Breaking News

नागपुरात मनसेतर्फे महिला कामगारांचा सत्कार

 

महिला सफाई कामगारांचा सत्कार करतांना हेमंत गडकरी   

नागपूर,ता. १४ : महाराष्ट्र नवनिर्माण सेना दक्षिण पश्चिम विभागच्या वतीने प्रभाग ४२ स्वागत सोसायटी सोनेगाव येथे मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महिला सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला. सफाई कामगार सकाळी शहर स्वच्छ करतात म्हणून अनेक रोगांचे अतिक्रमण आमच्या सारख्या लोकांवर होत नाही,आरोग्य परिस्तिथी बऱ्यापैकी आपल्या सफाई कामगारांमुळेच  नियंत्रणात राहते असे प्रतिपादन मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी या साडी वितरण कार्यक्रमात केले व सफाई कामगारांच्या सेवे बद्दल आभार व्यक्त केले,

 यावेळी मनपा झोन एकचे कर्मचारी राम तिडके यांना नुकतीच डॉक्टरेट मिळाल्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला, स्थानिक प्रशासनाच्या सेवेत असतानाही  शिक्षणाची आवड जोपासल्या बद्दल त्यांचे शाल श्रीफळ ,छत्रपतींची प्रतिमा, पुष्पगुच्छ देऊन हेमंत गडकरी, शहर अध्यक्ष अजय ढोके,विभाग अध्यक्ष तुषार गिऱ्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, प्रभागाचे जमादार संतोष सफेले यांचाही यावेळी गौरव करण्यात आला,आपल्या अध्यक्षांच्या वाढदिवशी सफाई कामगारांना,तसेच कर्मचारी वर्गाने मिळविलेले प्रावीण्य या सर्वांची आठवण ठेऊन त्यांच्या गौरव केल्या बद्दल उपस्थित सर्वांनी मनसेच्या या स्तुत्य उपक्रमा बद्दल कौतुक केले,या कार्यक्रमाला सरचिटणीस हेमंत गडकरी,शहर अध्यक्ष अजय ढोके,विभाग अध्यक्ष तुषार गिऱ्हे ,यांचेसह महिला सेना शहर अध्यक्ष संगीता सोनटक्के,कामगार सेनेचे उप चिटणीस  गणेश मुदलीयार,विभाग उपाध्यक्ष चेतन बोरकुटे ,संजय  पळसकर,प्रिया बोरकुटे, दोहेंद ठाकरे,राजू बोंडवे,श्यामली नवनागे,व अन्य उपस्थित होते.
Nagpur : On behalf of Maharashtra Navnirman Sena South West Division Nagpur, women cleaners were felicitated at Ward 42 Swagat Society Sonegaon on the occasion of MNS president Rajsaheb Thackeray's birthday. Hemant Gadkari, MNS state general secretary, said that many diseases are not transmitted to people like us as the cleaners clean the city in the morning.
 Ram Tidke, an employee of Municipal Corporation Zone One, was also felicitated for his recent doctorate. He was felicitated by Hemant Gadkari, City President Ajay Dhoke and Divisional President Tushar Girhe for his love for education despite being in the service of local administration. The Jamadar of the ward Santosh Safele was also felicitated on the occasion. On the occasion of his President's birthday, all the attendees lauded the MNS for commemorating the excellence of the cleaning workers as well as the staff. General Secretary Hemant Gadkari, City President Ajay Dhoke , Divisional President Tushar Girhe, along with Mahila Sena City President Sangeeta Sontakke, Kamgar Sena Deputy Secretary Ganesh Mudaliar, Divisional Vice President Chetan Borkute, Sanjay Palaskar, Priya Borkute, Dohend Thackeray, Raju Bondwe, Shyamli Navnage and others were present.

No comments