म्हाडा भरती परीक्षेचे हॉलतिकीट उपलब्ध : N7 News Voice
मुंबई : म्हाडाच्या १२ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या भरती परीक्षेसाठी हॉलतिकीट उपलब्ध झाले आहे.https://mhadarecruitment.in/ म्हाडा संकेतस्थळावर सरळसेवा भरती या शीर्षकाखाली उमेदवारांना हॉलतिकीट मिळवता येणार आहे. तसेच परीक्षेसाठी येताना उमेदवारांना हॉलतिकिटासोबत स्वयंघोषणापत्र घेऊन येणे बंधनकारक करण्यात आले आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) आस्थापनेवरील विविध संवर्गातील ५६५ रिक्तपदांसाठी पावणेतीन लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यापैकी अनेक उमेदवारांनी एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज भरले आहेत. त्यामुळे म्हाडाने विविध पदांसाठीची परीक्षा एकाच दिवशी आयोजित न करता वेगवेगळ्या पद्धतीने परीक्षांचे नियोजन केले आहे.
टीप : कोव्हिड-१९ विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने उमेदवारांना सोबतच्या परिशिष्टानुसार सूचना देण्यात येत आहेत.
कोव्हिड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण सरळसेवा भरती २०२१ परीक्षेकरीता मानक कार्यप्रणाली नुसार उमेदवारांना
खालीलप्रमाणे सूचित करण्यात येत आहे :
१. परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश करताना किमान तीन पदरी कापडाचा मुखपट (Mask)परिधान करणे अनिवार्य आहे.
२. परीक्षा केंद्रावर सॅनिटाईझरची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, त्याचा वापर दोन्ही सत्राकरीता (असल्यास) करणे अनिवार्य आहे.
३. परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान स्वच्छता (Cleanliness) तसेच आरोग्यास हितावह (Hygienic) वातावरण राखण्यासाठी हात वेळोवेळी सॅनिटाईझ करणे आवश्यक आहे.
४. कोव्हिड १९ सदृश्य लक्षणे जसे की, ताप, सर्दी, खोकला इत्यादी दिसून येत असल्यास संबंधित परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षकीय अधिकारी/कर्मचारी यांना आगाऊ कळवावे. अशा उमेदवारांची स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात येईल.
५. उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर प्रवेश करताना तसेच परीक्षा केंद्राबाहेर जाताना शारीरिक / परस्पर अंतर (Social Distancing) राखणे अनिवार्य आहे.
६. वापरलेले टिश्यू पेपर मुखपट, हातमोजे, सॅनिटाईझ पाऊच इत्यादी वस्तू कचराकुंडीमध्येच टाकाव्यात.
७. कोव्हिड १९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासन तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या सर्व सूचना आदेश यांचे काटेकोरपणे पालन करावे.
Hold ticket of MHADA recruitment exam available
Mumbai, Tal. 10: Holiday tickets have been made available for MHADA recruitment examinations starting from 12th December. Candidates are also required to bring a self-declaration form with Holtikita when appearing for the examination. Fifty three lakh candidates have applied for 565 vacancies in various categories on the establishment of Maharashtra Housing and Regional Development Authority (MHADA). Many of these candidates have applied for more than one post. Therefore, MHADA has planned the examinations for different posts in different ways without conducting them on the same day.
Note: Candidates are being instructed as per the accompanying appendix regarding the outbreak of Covid-19 virus.
Candidates are being notified as per the standard procedure for Maharashtra Housing and Regional Development Authority Saralseva Recruitment 2021 examination in view of health safety of the candidates against the background of Kovid-19 virus outbreak:
1. Mask of at least three sheets on entering the examination center.
Wearing is mandatory.
2. Sanitizer facility will be provided at the examination center, its use is mandatory for both the sessions (if any).
3. Hands should be sanitized from time to time to maintain cleanliness as well as hygienic environment throughout the examination process.
4. In case of symptoms like Covid 19 such as fever, chills, cough, etc., the supervising officer / staff at the concerned examination center should be informed in advance. A separate meeting of such candidates will be arranged.
5. It is mandatory for candidates to maintain physical / social distance (Distancing) while entering and leaving the examination center.
6. Used tissue paper masks, gloves, sanitary pouches etc. should be disposed of in the rubbish bin.
7. All notices issued from time to time by Central and State Governments as well as local authorities in connection with the outbreak of Covid 19 virus.
Orders must be strictly obeyed.
No comments