जाईबाई चौधरी ज्युनिअर कॉलेजची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम
![]() |
जेसीडीच्या यशस्वी विद्यार्थ्यांनसह शाळेचे शिक्षक वृंद |
नागपुर,ता. २५ : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक 2023 च्या निकाला जाहीर झाला असून पुन्हा जाईबाई चौधरी ज्ञानपीठ ज्युनिअर कॉलेजची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली. कॉलेजमध्ये कु. तक्षशिला धुरंधर हिने ९२% गुण मिळवून कला शाळेतुन व कॉलेजमधुन प्रथम क्रमांक मिळविला. कु. सलोनी खोब्रागडे ८८% गुण वाणिज्य शाळेत प्राप्त केले. गरीब व गरजु विदयार्थ्यासाठी १९२२ पासुन सतत शैक्षणिक पाठबळ देणारी जाईबाई चौधरी शाळा व कॉलेजमध्ये १६ विदयार्थ्यानी ७५% च्यावर गुण मिळवून परंपरा कायम राखली. अपर्णा इंगोले ८८%, तेजश्री सोनटक्के ८६ %, मंजिरी लक्कावार ८३ %, सुहानी सोनटक्के ८3%, उन्नती सोमकुवर ८२% संजना दोले ८१%, तनुश्री जनबंधु ८०%, प्रगती जनबंधु ८०%, सानिया आवळे ७९% आकांक्षा जितोने ७९% गुण मिळविले. संस्थेचे सचिव आचार्य सुधाकर चौधरी, संचालिका प्रभा चौधरी, जेसीडीच्या संचालिका डॉ. शिल्या पाझारे , प्राचार्या अर्शिया पठान, प्रा. सुदत्त मेश्राम, प्रा. रूया कोकाटे, प्रा. अनिता धारावे, प्रा. सुरेश सुखदेवे, प्रा. अंजली मैतुले यांनी यशस्वी विदयार्थ्याना शुभेच्छा दिल्या.
एन७ न्यूज व्हॉइसच्या प्रतिनिधी यांनी कुठल्या क्षेत्रात करिअर करायचे आहे असे विचारले असता सलोनी खोब्रागडे यांनी सांगितले की, लहान पनापासून आई वडिलांना कष्ट करताना बघितले..वडील प्लम्बीग, आई घरकाम करते.
त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे सोन करीत स्पर्धा परीक्षेची माध्यमातून मी बँक अधिकारी होईल. अशी इच्छा व्यक्त करीत यशाचे श्रेय आई वडील आणि शिकवृंद याना दिले.
शिकायला नको वय फक्त मनात हवी लय इच्छा : शुभांगी खुबाळकर
नागपूर,ता. २५ : शिकायला नको वय फक्त मनात हवी लय इच्छा हवी शिकण्याची नक्कीच होतो विजय नुकताच १२ बोर्डाचा निकाल जाहीर झाला. त्या शुभांगी गजेंद्र खुबाळकर हिने शाळेत नोकरी करून दोन मुलींचा सांभाळत १२ वीच्या परीक्षेत ५० टक्के मिळवून यश संपादित केल्याबद्दल तिचे शाळेत कौतुक होत आहे. सदर जाईबाई चौधरी ज्ञानपीठाच्या मदतनीस काम करणारी तसेच सावनेर खापा येथील मूळ रहिवाशी शुभांगी खुबाळकर यांचे कमी वयात लग्न झाले घरची परिस्थिती हलाखीची होती त्यामुळे पुढचे शिक्षण घेता आले नाही. शुभांगी म्हणाली मुलीही मोठ्या झाल्या एक मुलगी बी कॉम १ ला तर एक मुलगी ९ व्या वर्गात शिकत आहे. मुलींचे स्वप्न पूर्ण करता करता तिलाहि असे वाटले कि आपण का नाही आपले पुढचे शिक्षण पूर्ण करावे. तिने जाईबाई चौधरी ज्ञानपीठ महाविद्यालयाचे संचालक आचार्य सुधाकर चौधरी यांच्याकडे शिकण्याची इच्छा व्यक्त केली. चौधरी यांनी आपल्या शाळेत मदतनीस कामाला ठेवले. कमवा आणि शिका या माध्यमातून प्रवृत्त केले. पुढील शिक्षक शिकण्यासाठी शाळेतील शिक्षक व मुलीची मोठी साथ मिळाली. शुभांगीने १२ वी पासचे श्रेय आपल्या शिक्षण संस्थेच्या शिक्षक व मुलीला दिले आहे. तिच्या यशाबद्दल शाळेच्या सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी तिला पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
Jaibai Chaudhary Junior College's tradition of hundred percent results continues
Nagpur, 25: Maharashtra State Higher Secondary Result 2023 has been declared and once again Jaibai Chaudhary Jnanpith Junior College has maintained the tradition of hundred percent results. In college Ms. Taxila Dhurandhar secured 92% marks and stood first in art school and college. Mrs. Saloni Khobragade secured 88% marks in commerce school. Jaibai Chaudhary School and College, which has been providing continuous educational support to poor and needy students since 1922, maintained the tradition with 16 students scoring above 75% marks. Aparna Ingole 88%, Tejashree Sontakke 86%, Manjiri Lakkawar 83%, Suhani Sontakke 83%, Unnati Somkuvar 82% Sanjana Dole 81%, Tanushree Janbandhu 80%, Pragati Janbandhu 80%, Sania Awle 79% Akanksha Jito scored 79%. Secretary of the organization Acharya Sudhakar Chaudhary, Director Prabha Chaudhary, Director of JCD Dr. Shilya Pazar, Principal Arshia Pathan, Prof. Sudatta Meshram, Prof. Ruya Kokate, Prof. Anita Dharave, Prof. Suresh Sukhadeve, Prof. Anjali Maitule congratulated the successful students.
When N7 News Voice representative asked her in which field she wants to pursue her career, Saloni Khobragade said that since childhood she saw her parents working hard.
I will become a bank officer through the competitive examination as a reward for his hard work. Expressing such desire, I attributed the success to my parents and students.
Age should not be learned, only heart needs rhythm and desire: Shubhangi Khubalkar
Nagpur, 25 : Don't need to learn age just want rhythm in mind want to want to learn surely win 12th board result was announced recently. That Shubhangi Gajendra Khubalkar is being appreciated in the school for securing 50% in the 12th exam after working in the school and taking care of two daughters. Sadar Jaibai Chaudhary, who worked as a helper of Jnanpeeth and also a native of Savner Khapa, Shubhangi Khubalkar was married at a young age. Shubhangi said the girls have also grown up, one girl is studying in B Com 1st and one girl is studying in 9th standard. While fulfilling the dreams of girls, she also felt that why not we should complete our further education. She expressed her desire to study with Acharya Sudhakar Chaudhary, Director of Jaibai Chaudhary Jnanpeeth College. Chowdhury employed helpers in his school. Motivated through earn and learn. The school teacher and girl got great support to learn the next teacher. Shubhangi credits her 12th pass to her teacher and daughter. For her success, all the teachers and staff of the school wished her all the best for her future studies.
No comments