कलात्मक विकासाने व्यक्तीमत्व फुलते : बबन चहांदे
![]() |
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बबन चहांदे |
नागपूर,ता. २५ : शालेयस्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनातून विद्यार्थ्यांच्या अंगात असणा-या कलात्मक सुप्त गुणांना चालणा मिळून त्याचे व्यक्तिमत्त्व फुलण्यास मदत मिळते असे उदगार बबन चहांदे यांनी काढले ते बिनाकी मंगळवारी कँझी हाऊस येथील सिध्दार्थ शिक्षण संस्थेद्वारा संचालित सिध्दार्थ विद्यालय येथे आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानी बोलत होते. कोरोना काळाच्या दोन वर्षांच्या मरगळीनंतर सिध्दार्थ विद्यालय व सिध्दार्थ प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या अध्यक्षा उषाताई चहांदे, मुख्याध्यापिका कुमुदिनी चहांदे,संगिता गजभिये , माजी पर्यवेक्षक वसंत पाटील, बापू खोब्रागडे,मनोज आवळे प्रामुख्याने उपस्थित होते. दोन्ही शाळेच्या विद्यार्थ्यांनी नाट्य,नृत्य सादर करून उपस्थित विद्यार्थ्यांचे व पालकांचे भरपूर मनोरंजन केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन अश्वीनी गांजरे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रिती इटनकर यांनी मानले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी जोतिराव बारसागडे, सूरेश चव्हाण, लक्ष्मिकांत मेंडुले,वर्षा पाटील, आशा बुराडे, सुनिता बैस,मंजु डोंगरे,मुन्नी निमजे,माया तरारे,दहीकर मैडम,सतिश ऊके, पदमाकर करनुके यांनी परिश्रम घेतले.
Personality blossoms through artistic development : Baban Chahande
Nagpur, 25: Baban Chahande said that through the organization of cultural programs organized at the school level, the artistic latent qualities of the students are stimulated and their personality blossoms. was After two years of corona period, an annual reunion program was organized jointly by Siddharth Vidyalaya and Siddharth Primary School. President of the institution Ushatai Chahande, Principal Kumudini Chahande, Sangita Gajbhiye, former supervisor Vasant Patil, Bapu Khobragade, Manoj Awle were the chief guests. were mainly present. Students of both the schools entertained the students and parents by performing drama and dance. The program was moderated by Ashwini Ganjare. Priti Itankar gave vote of thanks for the program. Jotirao Barsagade, Suresh Chavan, Laxmikant Mendule, Varsha Patil, Asha Burade, Sunita Bais, Manju Dongre, Munni Nimje, Maya Tarare, Dahikar Madam, Satish Ooke, Padmakar Karnuke worked hard to make the program successful.
No comments