स्वच्छतेची सवय काळाची गरज – वर्षा पाटोळे
केवळ आपले घर स्वच्छ ठेवून चालणार नाही, तर परिसराचीही नियमित स्वच्छता राखणे गरजेचे आहे. स्वच्छता हा सवयीचा भाग बनविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी केले.
सांगली, ता.२६ : राष्ट्रीय स्वच्छता माह निमित्त माहिती व प्रसारण मंत्रालय भारत सरकारच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणे, क्षेत्रिय लोकसंपर्क ब्युरो, कोल्हापूर विभाग आणि महिला बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद सांगली, नेहरू युवा केंद्र, ग्रामपंचायत भडकंबे यांच्या संयुक्त विद्यमाने वाळवा तालुक्यातील भडकंबे ग्रामपंचयात येथील प्रांगणात आयोजित केलेल्या स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भडकंबे ग्रामपंचायतचे सरपंच सुधीर पाटील तर मंचावर उपसरपंच मिनाक्षी भोईटे, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, कोल्हापूर विभागाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, मुंबई विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. प्रसाद ठाकूर, दिनकर पाटील, ग्रामविकास अधिकारी पुनम पाटील, सामाजिक कार्यकर्ते सोपान माळी, संजिवनी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.ए. पाटील, सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी प्रमोद खंडागळे, अभिजित पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
पाटोळे म्हणाल्या की, स्वच्छता विचारांमध्ये रूजून ती आचरणाचा अविभाज्य भाग व्हावी. विद्यार्थी जिवनापासूनच स्वच्छतेचे विचार लोकांच्या मनात रूजविण्यासाठी स्वच्छता हा शिक्षणाचा भाग व्हावा. निरोगी आयुष्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा, हवा, पाणी या मानवाच्या मूलभूत गरजा स्वच्छ आणि शुध्द स्वरूपात असणे आवश्यक आहे.
आबासाहेब पवार म्हणाले की, स्वच्छ भारताच्या संकल्पनेला पुर्णत्वास नेण्यासाठी लोकांच्या मनात स्वच्छतेविषयी जनजागृती निर्माण करण्याची गरज आहे. प्रकृतीने दिलेल्या संसाधनाचा योग्य वापर कसा करावा, पर्यावरणाची होणारी हानी कशी थांबवावी, आपले गाव कसे स्वच्छ ठेवावे, याबाबत कायम स्वरूपी मोहिम ग्रामपंचायत स्तरावर राबविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
डॉ. प्रसाद ठाकूर म्हणाले की, कचऱ्याची समस्या ही शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही आहे. त्यामुळे कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे, ही काळजी गरज बनली आहे. स्वच्छता ही संकल्पना केवळ स्वतः आणि घरापुरती मर्यादित न ठेवता ती गावपातळीवर आणि समाजापर्यंत पोहचविणे अत्यंत गरजेचे आहे. तेव्हाच आपण स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करू शकतो, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात सरपंच सुधीर पाटील म्हणाले की, स्वच्छतेविषयी ग्रामीण भागात लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. कुठलिही मोहिम एकट्या माणसाच्या प्रयत्नाने यशस्वी होत नसते. त्यात लोकसहभाग असणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी आपल्या घराच्या स्वच्छतेबरोबर गावाची स्वच्छता करण्याचाही संकल्प ठेवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रास्ताविक क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत यांनी केले. संचालन ऋतुजा कुलकर्णी हिने केले. तर आभार भानुदास पाटील (गुरूजी) यांनी मानले.
गावात आयोजित केलेल्या दोन दिवसीय कार्यक्रमात रांगोळी, चित्रकला, टाकाऊतून टिकाऊ स्पर्धा, स्वच्छ सुंदर अंगणवाडी स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच लोकसहभागातून गावात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
स्पर्धेतील विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. रांगोळी (ग्रामीण महिला) - प्रथम बक्षिस – सौ. उमा कुणाल पाटील, द्वितीय बक्षिस – कोमल राजेंद्र पाटील, तृतीय बक्षिस – सानिका संदीप पाटील, उत्तेजनार्थ – ऋतुजा शरद कुलकर्णी, दिव्या भगवान शिंगे. रांगोळी (अंगणवाडी सेविका) - प्रथम बक्षिस – संगीता भिमराव पवार, द्वितीय बक्षिस – जयश्री सदाशिव पाटील, तृतीय बक्षिस – सुरेखा सुरेश शिंदे, उत्तेजनार्थ – सरीता रंगराव पाटील, मिनाक्षी जयसिंग पाटील.
चित्रकला स्पर्धा - प्रथम बक्षिस – हर्षद संदीप पाटील, द्वितीय बक्षिस – कुणाल सुरेश सिसाळे, तृतीय बक्षिस – आर्यन अशोक बनसोडे, उत्तेजनार्थ – ऋग्वेद शरद कुलकर्णी, अथर्व राजेंद्र चौगुले. टाकाऊतून टिकाऊ स्पर्धा (मुलींसाठी ) - प्रथम बक्षिस – धनश्री आनंदा माळी, द्वितीय बक्षिस – आदिती गणपती सुतार, तृतीय बक्षिस – धनश्री प्रकाश माळी, उत्तेजनार्थ – प्रतिक्षा प्रकाश माळी, सई सज्जन पाटील.
The habit of cleanliness is the need of the hour - Varsha Patole
Not only keeping your house clean, but also keeping the premises clean is a must. It is necessary to make cleanliness a part of the habit, said District Information Officer Varsha Patole.
Sangli, 26 : On the occasion of National Sanitation Month, Swachh Bharat was organized by the Ministry of Information and Broadcasting, Government of India, Regional Public Relations Bureau, Pune, Regional Public Relations Bureau, Kolhapur Division and Women and Child Welfare Department, Zilla Parishad Sangli, Nehru Youth Center, Gram Panchayat Bhadkambe at Bhadkambe Gram Panchayat in Valva taluka. She was speaking at the campaign event.
The program was presided over by Bhadkambe Gram Panchayat Sarpanch Sudhir Patil while on the stage Deputy Sarpanch Meenakshi Bhoite, Group Development Officer Abasaheb Pawar, Regional Public Relations Bureau, Kolhapur Division Regional Publicity Officer Hansraj Raut, Mumbai University Professor Dr. Prasad Thakur, Dinkar Patil, Village Development Officer Poonam Patil, Social Worker Sopan Mali, Headmaster of Sanjivani Secondary School S.A. Patil, Assistant Regional Publicity Officer Pramod Khandagale, Abhijit Patil were present.
Mrs. Patole said that hygiene should be an integral part of conduct. Hygiene should be a part of education to inculcate the idea of cleanliness in the minds of the people from the very beginning of student life. For a healthy life, basic human needs like food, clothing, shelter, air, water must be in a clean and pure form.
Mr. Abasaheb Pawar said that in order to realize the concept of a clean India, there is a need to create awareness among the people about cleanliness. He said that there was a need to implement a permanent campaign at the Gram Panchayat level on how to make proper use of the resources provided by nature, how to stop the damage to the environment, how to keep our village clean.
Dr. Prasad Thakur said that the problem of waste is not only in urban areas but also in rural areas. Therefore, proper waste management has become a necessity. It is imperative that the concept of cleanliness is not limited to oneself and the household but is extended to the village level and the community. Only then can we realize the dream of a clean India, he said.
In his presidential address, Sarpanch Sudhir Patil said that awareness about cleanliness is being spread among the people in rural areas. No campaign succeeds by the efforts of a single man. It needs public participation. Therefore, the villagers should resolve to clean the village along with the cleanliness of their houses, he appealed at this time.
The introductory speech was made by Hansraj Raut, Regional Publicity Officer. Conducted by Rituja Kulkarni. Thanked by Bhanudas Patil (Guruji).
The two-day program organized in the village included rangoli, painting, sustainable competitions from waste, clean and beautiful anganwadi competitions. Also, a cleaning campaign was carried out in the village through public participation.
The names of the winners of the competition are as follows. Rangoli (Rural Women) - First Prize - Mrs. Uma Kunal Patil, Second Prize - Komal Rajendra Patil, Third Prize - Sanika Sandeep Patil, Encouragement - Rituja Sharad Kulkarni, Divya Bhagwan Shinge. Rangoli (Anganwadi Sevika) - First Prize - Sangeeta Bhimrao Pawar, Second Prize - Jayshree Sadashiv Patil, Third Prize - Surekha Suresh Shinde, Encouragement - Sarita Rangrao Patil, Meenakshi Jaisingh Patil.
Painting Competition - First Prize - Harshad Sandeep Patil, Second Prize - Kunal Suresh Sisale, Third Prize - Aryan Ashok Bansode, Encouragement - Rigveda Sharad Kulkarni, Atharva Rajendra Chowgule. Sustainable Competition from Waste (for girls) - First Prize - Dhanashree Ananda Mali, Second Prize - Aditi Ganpati Carpenter, Third Prize - Dhanashree Prakash Mali, Encouragement - Pratiksha Prakash Mali, sai Sajjan Patil.
No comments