Breaking News

नागपूर माध्यमिक विद्यालयात स्नेहसंमेलन सोहळा जल्लोषात

विद्यार्थ्यांचा सत्कार करताना मान्यवर

नागपूर : नुकताच नागपूर माध्यमिक विद्यालय पोलीस लाइन टाकळी येथे नागपूर माध्यमिक विद्यालय व संस्कार कॉन्व्हेन्ट यांच्या संयुक्त विद्यमाने स्नेहसंमेलन सोहळा जल्लोष पार पडला.
    कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मध्ये नागपूर शहर  पोलीस वाहतूक विभागांचे उपायुक्त  चेतना तिडके,   शाळेचे माजी विद्यार्थी  अधीक्षक सेंट्रल GST विभागचे अताउल्ला खान,  नागपूर प्रदेश एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व माजी नगरसेवक  किशोर जिचकार,   अध्यक्ष राजेश्री किशोर जिचकार, सहसचिव कविता राजूरकर, शासकीय बालगृहाचे अधिक्षिका निंबाळकर ,मुख्याध्यापक  विनोद गुलाबराव पुरकाम प्रमुख्याने उपस्थीत होते.

    विनोद पुरकाम यांनी शाळेने वर्ष भरात केलेला उपक्रमाचे अहवाल वाचन केलं. उपायुक्त चेतना तिडके यांनी मुलांना मार्गदर्शन करताना एक निश्चित ध्येय निवडण्यास त्यासाठी त्यादिशेने प्रमाणिक प्रयत्न करण्यास व स्पर्धा परीक्षा तयारी कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले.  अताउल्ला खान यांनी शाळेतील आपल्या जुन्या आठवणी सांगताना आपला व्यक्तिमत्त्व विकास शिक्षकांचे मदतीने कसे घडले याबाबत आणि मुलांनी भविष्य काळातील स्पर्ध्यासाठी तयार राहण्यास सांगितलें. यावेळी शाळेतुन प्रथम आलेली विद्यार्थिनी खुशी लोणारे हीचा सत्कार करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा व उपक्रमासाठी बक्षिसे देण्यात आली. दुसऱ्या दिवशी सांस्कृतीक कार्यक्रम आयोजीत करण्यात आले यासाठी शाळेतील माजी विद्यार्थी  अनंत ठाकरे पोलीस उपनिरीक्षक सोनेगाव पोलीस स्टेशन व सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी RFO दिलीप कैलूके आणि लोकप्रिय विद्यालयाचे सेवा निवृत मुख्याध्यापक मनोज घींमे प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी मुलांकडून सादर सुंदर संस्कृतिक कार्यक्रमनी सर्वांचे मन मोहून घेतले मान्यवरांचे हस्ते शाळेतील माजी विद्यार्थी आदित्य चांदणे यानी फुटबॉल खेळात विशेष प्राविण्य दाखवत नागपुर विभागाचे पुणे येथे आयोजीत मिनी ओलंपिक मध्ये टीम  कॅप्टन म्हणून संघाला तिसरे स्थान मिळवुन दिल्याबद्द्ल गौरव करण्यात आला त्यानंतर शाळेतील इतर विद्यार्थांना सुध्दा खेळ स्पर्धा व उपक्रमासाठी पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन  नितीन बर्गे ,अर्चना मोहनकर आणि  प्रवीण चौधरी यांनी केले तर संस्कृतिक विभागांचे नलिनी गेडाम, हिरा सहारे,  वंदना नेमाडे, केशव घारपुरे,  प्रवेश शेवाळे,  विजू मौजे ,  रवि तुमडाम आणि पुष्पा बरदे यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यास विशेष सहकार्य लाभले.

Snehasamelan in Nagpur Secondary School

Nagpur: Recently, a social gathering was held at Nagpur Madhyamik Vidyalaya Police Line Takli in association with Nagpur Madhyamik Vidyalaya and Sanskar Convent.
     The chief guests of the program included Chetna Tidke, Deputy Commissioner of Nagpur City Police Traffic Department, Ataullah Khan, former student superintendent of the school, Central GST Department, President and former corporator of Nagpur Pradesh Education Society Kishore Jichkar, President Rajeshree Kishore Jichkar,
Joint Secretary Kavita Rajurkar, Superintendent of Government Children's Home Nimbalkar, Principal Vinod Gulabrao Purkam were present.

     Vinod Purakam read the report of activities done by the school during the year. Deputy Commissioner Chetna Tidke guided the children to choose a specific goal, to make consistent efforts in that direction and how to prepare for competitive exams. Ataullah Khan recounted his old school memories, how his personality development took place with the help of teachers and asked the children to be ready for future competitions. On this occasion, Khushi Lotane, the first student from the school, was felicitated and the students were given prizes for various competitions and activities. On the second day, a cultural program was organized in which former students of the school Ananth Thackeray, Sub Inspector of Police Sonegaon Police Station and Social Forestry Department Officer RFO Dilip Kailuke and Retired Principal of Popular School Mr. Manoj Ghime were mainly present. Aditya Chandane, a former student of the school, was felicitated as the team captain of Nagpur Division in Mini Olympics held at Pune for winning the third place, after showing special skill in football, other students of the school were also awarded for sports competitions and activities. Nitin Berge, Archana Mohankar and Praveen Choudhary conducted the program while Nalini Gedam, Hira Sahare, Vandana Nemade, Keshav Gharpure, Pravesh Shewale, Viju Mauje, Ravi Tumdam and Pushpa Barde of the cultural department provided special support to make the program successful.


No comments