प्रश्नमंजुषा स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद
युथ फॉर रेवोल्युशन ग्रुपतर्फे प्रश्नमंजुषा
स्पर्धेचे आयोजन
नागपूर,ता. १७ : युथ फॉर रेवोल्युशन ग्रुपतर्फे क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महापुरुषांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन जरीपटका मिसळ ले आऊट येथील सेंट. रॉबेन पब्लिक स्कूलमध्ये करण्यात आले होते. शाळेच्या विद्यार्थांना महापुरुषांच्या जीवन चरित्रांची माहिती या स्पर्धांच्या माध्यमातून बाहेरच्या जगातील स्पर्धांचा सराव व्हावा, स्वतः विषयी आत्मविश्वास निर्माण व्हावा, तसेच स्वतःच्या आतील कलागुणांची ओळख व्हावी हा या स्पर्धेमागील उद्देश होता. प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला.
स्पर्धा अत्यंत चुरशीच्या झाल्या. सर्वच विद्यार्थ्यांनी स्वतः होऊन इंटरनेट व पुस्तकांद्वारे स्पर्धेच्या विषयांची माहिती गोळा करून स्पर्धेमध्ये रंगत आणली. सर्व विजेत्यांना युथ फॉर रेवोल्युशन ग्रुपतर्फे स्मृतीचिन्ह तसेच प्रमाणपत्र देण्यात येईल. बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन ७ जानेवारी २०२४ ला सायंकाळी ६ वाजता नारा रोड भीम चौक हाऊसिंग बोर्ड कॉलोनी येथील प्रज्ञाज्योती बुद्धविहारात करण्यात आले. स्पर्धांच्या यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका धनश्री बारसागडे, कोमल सोनकांबळे, नेहा मेश्राम, युथ फॉर रेवोल्युशन ग्रुपचे पदाधिकारी, जितेंद्र गायकवाड़, सागर बागडे़, प्रबोधनकार अजय कुमार, मच्छिद्र गायकवाड, अर्चना राऊत, डाँ.दक्षु रामटेके, दर्शना गायकवाड़, रितेश पालेकर, भूषण टेंभेकर, अंकित गायकवाड, लोकेश बनसोड, सचिन लांजेवार यांनी परिश्रम घेतले. शाळेचे सर्व विश्वस्त आणि चेअरमन यांनी देखील युथ फॉर रेवोल्युशनवर नेहमीच विश्वास दाखवला आहे. त्यांचे देखील आभार. सर्वात महत्वाचे म्हणजे शाळेचे सर्व विद्यार्थी ज्यांनी अभूतपूर्व प्रतिसाद देऊन ही स्पर्धा यशस्वी केली, त्यांचे देखील कौतुक आणि आभार.
प्रश्नमंजुषा स्पर्धेमुळे बाहेरच्या जगातील स्पर्धेचा सराव होते आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते अश्या स्पर्धा नेहमी होत राहिल्या पाहिजे
-काव्या मस्के, विद्यार्थी ब्लॉसम स्कुल
आजच्या मुलांना आपल्या आजी आजोबांच्या नावाचे विसर पडले आहे त्यामुळे अश्या स्पर्धेच्या माध्यमातून महापुरुषांचे विचार व त्यांच्या कार्यांची माहिती विदयार्थ्यांना होईल अत्यंत चांगला उपक्रम हे तरुण मंडळी राबवित आहेत.
-उमेश बन्सोड, पालक
प्रश्नमंजुषा स्पर्धा महापुरुषांचा विषयांवर आधारित असून आपल्या महापुरुषांनाचा इतिहास मुलांना कळ्यांस मदत तसेच त्यांचा बौद्धिक विकास होण्यास मदत होईल. अश्या उपक्रमासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा.
-धनश्री बरसागडे, मुख्याध्यापिका न्यू चैतन्य स्कुल
Spontaneous response of students to quiz competition
Organized by Youth for Revolution Group at St.Roben Public School
Nagpur, 17: On the occasion of the birth anniversary of Krantijyoti Savitribai Phule, Youth for Revolution Group organized a quiz competition based on the life of great men at St. Jaripatka Misal Lay Out. It was done in Robben Public School. The purpose behind this competition was to let the students of the school learn about the biographies of great men and practice the competitions in the outside world, build self-confidence and identify their own inner talents through these competitions. Students enthusiastically participated in the quiz competition.
The competition was fierce. All the students themselves collected information about the competition topics through internet and books and brought it to the competition. All the winners will be given mementos and certificates by Youth for Revolution Group. The prize distribution ceremony was organized on 7th January 2024 at 6 PM at Prajnajyoti Buddha Vihara, Nara Road Bhim Chowk Housing Board Colony. Headmistress Dhanshree Barsagde, Komal Sonkamble, Neha Meshram, Office bearers of Youth for Revolution Group, Jitendra Gaikwad, Sagar Bagde, Enlightener Ajay Kumar, Machhidra Gaikwad, Archana Raut, Dr. Dakshu Ramteke, Darshana Gaikwad, Ritesh Palekar, Bhushan Tembhekar, Ankit Gaikwad, Lokesh Bansod, Sachin Lanjewar worked hard. All the trustees and chairman of the school have also always shown faith in Youth for Revolution. Thanks to them too. Most importantly, appreciation and thanks to all the students of the school who made this competition a success with phenomenal response.
Quiz competitions should be held regularly to practice competition in the outside world and help build confidence
- Kavya Muske, Student Blossom School
Today's children have forgotten the names of their grandparents, so through such a competition, the students will get to know the thoughts and works of great men.
-Umesh Bansod, parent
The quiz competition is based on the subjects of great men and the history of our great men will help the children to develop their intellectual skills. Social organizations should take initiative for such activities.
- Dhanashree Barsagade, Headmistress New Chaitanya School
No comments