एच एस.सी परीक्षेत जाईबाई चौधरी ज्ञानपीठाचा शंभर टक्के निकाल
जाईबाई चौधरी कॉलेजने राखली यशाची गौरवशाली परंपरा
![]() |
एच.एस.सी परीक्षेतील मेरीट विद्यार्थी |
नागपूर, ता. ८ : जाईबाई चौधरी कनिष्ट महाविद्यालय, मंगळवारी बाजार सदर, नागपुर या संस्थेची स्थापना 1922 मध्ये थोर समाजसेविका जाईबाई बापुजी चौधरी यांनी अत्यंत हलाखीच्या सामाजिक आर्थिक व शैक्षणिक परिस्थितीत केली. 100 वर्षाचा अखंड संघर्ष करीत जाईच्या या संस्थेने आज नर्सरी ते 12 वी पर्यंत गोर गरीब व मध्यम वर्गीय मुलींना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलेले आहे.
1993 पासून अखंड 29 वर्षे एच.एस.सी व एस.एस.सी परीक्षेत मेरीट यादीत येवून व उत्तम निकाल देऊन यावर्षी नुकत्याच जाहीर झालेल्या बारावी बोर्ड 2022 परीक्षेत अनेक समस्यांचा सामना करीत आपली यशाची गौरवशाली परंपरा राखली.
बारावी बोर्डात आर्ट्स व कॉमर्स मध्ये 100% निकाल देत 90% पेक्षा जास्त 3 विद्यार्थिनी व 80% पेक्षा जास्त 23 विद्यार्थिनी आहेत. कॉमर्स मधून कु. वनश्री दिलीप सोनटक्के हिने 92% टक्के गुण मिळवून कॉलेज मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. द्वितीय क्रमांकावर कु. तन्नू प्रमोद आवळे 90% व रुचिता राजेश भांगेला 90% गुण मिळालेले आहे. कु.नंदिनी आनंद भोयर 87%, मोहिनी गंगाधर राऊत 86%, भुमेश्वरी गजानन अडकिने 86%, साक्षी बंडुजी फुकट 85%, मिनाक्षी नामदेव फलके 84%, तृशा कपिल मेश्राम 84%, पायल दिनेश चाचेरकर 84%, अलिशा जितेंद्र नागदेवते 84% आर्ट्स मधून कु. पलक राजेश मेश्राम हिने 86% गुण प्राप्त करून यश मिळविलेले आहे.
कसक सचिन गजघाटे 85%, अनुष्का आनंद बागडे 84%, ऋषिका राजेश नागदेवे 84%, गुण मिळवून बोर्डात यश संपादन केले.
संस्थेचे कार्यवाह आचार्य सुधाकर चौधरी, संचालिका प्रभा चौधरी व डायरेक्टर डॉ. शिल्पा पाझारे यांच्या मार्गदर्शनाखाली जाईबाई कनिष्ट महाविद्यालयाचे प्राचार्य राजेश अंबुलकर, पर्यवेक्षक प्रा. अर्शिया पठाण शिक्षक प्रा. सुदत्त मेश्राम, प्रा. सुरेश सुखदेवे, प्रा. रूपा कोकाटे, प्रा. अनीता धारगावे, प्रा. अंजली पाटणे व प्राचार्य यांनी सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले.
No comments