बाबासाहेबांचे आदर्श बाळगुन शिक्षणात प्रगती करावी : डॉ. सुशांत चिमणकर
![]() |
विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रमापत्र देऊन सत्कार करताना हंसराज राऊत व इतर मान्यवर |
नागपूर :डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श बाळगुन शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती करून देशसेवा करावी, असे आवाहन पी.डब्लू.एस. महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. सुशांत चिमणकर यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूरतर्फे जरिपटका परिसरातील मिसाळ ले-आऊट येथील सेंट रोबेन पब्लिक स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजच्या सभागृहात आयोजित केलेल्या जयंती महोत्सव २०२३ या कार्यक्रमात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी सेंट रॉबेन पब्लिक स्कूलचे संचालक जे.आर.बारसागडे होते. तर मंचावर पी.डब्लू.एस. महाविद्यालयाचे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक डॉ. अमोल मेंढे, केद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूरचे प्रभारी सहायक संचालक हंसराज राऊत, मुख्याध्यापिका धनश्री बारसागडे, आनंद खापर्डे, अनिल चव्हाण, श्री. नारनवरे प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. चिमणकर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती करून देशाला संविधानाच्या माध्यमातून अमुल्य असे योगदान दिले. जगातील सर्वोत्कृष्ठ लोकशाही आपल्याला दिली. त्यामुळेच भारत देश प्रगतीशिल राष्ट्र म्हणून पुढे येऊ शकले आहे. बाबासाहेबांच्या विचारांचा आदर्श प्रत्येकाने घेऊन शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती करून देशाच्या विकासासाठी हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
बारसागडे म्हणाले की, शिक्षण हेच विकासाचे खरे माध्यम असून विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा आदर्श बाळगावा. कठोर मेहनत व परिश्रम करून आपण स्वतःच्या प्रगतीसह देशाच्या प्रगतीला सुद्धा हातभार लावू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे विशेष लक्ष देऊन प्रगती करून देशाच्या विकासासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी इतर मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रभारी सहायक संचालक हंसराज राऊत यांनी केले. संचालन शिक्षिका हरमित कौर यांनी केले. आभार शिक्षिका कोमल सोनकांबळे यांनी मानले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.
चित्रकला स्पर्धा
१) महेक जांभुळकर, प्रथम बक्षीस
२) स्पर्श रंगारी, द्वितीय बक्षीस
३) नयन लोखंडे, तृतीय बक्षीस
४) शालिनी दास, प्रोत्साहन बक्षीस
५) सोनाली जनबंधू, प्रोत्साहन बक्षीस
वक्तृत्व स्पर्धा
१) साहिल बन्सोड, प्रथम बक्षीस
२) यहोश वानखेडे, द्वितीय बक्षीस
३) प्रतिज्ञा साखरे, तृतीय बक्षीस
४) तन्वी बिरोले, प्रोत्साहन बक्षीस
५) रिमषा भैसारे, प्रोत्साहन बक्षीस
नृत्य स्पर्धा
१) रिमषा भैसारे, प्रथम
२) स्पर्श रंगारी, द्वितीय
३) रिया पाटील, तृतीय
४) दिया नंदेश्वर, प्रोत्साहन
Babasaheb's example should be followed in education: Dr. Sushant Chimankar
He was speaking at the Jayanti Mahotsav 2023 program organized by Ministry of Information and Broadcasting, Central Bureau of Communications, Government of India, Regional Office, Nagpur on the occasion of Dr.Babasaheb Ambedkar's birth anniversary at St. Robben Public School and Junior College auditorium, Misal Layout, Jaripatka area.
J.R. Barsagde, Director of St. Robben Public School, presided. So on stage P.W.S. College professor of English Dr. Amol Mendhe, Central Bureau of Communications, Regional Office, Nagpur In-charge Assistant Director Hansraj Raut, Principal Dhanshree Barsagade, Anand Khaparde, Anil Chavan, Shri. Naranware was mainly present.
On this occasion Dr. Chimankar said that Dr. Babasaheb Ambedkar made a valuable contribution to the country through the Constitution by progressing through education. It gave us the best democracy in the world. That is why India has been able to come forward as a progressive nation. On this occasion, he appealed that everyone should take the ideal of Babasaheb's thoughts and contribute to the development of the country through education.
Barsagade said that education is the true medium of development and students should emulate the thoughts of Babasaheb. By hard work and hard work we can contribute to the progress of the country along with our own progress. Therefore, he appealed to the students to pay special attention to education and contribute to the development of the country. On this occasion, other dignitaries also expressed their thoughts. Introductory charge was made by Assistant Director Hansraj Raut. Conducted by teacher Harmeet Kaur. Teacher Komal Sonkamble gave vote of thanks.
Prizes and certificates were distributed to the winners of various competitions by dignitaries. Their names are as follows.
Painting competition
1) Mahek Jambhulkar, First Prize
2) Sparsh Rangari, Second Prize
3) Nayan Lokhande, Third Prize
4) Shalini Das, Incentive Prize
5) Sonali Janbandhu, Incentive Prize
Oratorical competition
1) Sahil Bansod, First Prize
2) Josh Wankhede, Second Prize
3) Pledge Sugars, Third Prize
4) Tanvi Birole, Incentive Prize
5) Rimsha Bhaisare, Incentive Prize
dance competition
1) Rimsha Bhaisare, First
2) Sparsh Rangari, II
3) Rhea Patil, III
4) Diya Nandeshwar, Promotion
*********
No comments