परीक्षार्थीं विद्यार्थ्यांच्या खर्च शासनाने करावा :- मनसे विद्यार्थी सेनेची मागणी.
![]() |
जिल्हाधिकारी आर.विमला यांना निवेदन देतांना मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी |
नागपूर - महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना नागपुरतर्फे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या मार्गदर्शनात शहर अध्यक्ष विशाल बडगे, शहर विद्यार्थी सेनेचे विदर्भ प्रभारी आदित्य दुरुगकर यांच्या उपस्थितीत विद्यार्थी सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष गौरव पुरी यांच्या नेतृत्वात नागपूरचे जिल्हाधिकारी आर. विमला यांना निवेदन देण्यात आले. मागील महिन्यात २४ सप्टेंबरला राज्यभरात होणाऱ्या आरोग्य विभागाच्या क आणि ड वर्गातील विविध पदांसाठी होणारी परीक्षा रद्द करण्यात आली. सदर परीक्षा रद्द झाली या बाबत माहिती ही एका दिवस अगोदर प्रसार माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळाली. आधीच कोरोना मुळे लोकांनाकडे काम नाही तसेच पैसा नाही. ज्या मुलानी इतके दिवस अभ्यास करून या परीक्षेची तयारी केली,सेंटर वर एका दिवसा अगोदर परीक्षार्थी पोहचले होते, ज्यांना दूरवरचे सेंटर मिळालेले होते त्यांनी आधीच येण्या-जाण्याकरिता बुकिंग केलेली होती त्या सर्व परिक्षार्थीचे या सरकारच्या चुकीमुळे नुकसान झालेले आहे. तरी भविष्यात होणाऱ्या आरोग्य विभागाच्या परीक्षेत सरकारने परिक्षार्थींसाठी येण्या-जाण्याचा खर्च, व जेवणाची सुविधा करावी या मागणीसाठी निवेदन देण्यात आले. यावेळी शहर सचिव घनश्याम निखाडे, दक्षिण विभाग अध्यक्ष पिंटू बिसेन, पूर्व विभाग अध्यक्ष उमेश उत्तखेडे उपस्थित होत.
Expenditure of students should be borne by the government: - Demand of MNS Vidyarthi Sena.
Nagpur - Maharashtra Navnirman Vidyarthi Sena Nagpur under the guidance of State General Secretary Hemant Gadkari in the presence of City President Vishal Badge, Vidyarbha in-charge of City Vidyarthi Sena Aditya Durugkar and Deputy District President of Vidyarthi Sena Gaurav Puri. A statement was given to Vimala. 24 September The examinations for various posts in the C and D classes of the health department across the state were canceled. Already because of Corona people have no job and no money. All the candidates who had studied for so many days and prepared for the exam, who had arrived at the center a day earlier, who had received the distant center and who had already booked to come and go, have been harmed by the government's mistake. However, in the forthcoming health department examinations, a statement was issued demanding that the government provide travel and meal facilities for the candidates. City Secretary Ghanshyam Nikhade, South Division President Pintu Bisen and East Division President Umesh Uttakhede were present on the occasion.
No comments