Breaking News

गाडी चालवितांना 'हेल्मेट' का वापरावे : दीपक साखरे


विदयार्थी व नागरिकांना  मार्गदर्शन करतांना वाहतूक पोलीस निरीक्षक दीपक साखरे व इतर मान्यवर 

नागपूर : वैशाली नगर मेहंदीबाग कॉर्नर जीवन टॉवर्स येथे ज्ञानोदय बहुउद्देशीय संस्थातर्फे वाहतूक नियम व खबरदारी या विषयावर  कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.   
      कार्यक्रमाचे  प्रमुख पाहुणे  लकडगंज  पोलीस वाहतूक शाखाचे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक  दीपक साखरे,  रस्ते सुरक्षा सल्लागार संसद समितीचे  सदस्य चंद्रशेखर महाले, ज्ञानोदय बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष  राहुल वासनिक,  कमलेश वंजारी उपस्थित होते.  

गाडी चालवितांना नागरिकांनी हेल्मेट वापरतांना फक्त ISI मार्क असलेले हेल्मेटचा वापर केल्यास  डोक्याला जबर मर लागत नाही त्यामुळे आपले जीव धोक्यात न येता जीवन सुरक्षित राहते  असे मत वरिष्ठ पोलीस निरीक्षक  दीपक साखरे यांनी व्यक्त केले.  

जीवन अमूल आहे त्याची काळजी घेणे हे प्रत्येक नागिकांचे कर्तव्य आहे तसेच महिलांनी गाडी चालवितांना  दोन्ही बाजूने मिरर असायला पाहिजे जेणे करून पाठीमागून येणारे कुठलेही संकट व अपघात टाळता  येईल असे  चंद्रशेखर महाले बोलतांना म्हणाले,

 यावेळी संस्थेचे अध्यक्ष राहुल वासनिक यांनी प्रास्ताविक  करीत संस्थेची माहिती दिली.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहाणा अन्सारी यांनी केले.  आभार  अ‍ॅड.निशा वासनिक यांनी मानले. 
    यावेळी नितेश सोनटक्के, हिमांशू फुलमाळी, परितोष दत्ता, संध्या नागदेवे, अश्विनी सहारे यांनी सहकार्य केले. यावेळी  कॉम्पुटर प्रशिक्षण  घेणारे विद्यार्थी उपस्थित होते.

Why use a helmet while driving: Deepak Sakhare

Nagpur: Vaishali Nagar Mehndibagh Corner Life Towers
A workshop on traffic rules and precautions was organized by Gyanodaya Multipurpose Organization here.
      The chief guests of the program were Deepak Sakhre, Senior Inspector of Police, Lakdaganj Police Traffic Branch, Chandrashekhar Mahale, Member, Road Safety Advisory Parliament Committee, Gyanodaya Multipurpose
Rahul Wasnik, President of the Society, Kamlesh Vanjari were present.

Senior Police Inspector Deepak Sakhare said that if a citizen wears a helmet with ISI mark while driving, his head will not be killed and his life will be safe without endangering his life.

It is the duty of every citizen to take care that life is precious and women should have mirrors on both sides while driving so as to avoid any calamity or accident from behind, said Chandrasekhar Mahale.

 Rahul Wasnik, president of the organization, introduced the organization. The program was moderated by Shahana Ansari. Thanked by Adv. Nisha Wasnik.
    Nitesh Sontakke, Himanshu Phulmali, Paritosh Datta, Sandhya Nagdeve, Ashwini Sahare assisted in this. Students undergoing computer training were present at this time.

No comments