Breaking News

कोविड-१९ लसीकरण जनजागृतीसाठी मोबाईल चित्ररथ प्रभावी ठरेल : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


कोविड-१९ लसीकरणाविषयी असलेले गैरसमज आणि अफवांबाबत जनतेला जागृत करणे, आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी सरकारकरीत असलेल्या प्रयत्नांची माहिती फिरत्या बहुमाध्यमी प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांना करून देण्यात येणार आहे.

सांगली  : कोरोना महामारीवर मात करण्यासाठी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, शारिरीक आंतर पाळणे या त्रिसुत्रीचा वापर प्रभावीपणे करत रहाणे आवश्यक आहे. आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत लसीकरणाची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेला चित्ररथ जिल्ह्यात प्रभावी कामगिरी बजावेल. कोरोना लस ही सुरक्षित असून कोणही अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
      माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणेच्या अधिनस्त क्षेत्रिय लोकसंपर्क ब्युरो, कोल्हापूर यांच्या उपक्रमांतर्गत कोविड-19 लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत या विषयावर सांगली जिल्ह्यातील विविध तालुक्यात जनजागृतीसाठी तयार केलेल्या बहुमाध्यमी मोबाईल व्हॅनवरील फिरत्या प्रदर्शनाचे तसेच कलापथक मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याहस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, कोल्हापूर विभागाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, क्षेत्रीय प्रचार सहायक प्रमोद खंडागळे, जिल्हा माहिती कार्यालयाचे माहिती सहायक रणजित पवार उपस्थित होते.
       जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, लसीकरणाबाबत पारंपारिक कलेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. यामुळे पारंपारिक कला जोपासणाऱ्या कलाकारांना व त्यांच्या कलागुणांना समाजासमोर सादर करण्यासाठी या मोबाईल चित्ररथामुळे संधी मिळेल.



 माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणे यांच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ आणि आरोग्य विभाग, महाराष्ट्र यांचे सहकार्य लाभले आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात 16 व्हॅन्सव्दारे फिरते बहुमाध्यमी प्रदर्शन आयोजित करून तसेच कलापथकांच्या माध्यमातून लोकांमध्ये कोविड लसीकरण मोहिम आणि आत्मनिर्भर भारत अभियानाबद्दल जनजागृती निर्माण करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, कोल्हापूरच्या वतीने सांगली जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावांमध्ये 10 दिवस व्हॅन्सव्दारे फिरते बहुमाध्यमी प्रदर्शनाच्या माध्यमातून ही मोहिम राबविण्यात येत आहे.
           या उपक्रमांतर्गत लसीकरणाबाबतची माहिती, आत्मनिर्भर भारत अंतर्गत विविध उपक्रम आणि कोविड विषयक नियमांबाबतची माहिती जिल्ह्यातील नागरीकांपर्यंत पोहचविणे हा या मागील उद्देश आहे. लसीकरणाविषयी असलेले गैरसमज आणि अफवांबाबत जनतेला जागृत करणे, आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी सरकारकरीत असलेल्या प्रयत्नांची माहिती फिरत्या बहुमाध्यमी प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांना करून देण्यात येणार आहे.
      यावेळी कलापथकातील कलाकारांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे सादरीकरण करून लोकांपर्यंत जनजागृती संदेश पोहचविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जनजागृती मोहिमेसाठी जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालयाचे सहकार्य लाभले आहे.
      या मोहिमेच्या यशस्वितेसाठी प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणेचे संचालक संतोष अजमेरा यांच्या मार्गदर्शनात क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, कोल्हापूरचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, क्षेत्रीय प्रचार सहायक प्रमोद खंडागळे, एन. डी. नाळे, विलास शेणवी, कलापथकाचे शिवा संभा कलापथकाचे अवधुत पवार व त्यांच्या चमुचे सदस्य परिश्रम घेत आहेत.


Covid-19 vaccination for public awareness through the display of a mobile van

 Awareness about the misconceptions and rumors about Kovid-19 vaccination, the government's efforts to build a self-reliant India will be made known to the people through a mobile multimedia exhibition.

Mobile Chitrarath will be effective for covid vaccination and self-reliant India. Abhijeet Chaudhary

Sangli : To overcome the corona epidemic, it is necessary to use masks, wash hands frequently, and observe physical intercourse. Chitrarath, designed to provide information on vaccination under the Atmanirbhar Bharat Yojana, will be effective in the district. 
     Corona vaccine is safe and should be vaccinated without believing any rumors, appealed District Collector Dr. Abhijeet Chaudhary. Under the initiative of Regional Public Relations Bureau of the Ministry of Information and Broadcasting, Regional Public Relations Bureau, Pune, Kolhapur. It was done by Abhijeet Chaudhary. He was talking at the time. On this occasion, District Information Officer Varsha Patole, District Surgeon Dr. Sanjay Salunkhe, District Health Officer Milind Pore, Regional Public Relations Bureau, Kolhapur Division Regional Publicity Officer Hansraj Raut, Regional Publicity Assistant Pramod Khandagale, District Information Office Information Assistant Ranjit Pawar were present. Abhijeet Chaudhary said that awareness about vaccination is being spread through traditional art. This will give an opportunity to the artists who cultivate traditional art and present their artistic talents to the society. 
   The initiative is being implemented by the Ministry of Information and Broadcasting, Regional Public Relations Bureau, Government of India, Pune. This is in collaboration with the World Health Organization, UNICEF and the Department of Health, Maharashtra. Under this initiative, a multi-medium exhibition is being organized in 36 districts of Maharashtra through 16 vans and awareness is being created among the people about Kovid Vaccination Campaign and Self-Reliant India Campaign through art troupes. As a part of the same, the campaign is being implemented by the Regional Public Relations Bureau, Kolhapur in the villages of various talukas of Sangli district through a 10-day multi-medium exhibition through vans. 
     The purpose of this initiative is to provide information about vaccination, various initiatives under Self-Reliance India and the rules regarding covid to the citizens of the district. To create awareness among the people about the misconceptions and rumors about vaccination, the government's efforts to build a self-reliant India will be made known to the people through a mobile media exhibition. Awareness message will be conveyed to the people by presenting the program through the artists of the art troupe. The District Health Department and the District Information Office have been involved in the public awareness campaign in the district.
    For the success of this campaign, under the guidance of Santosh Ajmera, Director, Regional Public Relations Bureau, Pune, Hansraj Raut, Regional Publicity Officer, Kolhapur, Pramod Khandagale, Regional Publicity Assistant, N.P. D. Nala, Vilas Shenvi, Shiva Sambha of Kalapathak, Avadhut Pawar of Kalapathak and their team members are working hard.

No comments