Breaking News

नागपुरात पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांचा सत्कार : N7 News Voice

 पद्मश्री पुरस्कार झाडीपट्टीतील रसिक

 प्रेक्षकांना समर्पित : डॉ. खुणे


 पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांचा स्वागत करताना  झिरो माईल युथ फाउंडेशनचे पदाधिकारी
नागपूर,ता.८ : राष्ट्रपती भवनात नुकताच पार पडलेल्या पद्म पुरस्कार सोहळ्यात विदर्भातील झाडीपट्टीच्या रंगभूमीवरील रसिकप्रिय कलाकार व "झाडीपट्टीतील दादा कोंडके" म्हणून ओळखले जाणारे डॉ.परशुराम खुणे यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर ते पहिल्यांदाच नागपुरात आले असतांना त्यांचे स्वागत व सत्कार झिरो माईल युथ फाउंडेशनतर्फे करण्यात आला.
डॉ.परशुराम कोमाजी खुणे हे गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील गुरनोली येथील रहिवासी असून त्यांनी कला (नाट्य) क्षेत्रात ५००० हून अधिक नाटकांच्या कार्यक्रमांमध्ये ८०० वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. ते गेल्या ५० वर्षापासून झाडीपट्टीच्या रंगभूमीवर रसिकप्रिय विनोदी नट आहेत. आजपर्यंत झाडीपट्टीच्या रंगभूमीवर त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. विशेषता "झाडीपट्टीतील दादा कोंडके" अशीही त्यांची ख्याती आहे. ते १५ वर्षे गुरनुलीचे सरपंच व ५ वर्षे उपसरपंच होते. १० वर्षांपासून झाडीपट्टी कला मंचचे ते अध्यक्ष असून अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यही करीत आहेत. त्यांना १९९१ ला महाराष्ट्र शासनाचा शेतीनिष्ठ पुरस्कार, १९९२ ला जादूगार सुनील भवसार स्मृती पुरस्कार, १९९५ ला श्यामराव बापू प्रतिष्ठानच्या कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

 भारत सरकार कडून त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला असून तो पुरस्कार त्यांनी झाडीपट्टीतील सर्व रसिक प्रेक्षकांना समर्पित केला. पुरस्कार मिळाल्यानंतर पहिल्यांदाच नागपुरात आगमन झाले असतांना झिरो माईल युथ फाउंडेशनच्या कार्यालयात डॉ खुणे यांचा सत्कार करण्यात आला, मार्गदर्शन करतांना डॉ.खुणे यांनी त्यांचा प्रवास, नाटकांचे रंजक किस्से व झाडीपट्टी रंगभूमीबद्दलची माहिती सांगितली यावेळी झिरो माईल युथ फाउंडेशनचे डॉ समय बनसोड, प्रशांत कुकडे, कल्याण देशपांडे,वैभव बावनकर, तृप्ती गिऱ्हे,डॉ.सौरभ निमकर,डॉ किशोर नैताम, डॉ सुशांत चिमनकर, डॉ.सौरभ मोहोड, नागपुर विद्यापीठाचे सिनेट सदस्य सुनील फुडके व डॉ.किशोर इंगळे इत्यादी उपस्थित होते.


Padma Shri Award dedicated to the fans of Zadipatti: Dr.khune

Nagpur, 8  : Dr. Parashuram Khune, who is known as "Zadipatti Dada Kondke" popular artist of Vidarbha's bush theater, was awarded Padma Shri by President Draupadi Murmu at the Padma Award ceremony held recently at Rashtrapati Bhavan. When he came to Nagpur for the first time after receiving the award, he was welcomed and felicitated by the Zero Mile Youth Foundation.
   Dr. Parashuram Komaji Khune is a resident of Gurnoli in Kurkheda Taluka of Gadchiroli District and has played 800 different roles in more than 5000 plays in the field of art (drama). He has been a well-loved comedy nut on the grassroots stage for the past 50 years. Till date, he has played various roles on the stage of Zadhipatti. It is also known as the specialty "Dada Kondke in the bush". He was Sarpanch of Gurnuli for 15 years and Deputy Sarpanch for 5 years. He is the president of Zadipatti Kala Manch for 10 years and is also doing the work of eradicating superstitions. He has been honored with Maharashtra Govt.'s Agricultural Excellence Award in 1991, Magician Sunil Bhavsar Memorial Award in 1992, Kala Gaurav Award by Shyam Rao Bapu Pratishthan in 1995.

  Now he has been given the Padma Shri award by the Government of India and he dedicated that award to all the fans in Jadipatti. Dr. Khune was felicitated at the office of Zero Mile Youth Foundation when he arrived in Nagpur for the first time after receiving the award, while guiding Dr. Khune told about his journey, interesting stories of plays and Zadipatti theater. , Vaibhav Bavankar, Tripti Girhe, Dr. Saurabh Nimkar, Dr. Kishore Naitam, Dr. Sushant Chimankar, Dr. Saurabh Mohod, Nagpur University Senate Member Sunil Fudke and Dr. Kishore Ingle etc. were present.


No comments