महाज्योतीने प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची संख्या केली कमी
नागपूर : महाज्योतीतर्फे विविध स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण दिले जातो. मात्र यावर्षीपासून या प्रशिक्षणार्थ्यांची संख्या महाज्योतीने कमी केले असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे सुरु उमटू लागले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभागअंतर्गत, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) संस्थेची स्थापना २०१९ मध्य करण्यात आली आहे. महाराष्ट राज्यातील इतर मागासवर्ग(ओबीसी) विमुक्त जाती( वीजे), भटक्या जाती(एनटी) व विशेष मागासप्रवर्ग (एसबीसी) विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, बँक, पोलिस भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण, अकरावी बारावीच्या विद्यार्थ्याकरीता सीईटी जेईई नीट, आणि यूजीसी नेट, एमबीए सीईटी कॅट प्रशिक्षण दिले जाते.
महाज्योतीतर्फे सुरवातील विविध स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षणासाठी अधिक जास्तीचे जागा होत्या. यामध्ये यूपीएससी (इंग्रजी) १५००, यूपीएससी (मराठी)१०००, एमपीएससी राज्यसेवा १५००, कम्बाइंड ग्रुप बी आणि सी १५०० अशा एकून ५५०० जागेसाठी प्रशिक्षण दिले जात असते. मात्र यंदा एक तृतीयांश जागा कपात करण्यात आली आहे. यूपीएससी इंग्रजी (५००), यूपीएससी(मराठी२५०) एमपीएससी राज्यसेवा (५००) एमपीएससी ग्रुप बी आणि सी (५००) अशा एकून १७५० जागा कपात केली.
विशेष असेकी ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी एमबीए प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची संख्या ५०० वरुन ७५० करण्याचा निर्णय घेतला असताना महाज्योतीने ही संख्या परत ५०० केली आहे. त्यामुळे अत्यंत कमी वर्षात प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची संख्या कमी करण्याच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे सुर हळूहळू उमटू लागले आहे. कमी झालेल्या
जागामुळे काही गरजू विद्यार्थी विद्यावेतनापासून वंचित राहणार आहे.
योजनांचे नाव सुधारीत कालावधी सुधारित मंजूर संख्या
यूपीएससी (इंग्रजी) ११ महिने १०००
यूपीएससी (मराठी) ११ महिने ७५०
एमपीएससी राज्यसेवा ११ महिने १०००
एमपीएससी गु्रप बी आणि सी ६ महिने ७५०
मिलिटरी ६ महिने ७५०
एमबीए सीईटी/कॅट ६ महिने ५००
कालावधी केला कमी
यूपीएससी आणि राज्यसेवासाठी १२ महिन्याचे प्रशिक्षण तर ग्रुप बी आणि सी साठी ८ महिन्याचे प्रशिक्षण दिले जात असे. यातही महाज्योतीने कालावधीत कपात केली आहे. यामध्ये यूपीएससी आणि राज्यसेवाचे प्रशिक्षण १२ महिन्यांवरुन ११ महिने आणि ग्रुप बी आणि सी चा कालावधी ६ महिने केली आहे.
Mahajyoti reduced the number of apprentices
-Training period also reduced by one month
Nagpur : Mahajyotirpeâ provides coaching for various competitive exams. But since Mahajyoti has reduced the number of these trainees from this year, displeasure has started to emerge among the students.
Mahatma Jyotiba Phule Research and Training Institute (Mahajyoti) has been established in 2019 under Other Backward Classes and Bahujan Welfare Department of Government of Maharashtra. Other Backward Classes (OBC), Scheduled Castes (VJ), Nomadic Castes (NT) and Special Backward Classes (SBC) students in the state of Maharashtra through Central Public Service Commission, Maharashtra Public Service Commission, Bank, Police Recruitment Exam Pre-Training, CET JEE NEET for Class XI-XII students, and UGC NET, MBA CET CAT training is provided.
Mahajyotirpeâ had more seats for training for various competitive examinations at the beginning. In this, UPSC (English) 1500, UPSC (Marathi) 1000, MPSC Rajyaseva 1500, Combined Group B and C 1500 are given training for a total of 5500 seats. But this year one third seat has been reduced. UPSC English (500), UPSC (Marathi 250) MPSC Rajyaseva (500) MPSC Group B and C (500) reduced 1750 seats in total.
Specially, while OBC Minister Atul Save decided to increase the number of MBA trainees from 500 to 750, Mahajyoti has reduced this number to 500. Therefore, the tone of displeasure among the students against the decision to reduce the number of trainees in a very short period of time has gradually started to rise. Due to reduced seats, some needy students will be deprived of tuition fees.
Name of Schemes Revised Period Revised Sanctioned No
UPSC (English) 11 months 1000
UPSC (Marathi) 11 months 750
MPSC State Service 11 Months 1000
MPSC Group B & C 6 months 750
Military 6 months 750
MBA CET/CAT 6 Months 500
Reduced duration
12 months training for UPSC and State Services and 8 months training for Group B and C. In this too, Mahajyoti has reduced the duration. In this, UPSC and State Services training has been reduced from 12 months to 11 months and group B and C training has been reduced to 6 months.
No comments