Breaking News

महावितरणची सायबर पोलीस ठाण्यात तक्रार : डॉ.नितीन राऊत

 फसव्या संदेशांची ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी घेतली गंभीर दखल

महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

मुंबई : वीज देयकाच्या थकबाकीमुळे वीज पुरवठा खंडित करण्यात येणार असल्याने तातडीने संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा, अशा स्वरूपाचे बनावट संदेश पाठवून वीज ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात फौजदारी कार्यवाही करण्यासाठी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात यावी, असे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना आज दिले. त्यानंतर तातडीने पावले उचलत महावितरणने मुंबई आणि महाराष्ट्र सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.  

महावितरणच्या नावाने वीज ग्राहकांची अशा पध्दतीने दिशाभूल करणे ही गंभीर बाब आहे.  महावितरणची प्रतिमा मलिन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका यावेळी डॉ राऊत यांनी घेतली.  
   अशा फसव्या संदेशांना बळी पडू नये असे आवाहनही डॉ राऊत यांनी ग्राहकांना केले आहे.   केवळ महावितरणच्या अधिकृत वीज बिल भरणा केंद्र आणि अधिकृत ऑनलाइन पेमेंट गेट वे च्या माध्यमातूनच विज बिल भरावे . याशिवाय सर्व ग्राहकांनी आपले थकित बिल भरून महावितरणला सहकार्य करावे,अशी विनंती यानिमित्ताने डॉ.राऊत यांनी ग्राहकांना केली आहे.

Energy Minister Dr. Nitin Raut Taken by  fraudulent messages. Serious interference 
MSEDCL lodged a complaint at Kelly Cyber ​​Police Station

MUMBAI: As the power supply will be disrupted due to arrears of electricity bill, a complaint should be lodged at the cyber police station against those who cheat electricity consumers by sending fake messages to the relevant mobile numbers, said state energy minister Dr Nitin Raut. Director Vijay Singhal today. MSEDCL has lodged a complaint with Mumbai and Maharashtra Cyber ​​Police Stations.

It is a serious matter to mislead the power consumers in such a manner in the name of MSEDCL. Dr.Raut said that strict action should be taken against those who tarnish the image of MSEDCL.
   Dr. Raut also appealed to the consumers not to fall prey to such deceptive messages
 Is done. Pay electricity bill only through MSEDCL's official electricity bill payment center and official online payment gateway. Apart from this, all the customers should cooperate with MSEDCL by paying their outstanding bills, Dr. Raut has requested the customers.

#MSEDCL

#FakeSMS

Maharashtra Pradesh Congress Committee

Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd.

No comments