Breaking News

रंग मल्हारच्या कलाकारांनी २०४७ ची भव्य-दिव्य नाग नदी साकारली

 

कॅनव्हास चित्राचे पाहणी करतांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  

नागपूर, १६ : भारत सरकारतर्फे नाग नदी स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले आहे. या निमित्त नागपूर आर्ट सोसायटीच्या रंग मल्हार चित्रकारांनी नाग नदी २०४७ मध्ये कशी दिसावी, या उद्देशाने ३ बाय १६ फूट कॅनव्हासवर चित्रण केले आहे. या चित्रकारांमध्ये श्रीकांत गडकरी, किशोर सोनटक्के, दीपक सातपुते, राजकुमार कावळे, आशिष पलेरिया, हरिश ढोबळे यांचा समावेश आहे. या चित्रकारांनी हे भले मोठे कॅनव्हास चित्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना त्यांच्या निवासस्थानी भेट दिले.
     नागपुरातून वाहणारी एकमेव नदी म्हणजे नाग नदी. या नदीला एक ऐतिहासिक संदर्भ लाभला आहे. नागवंशीय काळात नाग नदीवर यात्रा भरत. वेगवेगळ्या प्रांतातून येथे वेगवेगळे व्यापारी वर्ग येत. तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन येथे होत असे. यशवंत   स्टेडियमजवळील संगम प्रसिद्ध होता. पण आज ही नदी दूषित झाली आहे. सांडपाण्याच्या नात्या प्रवाहाला जोडण्यात आल्या आहेत. तिचा विकास कसा व्हावा यासाठी चित्रकारांनी नदीच्या उगमापासून तर भांडेवाडीपर्यंतच्या भागाचे चित्रण केले असून, त्यात नाग नदीत बोटिंग, स्विमिंग, सी प्लेन दर्शविले आहे. नदीच्या पाण्यावर वीज निर्मिती करून ती शहराला मिळावी, इतकेच नाही तर पर्यटकांनाही सौंदर्याची अनुभूती व्हावी व युवकांना रोजगार मिळण्याच्या उद्देशाने कॅनव्हासवर रंगयोजना करण्यात आली आहे. ही भव्य कलाकृती नितीन गडकरी यांना भेट देण्यात आली असून ती कविवर्य सुरेश भट सभागृहात लावण्यात येणार आहे. यावेळी भाजपा शहर मंत्री ईश्वर धिरडे, गोपाल लांजेवार यांच्यासह चित्रकार तसेच गौरव सुरंदसे व आशिष पलोरिया आदी उपस्थित होते.

The cast of Rang Malhar brings to life the grand-divine Nag Nadi of 2047

Nagpur, 16 : Nag river cleaning campaign has been undertaken by the Government of India. On this occasion, Rang Malhar painters of Nagpur Art Society have painted a 3 x 16 feet canvas on how the Nag river will look like in 2047. These painters include Srikant Gadkari, Kishore Sontakke, Deepak Satpute, Rajkumar Kawle, Ashish Paleria, Harish Dhoble. These painters gifted this large canvas painting to Union Minister Nitin Gadkari at his residence.
      Nag River is the only river flowing through Nagpur. This river has a historical context. During the Naga Dynasty, Yatras were held on the Nag River. Different classes of traders come here from different regions. Various programs were also organized here. Sangam near Yashwant Stadium was famous. But today this river is polluted. Sewage connections are attached to the stream. In order to develop it, painters have depicted the area from the source of the river to Bhandewadi, in which boating, swimming, sea plane have been shown in Nag river. By generating electricity from the water of the river, not only to get it to the city, but also to make the tourists feel the beauty and to get employment for the youth, the color scheme has been done on the canvas. This magnificent piece of art has been gifted to Nitin Gadkari and will be installed in Kavivarya Suresh Bhat Auditorium. On this occasion, BJP City Minister Ishwar Dhirde, Gopal Lanjewar along with painters, Gaurav Surandse and Ashish Paloria were present.

No comments