Breaking News

झाडासारखे जगा खूप उंच व्हा पण जीवन देणाऱ्या मातेला विसरू नका


वेदार्या कॉलोनीत  रमाई आंबेडकर यांना अभिवादन

त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांना अभिवादन करतांना मान्यवर 

नागपूर,ता. २७ : झाडासारखे जगा खूप उंच व्हा पण जीवन देणाऱ्या मातेला विसरू नका या घोष वाक्यातून त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर 
यांच्या ८८ व्या  स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. नारी रोड,राजगृह नगर वेदार्या कॉलोनी येथे युथ फॉर रिवोल्युशन ग्रुपतर्फे माता रमाई आंबेडकर यांच्या  प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून  अभिवादन केले. बाबासाहेबांनी नऊ कोटीच्या उद्धारासाठी घराकडे दुर्लक्ष केले. म्हणून आज कित्येक लोकांचे घराकडे  सुलक्ष्य लागले. बाबासाहेबांनी घर प्रपंचात  जर लक्ष दिले असते, रमाईस सूखी ठेवले असते. त्यांनी मानवाचे दु:ख पुसण्याचे कार्य केले. बाबासाहेबांना रमाईनी मानव मुक्तीच्या  कार्यापासून कधीही रोखले नाही.त्यामुळे माता रमाई  यांच्या विचार आजच्या महिलांनी आत्मसात करायाला पाहिजे असे मत मंजू सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.   विकास टाकसांडे यांनी लिहिलेली  ' साहेबांशी बोले रमाई हे अश्रू पुसावे, मांडी वर्ती तुम्हच्या साहेब माझे प्राण जावे '  ही कविता युवा प्रबोधनकार अजयकुमार आपल्या सुरेल आवाजात यांनी सादर करीत त्यागमूर्ती माता रमाई यांना अभिवादन केले.
    यावेळी  कार्यक्रमाला युथ फ़ॉर रिवोल्यूशनच्या डॉ. दक्षु रामटेके, अर्चना राऊत, नैना मेश्राम, लीलाबाई गायकवाड़, युवा प्रबोधनकार अजयकुमार, जितेंद्र गायकवाड़, महेंद्र सूर्यवंशी, ललित गौरेकर , विकास सूर्यवंशी, सुबोध सूर्यवंशी, राजेंद्र भगत, भूमिका भगत ,सोनिया भगत, समृद्धि गायकवाड, दर्शना गायकवाड उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन अतुल देशभ्रतार यांनी केले. आभार जितेंद्र गायकवाड यांनी मानले.







No comments