Breaking News

सामाजिक समतेचे क्रांतिकारक या ग्रंथास वैचारिक ग्रंथाचा राष्ट्रीय पुरस्कार

नागपूर : जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या आयोजित नवव्या वर्धापन दिन समारंभात थोर साहित्यिक आणि विचारवंत तसेच ८६व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनिस यांच्या हस्ते सामाजिक समतेचे क्रांतिकारक खंड १ आणि खंड २ अशा वैचारिक ग्रंथास डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैचारिक साहित्याचा राष्ट्रीय पुरस्कार या ग्रंथाचे लेखक माजी जिल्हा माहिती अधिकारी शत्रुघ्न लोणारे यांना प्रदान करण्यात आला.

हा समारंभ येथील हिन्दी साहित्य संमेलन इमारतीच्या मधुरम सभागृहात आयोजित करण्यात आला होता. प्रा. डॉ. श्रीपाल सबनिस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. दीपकुमार खोब्रागडे, प्रमुख उपस्थिती दिल्ली येथील केंद्र सरकारच्या कृषी विभागाचे सेवानिवृत्त अतिरिक्त आयुक्त डॉ. के. पी. वासनिक, वेळगाव कर्नाटक येथील सामाजिक कार्यकर्ते मल्लेश चौगुले, दिल्लीचे सामाजिक कार्यकर्ते मधुकर वानखेडे, कोल्हापूरचे साहित्यिक डॉ. जगन कराडे  उपस्थिती होते. प्रास्ताविक अॅड. भुपेंद्र पाटील, संचालन प्रा. डॉ. अनिल काळबांडे तर अहवाल वाचन डॉ. रविंद्र तिरपुडे यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन सुजितकुमार मुरमाडे यांनी केले. या समारंभात वैचारिक लेखन, काव्य, कथा, आत्मचरित्र, ललित लेखन करणाऱ्या व पुरस्कारासाठी पाठविलेल्यातून निवडक व्यक्तींना तसेच मलेशिया येथील दुसऱ्या जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या संमेलनातील सहभागी साहित्यिकांना सुद्धा पुरस्कार या वर्धापन दिन समारंभातच देण्यात आले. या कार्यक्रमास दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा राज्यातील व्यक्ती मोठ्या प्रमाणात उपस्थित होते..

या समारंभात मार्गदर्शन करतांना प्रा. डॉ. श्रीपाल सबनिस म्हणाले की, डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या सामाजिक चळवळीत अस्पृश्य बांधवासोबतच सुधारणावादी ब्राम्हण समाजाची मंडळीसुद्धा होती. काही ब्राम्हण्यवादी मंडळीचा विरोध होता तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सामाजिक क्रांती लढा यशस्वी झाला.
The revolutionary book of social equality National Award for Conceptual Literature

Nagpur, 31 : In the ninth anniversary function organized by the World Ambedkar Literary Corporation, great literary and intellectuals and the 86th A.B. Former President of Marathi Sahitya Samelan Prof. Dr. Sripal Sabnis's revolutionary volume 1 and volume 2 of Social Equality. The Dr.Babasaheb Ambedkar National Award for Ideological Literature was conferred on former District Information Officer Shatrughan Lotane, the author of the book.

The function was held at the Madhuram auditorium of the Hindi Sahitya Sammelan building here. Prof. Dr. Shripal Sabnis was present as the chief guest. President of World Ambedkar Literary Corporation Prof. Dr. Deepkumar Khobragade, Retired Additional Commissioner, Department of Agriculture, Central Government, Delhi. Dr. K. P. Vasnik, social activist Mallesh Chaugule from Veergaon Karnataka, social activist Madhukar Wankhede from Delhi, literary  from Kolhapur. Jagan Karade was present.
  Introductory Adv. Bhupendra Patil, Conducting Prof. Dr. Anil Kalbande reports

Reading Dr. By Ravindra Tirpude. Finally, vote of thanks was given by Sujith Kumar Murmade. In this ceremony, the award was given to the selected persons from those who wrote ideological writing, poetry, story, autobiography, fine writing and also to the participating writers of the Second World Ambedkar Literary Corporation Conference in Malaysia. A large number of people from the states of Delhi, Karnataka, Maharashtra, Telangana attended this event.

While guiding in this ceremony, Prof.  Shripal Sabnis said that Dr.Babasaheb Ambedkar's social movement included untouchables and members of the reformist Brahmin community. Although there was opposition from some Brahminists, Dr. Babasaheb Ambedkar's social revolution struggle was successful.

No comments