोप्या भाषेत संविधानात्मक लोकशाही व निवडणूक प्रत्यक्ष प्रक्रिया समजावून सांगितली. 
निवडणुकीत सर्वात जास्त मते घेऊन आदर्श राजेश पवार (वर्ग 9 वा), तनुश्री विजय नेतनवार (वर्ग 12 वा कॉमर्स), सुजल सचिन मेश्राम (वर्ग 10 वा), कुशल निलेश निखाडे (वर्ग 10 वा) आणि ऋतुजा दिनेश खडसे (वर्ग 11वा कॉमर्स) यांनी निवडणूक जिंकून आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्या अर्शिया पठान, सूपरवायजर सुरेश सुखदेवे, प्रा. सुदत्त मेश्राम, प्रा.अनीता धारगावे, मुख्याध्यापिका प्राथमिक विभाग समाधानी वासनिक, पराग बनकर, बबीता भातकुलकर, अश्लेषा गमे, होमसिंग पवार, राजू धानोरे व सुचित्रा डंभारे तसेच शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी या निवडणुकीसाठी विशेष प्रयत्न केले. जिंकलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.


Students experienced the ballot paper election process
Activities of Jaibai Chaudhary Jnanpeeth; Teachers became election officers, students became voters

Nagpur: In Jaibai Chowdhury Jnanpith Secondary and Junior College, Sadar, 350 students demonstrated the actual election process for the students, how the actual ballot paper is conducted as the EVM machine is not available, and how the elected representatives of the Lok Sabha, Legislative Assembly form their cabinet and how the machinery involved in the election process actually works. Presented by participating in the process.
The students were given information about the fundamental rights of the people of India, articles of the constitution etc. This educational awareness project was prepared by the Research Department of JCD. Acharya Sudhakar Choudhary, Director Research Department JCD presided over this project activity as Chief Guest, Additional Collector Tushar Thombre as the guiding speaker, and Venerable Bhikshuni Ayu. Suniti (LL.M.), Director Prabha Chaudhary was invited. Key features of this project
 It was the second Mahaparva Ashadha Purnima that started the program based on Indian traditions with a Buddhist dance. The principal dancer was Tejaswini Nimburkar of Class VIII, associate student. Democratic governance is the gift of Buddhist culture to India. The Preamble of the Constitution, the Ashoka Chakra on the flag and the motto of India are its testimony. Additional Collector Tushar Thombre visited the actual election booth and asked questions to the present students and explained the constitutional democracy and actual election process in simple language that the students could understand. Adarsh ​​Rajesh Pawar (Class 9th), Tanushree Vijay Netanwar (Class 12th Commerce), Sujal Sachin Meshram (Class 10th), Kushal Nilesh Nikhade (Class 10th) and Rituja Dinesh Khadse (Class 11th Commerce) got maximum votes in the election. He expressed his happiness after winning the election. For the success of the program Principal Arshia Pathan, Supervisor Suresh Sukhadeve, Prof. Sudatta Meshram, Prof. Anita Dhargave, Headmistress Primary Section Sathadhi Wasnik, Parag Bankar, Babita Bhatkulkar, Ashlesha Game, Homsingh Pawar, Raju Dhanore and Suchitra Dambhare and every teacher of the school made special efforts for this election. The winning students were congratulated.





No comments