Breaking News

कथ्थक स्पर्धेत अमृणी हिवरखेडकरला प्रथम पारितोषिक

गोवात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय  स्पर्धेकरिता अमृणी हिवरखेडकरची निवड
नागपूर :  नुकताच  शिर्डी येथे 'आझादी का अमृतमहोत्सव' अंतर्गत  कल्चरल फाउंडेशन ऑफ इंडिया व  संजीवनी स्कुल शिर्डीच्यावतीने आंतरराज्य पातळीवर ' कथ्थक ' स्पर्धेचे मोठ्या  उत्सहात संपन्न झाला. या स्पर्धेत नागपूरच्या अमृणी हिवरखेडकरने  प्रथम पारितोषिक पटकावले. या स्पर्धेत  संपूर्ण देशभरातून   १५० च्यावर  विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला
अमृणी हिवरखेडकर

यात नागपूरच्या 'कोमल गंधार डान्स अकादमीच्या अमृणी हिवरखेडकर हिला सिनिअर गटात  प्रथम पारितोषिक प्राप्त झाले व  गोवा येथे होणाऱ्या  आंतरराष्ट्रीय  स्पर्धेकरिता निवड झाली. अकादमीच्या  श्रावणी निकोसे (द्वितीय), सेजले बालपांडे,राधिका काकडे, मनिषा राणा यांनीसुद्धा पारितोषिक  पटकावले. बेस्ट कोरिओग्राफर म्हणून गंधार डान्स अकादमीच्या संचालिका जयश्री मेश्राम यांची  निवड करण्यात आली.

First prize to Amruni Hivarkhedkar in Kathak competition
Nagpur: Recently, an inter-state level 'Kathak' competition was organized in Shirdi by the Cultural Foundation of India and Sanjeevani School Shirdi under 'Azadi Ka Amrut Mahotsav'. Amruni Hivarkhedkar of Nagpur won the first prize in this competition. Over 150 students from all over the country participated in this competition. Amruni Hivarkhedkar of Komal Gandhar Dance Academy, Nagpur won the first prize in the senior category and was selected for the international competition to be held in Goa. Academy's Shravani Nikose (II), Sejle Balpande, Radhika Kakade and Manisha Rana also bagged the prizes. Jayashree Meshram, Director, Gandhar Dance Academy was selected as the Best Choreographer.

No comments