Breaking News

डॉ बाबासाहेब आंबडेकर आधुनिक भारताचे निर्माणकर्ते : N7 News Voice

 डॉ बाबासाहेब आंबडेकर आधुनिक भारताचे निर्माणकर्ते

एन७ न्यूज व्हॉइस :  
नागपूर : बाबासाहेबांचे व्यक्तिमत्त्व हे विद्वत्ता, त्याग, साहस, निर्धार यांनी परिपूर्ण होते. बाबासाहेब कोणत्याही समाजाचे , गटाचे नेते नव्हते तर  ते  प्रथम भारतीय होते व आधुनिक भारताचे निर्माणकर्ते होते. परंतु, आपण त्यांना अजूनही ओळखू शकलो नाही, हे आपल्या देशाचे दुर्भाग्य म्हणावे लागेल. वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था, भेदभाव, कर्मकांड, बुवाबाजी, अंधश्रद्धा यांनी बरबटलेल्या समाजाला ज्ञानाचा सूर्य दाखवण्याचे कार्य बाबासाहेबांनी केले. ज्या दिवशी भारताला बाबासाहेब कळतील त्यांची विचारसरणी समजेल तेव्हा  आपली संकुचित भावना दूर होईल व बाबासाहेबांना भारत देश आपला रोल मॉडेल समजेल तो दिवस भारताचा संपूर्ण विकासाचा असेल; कारण ती स्वतंत्र विचारसरणी असेल. समानतेची व एकतेची शक्ती असेल. कोणताही भेदभाव, धर्म, जात, पंथ राहणार नाही व  भारत एक विश्‍व शक्ती असेल.  भारतीय घटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १३२ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन . बाबासाहेबांच्या  जयंतीनिमित्त नागपूर शहरातील उपासक उपासिका यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.  

                                          बाबासाहेबांच्या  कर्तृत्वापुढे नतमस्तक : 
आकाश कुर्वे
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित, पीडित व शोषितांसाठी कार्य केले. शिक्षणाशिवाय कोणताही समाज प्रगती करू शकत नाही; म्हणून त्यांनी शिका आणि संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा संदेश देत शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पिनार तो   गुरगुरल्या शिवाय राहणार नाही असे सांगितले.  प्रत्येक घटकातील लोकांना शिक्षणाचे महत्त्व  डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या संघर्षमय जीवनाच्या आदर्शातून  समजावून सांगितले पाहिजे.  "पुस्तक दान एक महादान " एक वही एक पेन" बौद्ध  विहारात वाचनालय  अश्या उपक्रमातून  सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन  गरजू विद्यार्थ्यांपर्यन्त  बाबासाहेबांचे विचार एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहचून त्याच्या  कर्तृत्वापुढे नतमस्तक  होऊन  अभिवादन  करायला  पाहिजे. 

-  आकाश कुर्वे, ट्रेन व्यवस्थापक, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे   


डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्त्रीमुक्तीचे जनक 

डॉ. दक्षु रामटेके
बाबासाहेब आंबेडकरानी राज्यघटना लिहिली. या राज्यघटनेमुळेच आज सर्व धर्म व पंथाच्या व्यक्तीला सन्मान मिळाला. या संविधानामुळेच सर्वांनाच समान हक्क मिळाले, भेदभाव दूर झाला. यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्माते आहे . डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्त्रीमुक्तीचे जनक होते . त्यांच्यावर तथागत गौतम बुद्धांच्या शिकवणुकीचा आणि महात्मा जोतिबा फुलेंच्या कार्याचा प्रभाव होता. बाबासाहेबांच्या मते कोणत्याही समाजाचे मूल्यमापन त्या समाजातल्या स्त्रियांची परिस्थिती कशी आहे, यावरून करता येते. समाजाने स्त्रियांच्या विकासाकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याची त्यांची आग्रही भूमिका होती. ही समग्र प्रगती केवळ पुरुषांचीच नव्हे, तर स्त्रियांची देखील होणे गरजेचे आहे, हे भान त्यांना विद्यार्थिदशेतच आले होते. ते स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते.
 -डॉ. दक्षु रामटेके,  दक्षु नेचर हेल्थ केयर सेंटर, समतानगर

 
विद्यार्थ्यांनी राजकारणापासून लांब राहावे 
  
अनिल टेंभुर्णे
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचा स्वतंत्र, समता , बंधुता या तीन मुल्यांवर त्यांचा विश्वास होता. विद्यार्थीदशेत केवळ अध्ययनावरच विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि राजकारणापासून लांब राहण्याचा सल्ला त्यांनी नवयुवकांना दिले. राजकारणात शिक्षण पूर्ण झाल्यावरच उतरता येते. पण शिक्षणाची संधी पुन्हा : पुन्हा मिळत नाही.बाबासाहेब स्वतः एक आदर्श विद्यार्थी होते. बाबासाहेबांच्या  जयंती दिनी त्यांचे स्मरण करीत साहित्याचे वाचन करावे तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन आचरणात आणण्याची शपथ घ्यावी.
 
अनिल टेंभुर्णे ,मुख्याध्यापक,  नागसेन विद्यालय कामठी रोड 
-----------------------------------
 बाबासाहेबांना  रोषणाईतून अभिवादन  

बाबा बोरकर
भारतीय घटनेचे  शिल्पकार  डॉ. बाबासाहेब आंबडेकर  यांनी  भारतीय  राज्यघटना  लिहून  आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला अश्या  महामावाची   मोठी प्रतिमा  उभारून  रोषणाई करून साजरी  केली  पाहिजे.  उत्तर नागपुरातील  जरीपटका भीम चौक येथे  १५ वर्षा पासून  बाबा डेकोरेशनच्यावतीने  भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना  "डीजे लाईट शो" च्या रोषणाईतून  अभिवादन  करण्यात येते. हे बघण्यासाठी  विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून   उपासक  उपासिका  मोठ्या संख्येने येतात.  हा दिवस लहाना शेक्षणिक भेट वस्तू देऊन मोठ्या उत्साहात डॉ.बाबासाहेब यांनी १३२ वी जयंती नागरिकांनी साजरी करावी. बाबासाहेबांना तीच खरी मानवंदना.

-बाबा बोरकर, बाबा डेकोरेशन, जरीपटका नागपूर  

युगप्रवर्तक  अर्थशास्त्रज्ञ  बाबासाहेबांचं 

कोमल राऊत
जगातला एकमेव व्यक्ती,ज्याने रक्ताचा एक थेंब सुद्धा न सांडवता,आपल्या लेखणीच्या बळावर,सामाजिक, राजनीतिक, धार्मिक,अशा अनेक प्रकारच्या क्रांती घडवून आणली,अशा महान युगप्रवर्तक क्रांतिकारक, महान अर्थशास्त्रज्ञ,तसेच जगात भारताची मान आदराने उंचावणारे,विश्वरत्न राष्ट्रनिर्माते, प्रज्ञासूर्य, बोधिसत्व, महामानव,जगातील आदर्श राज्यघटनाकार,भारतरत्न,डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांची आज जयंती.आंबेडकरांनी समाजाला  शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले त्यांनी शिक्षण हे वाघीणीचो दूध आहे आणि जो ते प्राषण करेल तो वाघासारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.त्यांनी स्त्रियांना समाजात मानाचे स्थान मिळवून दिले तसेच समानतेचा अधीकार सुद्धा मिळवून दिला त्यामुळे स्त्रियांची आज  सर्वच क्षेत्रात उन्नती झाली
- कोमल राऊत,संचालिका / समन्वयक , कनिष्का  पब्लीसिटी मल्टिपल सर्व्हिसेस नागपूर  

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व


उत्पलचंद्र थोरात

आजही देशवासियांसाठी आदर्श ,मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरलेला आहे असे या थोर महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संपूर्ण जगात साजरी केली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक ,राजकीय, आर्थिक, शैक्षणिक ,धार्मिक ,पत्रकारिता ,कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने आंबेडकर यांनी दीन दलितांच्या श्रमिकांच्या, विद्यापीठांच्या शोषितांच्या, अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना शिका व संघटित व्हा असा संदेश दिला.

- उत्पलचंद्र थोरात, व्यवस्थापक, एस. बी आय बँक



डॉ.बाबासाहेब आंबेडकर आर्थिक सल्लगार
नलू  विलास भिमटे


च्च विदेशी शिक्षा प्राप्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अर्थशास्त्र विषयात मोठी  आवड होती. त्यामुळेत्यानी आपली प्रथम पदवी अर्थशास्त्र या विषयात पूर्ण करून मुंबईतील बड्या उद्योगपतींना आर्थिक सल्ला देण्यासाठी  'स्टॅक्स अँड अॅडव्हायझर्स' नावाची कंपनी १९१७ ला सुरू  केली. आज तिला १०६ वर्ष पूर्ण झाली. देशातील पाहिले शेर मार्केट  सल्ल्यागार बाबासाहेबच होते.त्यामुळे तरुणांनी नोरकरीच्या मागे न धावता स्वतःचा व्यवसाय सुरू  करायला पाहिजे हीच बाबासाहेबांना खरी मानवंदना.

-नलू  विलास भिमटे ,  पी.वी. आर. फायनानसिअल सर्वेसेस, आराधना कॉलनी नारा रोड नागपूर  


महिलांना घटनेने दिला अधिकार 

राकेश निकोसे
शिक्षण हेच विकासाचे जगमान्य साधन आहे, हे सिद्ध झाले. शिक्षणाचा अभाव धार्मिक गुलामगिरी, रूढी परंपरांमुळेच भारतीय महिला अंधश्रद्धेच्या आहारी गेल्या व मागास राहिल्या. आज महिलांची उत्तम स्थिती व विकासासाठी महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, सावित्रीबाई फुले यांचे संघर्ष व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना घटनेत दिलेले अधिकार, सुरक्षा व आरक्षण हेच मुख्य कारण आहेत.  बाबासाहेबांच्या नावाचा १३२ किलो  केक आणि १३२ किलो  गुलाबाचा पुष्पहार अर्पण करून  तसेच लहान मुलींना  वही पेन पुस्तके वाटप करून जयंती साजरी करणार आहे. 

-राकेश निकोसे , सामाजिक कार्यकर्ता , कल्पना नगर 



सुजाता रंगारी

बाबासाहेब अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी

डॉ. आंबेडकरांचे कार्य हे आधुनिक भारताच्या निर्मितीचे आहे.दलित, शोषितांचे कैवारी करिता ते अभ्यासक बनून लढले हे लक्षात घेतले पाहिजे. डॉ. आंबेडकरांचे योगदान हे भारतातील प्रत्येक क्षेत्रात आणि प्रत्येक समाज घटकांसाठी राहिलेलं आहे.परंतू त्यांच्या कार्यामागे एकच महत्वाचा उद्देश राहिलेला आहे.तो म्हणजे देशातील जाती व्यवस्था संपुष्टात आणणे.कारण जाती व्यवस्थाच या देशातील सर्व समस्यांची जननी आहे. आंबेडकरांसारख्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे विविध पैलू प्रत्येकाने समजून घेणे गरजेचे आहे.

- सुजाता रंगारी, समाजसेविका नागपूर

----------------------------

महिलांच्या अस्तित्वासाठी संघर्षमय लढा
स्मिता  पाटील


डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांच्या अस्तित्वासाठी संघर्षमय लढा दिला.महिलांच्या प्रगतीवर समाजाच्या प्रगतीचे मूल्यमापन होतं असते असे बाबासाहेबांचे ठाम मत होते म्हणूनच "हिंदु कोड बिल" पारित न झाल्यामुळे या महामानवाने मंत्रिपदाचा त्याग देखील केला महिलांना समानतेचा दर्जा प्राप्त करून देणारे संविधानकार बाबासाहेब आहेत.महिलांनी आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा सदुपयोग करून समाजात, घरदारात, शैक्षणिक,सांस्कृतिक,धार्मिक, कार्यात आपला ठसा उमटवायलाच हवा.तसेच येणाऱ्या नवीन पिढीला बाबासाहेबांच्या विचाराचे महत्व समजून देने हे प्रत्येक आईचे कर्तव्य आहे. असे केल्यास मोबाईल सारख्या  व्यसनाधीन झालेल्या पिढीच्या हातात पुनःपुस्तक येतील आणि वाचाल तर वाचाल हा बाबासाहेबांचा विचार यशस्वी होण्यास मदत होईल.

-स्मिता पवन  पाटील , मुंबई 

शिक्षण  परिवर्तनाचे प्रभावी शास्त्र

ज्ञानोबा केंद्रे
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शास्त्र आहे शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्काची जाणीव होते समाजातील अस्पृश्य समाजाला सत्वाची जाणीव व्हावी यासाठी त्यांनी शिक्षणाचे  महत्व समजत विषद केले. शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे सांगत असे समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे त्यामुले व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो. जर समाजाची आणि देशाची प्रगती करायची असेल आणि एक चांगला समाज घडवायचा असेल तर शिक्षणा विना दुसरा कोणताच उत्तम पर्याय नाही.

ज्ञानोबा केंद्रे , मुख्याध्यापक , महालक्ष्मी विद्यालय पंचशील नागपूर 

--------------------------------
शिक्षणाला वाघिणीचे दुध 

जितेंद्र गायकवाड
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला वाघीनेचे दुध संबोधिले आजच्या विद्यार्थ्यामध्ये तीच शिकवण रुजविणे गरजेचे आहे बाब्साहेबांनी शोषित वंचितांच्या उद्धारासाठी 
आपले संपूर्ण आयुष्य वेचले त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपणही पीडितांच्या उत्थानाचा विडा उचलला पाहिजे १४ एप्रिल बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त 
आज शहरात सर्वत्र कार्यक्रम, मिरवणूक, भोजनदान,आदींचे आयोजन केले आहे.परंतु निव्वळ आनंद साजरा न करता बाबासाहेबांचे विचार कृतीत उतरवून, समाजजागृती 
करण्याचे काम आपण केले पाहिजे. प्रत्येक नागरिकाने बाबासाहेबांचे विचार आत्मसात करुन्कारून कार्य केले तर नक्कीच देशविकासात मोठा हातभार लागेल.
जितेंद्र गायकवाड, युथ फॉर रिवोल्यूशन, नागपूर  

जगभर  बाबासाहेबांच्या कार्याचा  डंका  

 किरण चंद्रिकापुरे,
बाबासाहेबांचे कार्य समाजाला कदापि विसरता येणार नाही. त्यांची ख्याती केवळ देशात नव्हे तर जगभर आहे. आज केवळ भारतात नव्हे तर जगात अनेक ठिकाणी बाबासाहेबांचे पुतळे आहेत. यातून त्यांचे कार्य किती मोठे होते, याची प्रचिती येते. 'जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या.या दोन गोष्टी असल्या तर जग जिंकता येते,' अशी शिकवण बाबासाहेबांनी दिली. आज त्यांच्या याच शिकवणीचा अवलंब करण्याची वेळ आली आहे.

- किरण चंद्रिकापुरे, बाबा फरीद नगर , कोराडी रोड नागपूर 

बाबासाहेबांनी दिला जगण्याचा मार्ग
 
सुशांत खोब्रागडे
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला ‘वाघिणीचे दूध’ संबोधले होते. आजच्या विद्यार्थ्यांमध्ये तीच शिकवण रुजविणे गरजेचे
आहे. बाबासाहेबांनी शोषित, वंचितांच्या उद्धारासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी आपणही पीडितांच्या उत्थानाचा विडा उचलला पाहिजे.  परंतु, निव्वळ आनंद साजरा न करता बाबासाहेबांचे विचार कृतीत उतरवून समाजजागृती करण्याचे काम आपण केले पाहिजे. 
सुशांत खोब्रागडे, भीम सैनिक , नागपूर 
 

Dr. Babasaheb Ambedkar is the creator of modern India
Nagpur : Babasaheb's personality was full of scholarship, sacrifice, courage, determination. Babasaheb was not the leader of any society or group but he was the first Indian and the creator of modern India. But, we have not been able to recognize them yet, it has to be called the misfortune of our country. Babasaheb did the task of showing the sun of knowledge to the society which was ruined by caste system, caste system, discrimination, ritualism, superstition and superstition. The day when India gets to know Babasaheb and understand his ideology, its narrow feeling will be removed and Babasaheb will consider India as its role model, that day will be the day of complete development of India; Because that would be independent thinking. There will be power of equality and unity. There will be no discrimination, religion, caste, creed and India will be a world power. Architect of Indian Constitution, Bharat Ratna Dr. Greetings to Babasaheb Ambedkar on his 132nd birth anniversary. On the occasion of Babasaheb's birth anniversary, worshipers in Nagpur city have expressed their feelings.




No comments