Breaking News

युवक काँग्रेसतर्फे मोदी पुतळ्याचे दहन

 

मोदी  पुतळ्याचे प्रतिकात्मक दहन करतांना युवक काँग्रेसचे कार्यकर्ते

नागपूर,ता. १५ : केंद्रातील भाजप सरकारने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व नेते खासदार राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्डप्रकरणी "ईडी" चौकशीची नोटीस पाठविल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने नागपुरातील सिव्हील लाईन्स येथील ईडी कार्यालयापुढे  मोदी सरकारच्या पुतळ्याचे प्रतिकात्मक दहन करून तीव्र निदर्शने करण्यात आला.

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयासमोर "राहुल गांधी आगे बढो, हम तुम्हारे साथ है, नही चलेगी, नही चलेगी दादागिरी नही चलेगी, अशा जोरदार घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.  निदर्शने करणाऱ्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची दुसऱ्या ठिकाणी रवानगी केली.

या आंदोलनात अखिल भारतीय युवक काँग्रेसचे सचिव अजित सिंग, युवक काँग्रेसचे पदाधिकारी पंकज सावरकर, आसिफ शेख, इरशाद शेख, दुगेश पांडे, प्रतिक कोल्हे, अनिरुद्ध पांडे, आसिष मडपे, निलेश खोबरागडे, सतीश पाली, गौतम अंबादे, राकेश निकोसे, राकेश इखर, श्रीलज पांडे, सादाब सैफी, कुणाल चौधरी, सचिन वासनिक, चेतन तरारे, पफुल किरपाने, इमरान खान, 

कुणाल निमगडे, सन्तोष खड़से, आकाश इंदुरकर, निखिल सहारे, निशाद इंदुरकर, तपन बोरकर, गोविन्द गौरे, उमेश डवखरे, पलास लिगायत, रशीद अंसारी, प्रण्य सिह ठाकुर, हर्ष बरडे, जैनुअल ओवेश, सौरभ कालमेघ, रायल गेडाम, रोनक नादगावे, दयाशंकर शाहु, क्षितिज साखरे, उज्वल खापर्डे, पारस गजभिये, नैकित दहिकर, अंकित बोहत, सार्थक कुर्तकोटी, एरन कुचडे आदी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.





No comments