प्रश्नमंजुषा स्पर्धेत महालक्ष्मी शाळा प्रथम
![]() |
प्रमाणपत्र दाखवताना विजेते विद्यार्थी व शिक्षक |
नागपूर : पाचपावली सुतिकागृह सभागृहात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांची कुष्ठरोगाबबत प्रश्नमंजुषा , स्पर्धा घेण्यात आली. यावेळी मनपा आरोग्य अधिकारी डॉ नरेंद्र बहीरवार यांनी सदिच्छा भेट दिली.
यात स्पर्धेत श्री महालक्ष्मी उच्च विद्यालय, नूतन महिला विद्यालय , पंचशील विद्यालय या शाळांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत महालक्ष्मी शाळा प्रथम , पंचशील शाळा द्वितीय, नूतन विद्यालय तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. विजेत्या शाळांना मनपा झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपांकर भिवगडे यांच्याहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
या स्पर्धेत महालक्ष्मी विद्यालयाच्या सार्थक नागदेवे, वंशिका वरठी, खुशी बोकाडे ,अमन धकाते या विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापक ज्ञानोबा केंद्रे , सहाय्यक शिक्षक सोपान मुंडे यांनी अभिनंदन केले. यावेळी राजीव देशपांडे, राजेश्वर एरकेवार
उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार अवैकीय पर्यवेक्षक प्रतिभा भोसले यांनी मानले.
Mahalakshmi School stands first in quiz competition
Nagpur: Pachpavali Sutikagriha Hall Under the National Leprosy Eradication Programme, a quiz and competition was conducted for school students on leprosy. On this occasion Municipal Health Officer Dr Narendra Bahirwar paid a goodwill visit.
Sri Mahalakshmi High School, Nutan Mahila Vidyalaya, Panchsheel Vidyalaya participated in the competition. In this competition, Mahalakshmi School stood first, Panchsheel School stood second, Nutan Vidyalaya stood third. Municipal Zonal Medical Officer Dr. The prize was distributed by Dipankar Bhivagde.
School Principal Gyanoba Kendra, Assistant Teacher Sopan Munde congratulated the students of Mahalakshmi Vidyalaya Sarthak Nagdeve, Vanshika Varathi, Khushi Bokade, Aman Dhakate for their excellent performance. This time Rajeev Deshpande, Rajeshwar Erkewar
were present. Pratibha Bhosale, the special supervisor, conducted the program and gave the vote of thanks.
No comments