गायक भूषण जाधव यांना "युवा कला गौरव " राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
![]() |
सुप्रसिद्ध गायक भूषण जाधव |
नागपूर : नागपुरातील सुप्रसिद्ध गायक भूषण जाधव यांना युवा कला गौरव पुरस्कार जाहीर झाला असून पुण्यातील आर्ट बिटस फाउंडेशनतर्फे हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
संगीत या कला विभागात हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला असून, आर्ट बिटस् फौंडेशन पुणे कडून युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार ऑनलाईन पध्दतीने प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारामुळे भूषण जाधव यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या पुरस्काराची माहिती देतांना आर्ट बिटस् पुणे या संस्थेचे संस्थापक, संचालक संतोष पांचाळ म्हणाले की एकूण सहा कला विभागात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात, त्यासाठी १५ मे ते ३१ जुलै दरम्यान महाराष्ट्रातून अनेक कलाकार आपली माहिती पाठवतात. त्यातून ही निवड करण्यात येते.
आर्ट बिटस् ही संस्था गेली एकवीस वर्षे सातत्याने चित्र, शिल्प, संगीत, अभिनय, नृत्य आणि लोककला आशा सर्वच कला विभागातील कलाक्षेत्रातील कलाकारांना सक्षम व्यासपीठ व प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने काम करीत आहे. या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तळागाळातील कलाकारांसाठी महाराष्ट्रातील एक सर्वात मोठा डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म उपलब्ध दिला आहे. त्यामुळे आपली कला लाखो लोकांपर्यंत पोहचली जाते. यासाठी सर्व स्तरातील कलाकारांनी या संस्थेकडे संपर्क साधावा असे आवाहन आर्ट बिटस् फौंडेशन या संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
Singer Bhushan Jadhav announced "Yuva Kala Gaurav" state level award
Nagpur : The Yuva Kala Gaurav award has been announced to Bhushan Jadhav, a well-known singer from Nagpur, and this award will be presented to him by the Art Bits Foundation in Pune.
This state level award has been announced in the art department of music, and this award is given online by Art Bits Foundation Pune to encourage young artists. Due to this award, Bhushan Jadhav is being appreciated from all levels.
Giving information about this award, Art Bits Pune founder and director Santosh Panchal said that these awards are given in total six art categories, for which many artists from Maharashtra send their information between May 15 and July 31. This choice is made from it.
Art Bits is an organization that has been continuously working for the last twenty one years to provide a competent platform and promotion to the artists in the fields of painting, sculpture, music, acting, dance and folk art. Through this organization, one of the largest digital media platforms in Maharashtra has been made available to grassroots artists in Maharashtra. So our art reaches millions of people. For this, artists of all levels have been requested to contact this organization on behalf of the organization Art Bits Foundation.
No comments