Breaking News

फ्रान्समधील चौकशीतून “चौकीदार ही चोर है” हे सिद्ध झालेः नाना पटोले

 राफेल विमान खरेदीत प्रचंड मोठा घोटाळा झाल्याचे फ्रान्समधील भ्रष्टाचार प्रतिबंध संस्थेने केलेल्या चौकशीतून उघड

मुंबई ५ : राफेल लढाऊ विमान खरेदीत प्रचंड मोठा घोटाळा झाल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उघड केले होते. मात्र सातत्याने खोटे बोलून व खोटी कागदपत्रे दाखवून केंद्र सरकारने या घोटाळ्यावर पांघरून घालण्याचे काम केले होते. मात्र राफेल लढाऊ विमान खरेदी करारानंतर डसॉल्ट कंपनीने भारतीय मध्यस्थाला एक दशलक्ष युरोंची लाच दिल्याचे फ्रान्समध्ये सुरु असलेल्या चौकशीतून समोर आले असून चौकीदार ही चोर है हे सिद्ध झाले आहे अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
         
यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, भारत आणि फ्रान्समध्ये राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीबाबत २०१६ मध्ये करार झाला. त्यानंतर डसॉल्टने भारतातील मध्यस्थाला एक दशलक्ष युरो एवढी रक्कम दिली. २०१७ मध्ये डसॉल्ट ग्रुपच्या बँक खात्यातून 'गिफ्ट टू क्लाएंट' म्हणून ही रक्कम ट्रान्सफर करण्यात आली होती. फ्रान्समधील भ्रष्टाचारविरोधी तपास संस्था AFA ने डसॉल्टच्या बँक खात्यांचे ऑडिट केल्यानंतर ही बाब समोर आली आहे. यावरून राफेल खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाले आहे. राहुल गांधी व काँग्रेस पक्षाने सातत्याने मागणी केल्याप्रमाणे या खरेदी कराराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी केल्यास या प्रकरणाचे सत्य समोर येऊन खरे चोर सापडतील असे नाना पटोले म्हणाले.

An investigation in France proved that "the watchman is a thief": Nana Patole

An investigation by the Anti-Corruption Agency in France has revealed that there was a huge scam in the purchase of the Raphael aircraft

Mumbai 5: Congress leader Rahul Gandhi had revealed that there was a huge scam in the purchase of Raphael fighter jets. However, the central government had covered up the scam by constantly lying and showing false documents. However, an investigation in France has revealed that Dassault paid a bribe of one million euros to an Indian intermediary following the Raphael fighter jet purchase deal. , India and France reached an agreement in 2016 on the purchase of Raphael fighter jets. Dassault then paid the Indian intermediary one million euros. The money was transferred from Dassault Group's bank account in 2017 as a 'gift to client'. The matter came to light after the French anti-corruption agency AFA audited Dassault's bank accounts. This proves that there was a lot of corruption in the purchase of Raphael. Nana Patole said that if the purchase agreement is investigated through a joint parliamentary committee as demanded by Rahul Gandhi and the Congress party, the truth of the matter will come out and the real thief will be found.

No comments