ग्यारापत्ती पोलीस मदत केंद्रात महिलांचा सत्कार
ग्यारापत्ती पोलीस मदत केंद्रात महिला दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर
गडचिरोली जिल्हा पोलीस प्रशासनाच्या अंतर्गत
ग्यारापत्ती
पोलीस मदत केंद्र येथे जागतिक महिला दिनामिनीत्त विविध स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांचे सत्कार करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शासकीय माध्यमिक शाळा ग्यारापत्ती येथील कल्पना चौधरी, गडचिरोली जिल्हा परिषदच्या लता पुंगाटी, आरोग्य सेविका
पुजा चौबे, सारंग ढोक,
लाॅयंस क्लब नागपुरचे शैलेश डोमळे ,सीआरपीफचे गणवीर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज, शाहु महाराज, सावित्रीबाई फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, बिरसा मुंडा या थोर महापुरूषांच्या प्रतीमांना पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
महिलांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्याकरीता रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा, सांस्कृती नृत्य अश्या विविध स्पर्धेसह आरोग्य तपासणी शिबिर, विद्यार्थांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थिनी व महिलाच्या आरोग्याची तपासणी करून आरोग्य सेविकाकडुन औषध देण्यात आले. संजय गांधी योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, कन्यांच्या कल्याणासाठी सुरणासाठी योजना, जीवन ज्योती विमा योजना, आदीवासी विकास विभागाच्या योजना, जात प्रमाणपत्र या शासकीय योजनांच्या नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. महीलांच्या आरोग्याची काळजी घेत साड्या, ब्लॅकेट, सॅनीटरी पॅडचे वाटप करण्यात आले.
संगित खुर्ची, रांगोळी स्पर्धा, सांस्कृती कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट कला सादर करणाऱ्यांस प्रथम क्रमांकाचे ५००/-, द्वितीय क्रमांकाचे २००/-, तृतीय क्रमाकाचे १००/- रू. रोख बक्षिस देण्यात आले. शालेय विद्यार्थीनींकरीता स्पर्धा परीक्षेविषयी मार्गदर्शन करून त्यांना स्पर्धा परीक्षांचे, थोर महीलांचे, तसेच व्यक्तीमत्व विकासाचे पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
पोलीस अधिक्षक गडचिरोलीचे अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) कलवाणीया, अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) शेख,
धानोरा
उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिन 'भव्य महिला मेळाव्याला ' विशेष सहकार्य लाभले.
यावेळी कार्यक्रमाला
ग्यारापत्ती
पोलीस मदत केंद्राचे पोलीस कर्मचारी व शाळेतील विद्यार्थीसह गावातील नागरिक उपस्थित होते.
Women felicitated at Gyarapatti Police Helpline
Gadchiroli: Women who participated in various competitions on the occasion of International Women's Day were felicitated at Gyarapatti Police Helpline under Gadchiroli District Police Administration. The chief guests of the program were Kalpana Chaudhary of Government Secondary School Gyarapatti, Lata Pungati of Gadchiroli Zilla Parishad, Arogya Sevikapuja Choubey, Sarang Dhok, Shailesh Domle of Lions Club Nagpur and Ganveer of CRPF. Chhatrapati Shivaji Maharaj, Shahu Maharaj, Savitribai Phule, Dr. Wreaths were offered to the statues of Babasaheb Ambedkar and Birsa Munda and lamps were lit by the dignitaries.
In order to give impetus to the latent qualities of women, various competitions such as rangoli competition, music chair competition, culture dance, health check-up camp, competitive examination guidance program were organized for the students. The health of the students and women who participated in the competition was checked and medicine was given by the health workers.
Awareness was created among the citizens of government schemes like Sanjay Gandhi Yojana, Indira Gandhi National Old Age Retirement Scheme, Indira Gandhi National Widow Scheme, Shravan Bal Seva Rajya Nivruti Vetan Yojana, Surana Scheme for Girls' Welfare, Jeevan Jyoti Vima Yojana, Tribal Development Department Scheme, Caste Certificate. Taking care of women's health, sarees, blankets and sanitary pads were distributed.
500 / - for first place, Rs. 200 / - for second place, Rs. 100 / - for third place will be given to the best performers in music chair, rangoli competition, cultural program. Cash prizes were awarded. The school girls were given guidance on competitive exams and distributed books on competitive exams, senior women and personality development. Under the guidance of Superintendent of Police Gadchiroli's Ankit Goyal, Upper Superintendent of Police (Campaign) Kalwania, Upper Superintendent of Police (Administration) Sheikh, Dhanoraup Sub-Divisional Police Officer Jadhav, the International Women's Day 'Grand Women's Gathering' received special support. The event was attended by police personnel of Gyarapatti Police Help Center and students of the school as well as villagers.
No comments