Breaking News

कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम घरोघरी जाऊन राबवा !: नाना पटोले

 


काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र.

१ मे नंतर तर १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यावेळी लसीकरण केंद्रावरील गर्दी वाढून संसर्ग वाढण्याचा धोका जास्त आहे. लसीकरणातील या सर्व अडचणी दूर करून ‘घरोघरी जाऊन कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहिम’ राज्य सरकारने हाती घ्यावी
 
मुंबई,ता. २१ : कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यात लसीकरण प्रभावी ठरत असल्याचे विविध देशातील लसीकरणावरून दिसत आहे. महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम हाती घेण्यात आलेली आहे. परंतु राज्य सरकारने सध्या लावलेल्या कठोर निर्बंधांमुळे सर्वसामान्यांना लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेण्यास अडचणी येत आहेत. ग्रामीण भागात लसीकरण केंद्रे संख्येने कमी व दूर अंतरावर असल्याने प्रवास करून केंद्रावर जाऊन लस घेणे लोकांसाठी जिकिरीचे ठरत आहे.  १ मे नंतर तर १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यावेळी लसीकरण केंद्रावरील गर्दी वाढून संसर्ग वाढण्याचा धोका जास्त आहे. लसीकरणातील या सर्व अडचणी दूर करून ‘घरोघरी जाऊन कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहिम’ राज्य सरकारने हाती घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

पटोले यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, कोरोनावर मात करण्यासाठी आपली यंत्रणा सर्व पातळ्यांवर काम करत आहे. परंतु कोरोनावर मात करण्याकामी लसीकरण हेच जगभरात प्रभावी अस्त्र ठरलेले आहे. इस्त्राइल सारख्या छोट्या देशाने ते करून दाखवले आहे. अमेरिका, ब्रिटनसह इतर देशानेही लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणावर राबविल्याने कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. महाराष्ट्रानेही देशात लसीकरणात मोठी आघाडी घेऊन १ कोटीपेक्षा जास्त लसीकरण केले आहे. ही लसीकरण मोहिम राबवण्यासाठी मनुष्यबळही मोठ्या प्रमाणात लागणार आहे हे लक्षात घेऊन सरकारी यंत्रणेबरोबरच, खाजगी रुग्णालयातील कर्मचारी वर्ग, स्वयंसेवी संस्था-संघटनांची मदत घेता येईल. पोलिओ या महामारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी देशपातळीवर मोठ्या प्रमाणात अशीच मोहिम राबवण्यात आली होती. याचधर्तीवर घरोघरी जाऊन कोरोनाची लस दिली तर कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात मोठे यश येईल.

कोरोना महामारीने मानवजातीसमोरच गंभीर संकट उभे ठाकले असून दुसऱ्या लाटेत संक्रमण मोठ्या वेगाने होत आहे. शहरी भागात मोठ्या प्रमाणात पसरलेले हे संक्रमण आता गाव-खेड्यातही मोठ्या प्रमाणात पोहचले आहे. वर्षभरापासून आपण या संकटाचा सामना करत आहोत. रुग्णालयात बेड्स मिळत नाहीत, रेमडेसीवीर, ऑक्सीजनअभावी दररोज लोकांचे जीव जात आहेत हे भयानक चित्र पहावत नाही. एकीकडे जीवितहानी होत असताना अर्थचक्रही सुरुळीत चालण्यात अडथळे येत आहेत. कोरोनामुळे वर्षभरात सर्वच क्षेत्राला मोठा फटका बसलेला आहे. या संकटावर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण करावे ही काँग्रेस पक्षाची पहिल्यापासूनची आग्रही मागणी राहिली आहे. काँग्रेसच्या मागणीचा विचार करून आपण योग्य तो निर्णय घ्यावा, असे नाना पटोले म्हणाले.

नाशिक महानगरपालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रूग्णालयातील दुर्घटनेत २२ रूग्णांचा मृत्यू झाल्याचे वृत्त ह्रदय पिळवटून टाकणारे आहे. काँग्रेस पक्ष मृतांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. असे नाना पटोले  यांनी आपल्या ट्विटर वरून प्रतिक्रिया दिल्या  आहेत.  



 
Corona vaccination campaign should be carried out from house to house !: Nana Patole
Letter of Congress State President to Chief Minister Uddhav Thackeray.

 After May 1, everyone over the age of 18 will be vaccinated. At that time, the risk of infection is high due to overcrowding at the vaccination center. Maharashtra Pradesh Congress Committee (MPCC) president Nana Patole has demanded that the state government should take up the campaign of door-to-door corona vaccination by removing all these problems in vaccination.

Mumbai, Tal. 21: Vaccination in various countries shows that vaccination is effective in preventing the increasing prevalence of corona. A large scale vaccination campaign has also been launched in Maharashtra. But due to the strict restrictions imposed by the state government, it is becoming difficult for the general public to go to the vaccination center and get vaccinated. In rural areas, the number of vaccination centers is small and far away, making it difficult for people to travel to the center to get vaccinated. After May 1, everyone over the age of 18 will be vaccinated. At that time, the risk of infection is high due to overcrowding at the vaccination center. Maharashtra Pradesh Congress Committee (MPCC) president Nana Patole has demanded that the state government should take up the campaign of door-to-door corona vaccination by removing all these problems in vaccination.
Patole has written a letter to Chief Minister Uddhav Thackeray in this regard. In the letter, he said, our system is working at all levels to overcome the corona. But corona vaccination is the most effective weapon in the world. A small country like Israel has done it. The number of corona cases has been curtailed due to large scale vaccination campaigns by the United States, Britain and other countries. Maharashtra has also taken the lead in vaccination in the country and has vaccinated more than 1 crore. Considering that a large number of manpower will be required to carry out this vaccination campaign, the help of private hospital staff, NGOs can be availed along with government agencies. A similar nationwide campaign was launched to eradicate the polio epidemic. Similarly, if the corona vaccine is given at home, it will be a great success in controlling the number of corona patients.
The Corona epidemic poses a serious threat to mankind, with the second wave of infections spreading rapidly. The infection, which was widespread in urban areas, has now spread to rural areas. We have been facing this crisis for years. There are no beds in the hospital, no remedies, no oxygen deprivation. On the one hand, while the lives are being lost, the economy is also facing obstacles in running smoothly. The corona has hit the region hard all year. The Congress party has always insisted on large-scale vaccinations to overcome the crisis. We should take the right decision considering the demands of the Congress, said Nana Patole.


Dr. Nashik Municipal Corporation. The news that 22 patients died in an accident at Zakir Hussain Hospital is heart wrenching. The Congress party shares the grief of the families of the deceased. The incident should be thoroughly investigated and strict action should be taken against the culprits. This is what Nana Patole has responded on his Twitter.

No comments