Breaking News

६४ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन बौद्ध अनुयायांकडून सुरक्षेचे नियम पाळत अभिवादन


नागपूर : कोविड19 महामारीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून ६४ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आज दसरा- विजयादशमीला बौद्ध अनुयायांनी दीक्षाभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांना अभिवादन केले.   
    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगून यंदा अनुयायांनी धम्मचक्र प्रवर्तन दिन घरीच साधेपणाने साजरा करावा. घरातच तथागत गौतम बुध्द तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना करुन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी प्रशासनाच्यावतीने बौद्ध अनुयायांना केले होते. केंद्र व राज्य शासनाच्या साथरोग प्रतिबंधक निर्णयानुसार दरवर्षी विजयादशमीला साजरा करण्यात येणाऱ्या ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ या वर्षी घरीच साजरा करावा असे आवाहन केले होते.  
     पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, स्थानिक प्रशासन आणि स्मारक समितीने केलेल्या आवाहनाला अनुयायांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे दिवसभर बौद्ध अनुयायी अत्यंत मोजक्या उपस्थितीत साधेपणाने मात्र सुरक्षिततेचे नियम पाळत व मास्क लावून पवित्र दीक्षाभूमीवर येत अभिवादन केले.   


   दरवर्षी दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती भव्य सोहळ्याचे आयोजन करत असते. या भव्य सोहळ्याला देश-विदेशातून बौद्ध अनुयायी उपस्थित राहतात. मात्र, यावर्षी जागतिक महामारीने संपूर्ण जग थांबले आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने सर्व कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, याची संपूर्ण खबरदारी घेतली. परिणामी दिवसभर दीक्षाभूमी येथे अनेक अनुयायांनी येऊन अत्यंत साधेपणाने अभिवादन केले. कोविड19 च्या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमी परिसरात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. त्यामुळे अनुयायांनी प्रवेशद्वारावरुन अभिवादन केले.
   समता सैनिक दलाचे राष्ट्रीय संघटक मार्शल सुनील सारीपुत्तजी, राष्ट्रीय बौद्धिक प्रमुख मार्शल प्रकाश दार्शनिक, केंद्रीय समिती सदस्य मार्शल किशोर चहांदे, महाराष्ट्र राज्य संघटक मार्शल अविनाश दिग्विजय, तेलंगाणा राज्य संघटक मार्शल रविचंद्र जाभाडे यावेळी उपस्थित होते. 
 यावेळी समता सैनिक दलाने रितेश गायमुखे यांच्या नेतृत्वात पथसंचलन करत मानवंदना दिली. दीक्षाभूमी परिसरात पिण्याच्या पाण्याची सुविधा, मोबाईल टॉयलेट्स, रुग्णवाहिका, अग्नीशामक दलाचे पथके तैनात करण्यात आली.  


                         स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले यांच्याकडून जनतेचे आभार

यावर्षी कोविड 19 महामारीच्या प्रादुर्भावामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने सर्व जनतेला आणि बौद्ध अनुयायांना आवाहन केले होते. यावर्षीचा धम्मचक्र प्रवर्तन दिन आपापल्या घरुनच साजरा करावा, जेणेकरुन कोविड19 चा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होणार नाही. जनतेनेही स्मारक समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपापल्या घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देत अभिवादन केले. त्याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले यांनी आभार मानले.



Greetings from Buddhists on the occasion of Dhamma Chakra Enforcement Day


Nagpur: Against the backdrop of Kovid 19 epidemic, following all safety rules, on the occasion of the 64th Dhamma Chakra Enforcement Day, today on Dussehra-Vijayadashami, Buddhist followers paid homage to Dr. Bharat Ratna at Deekshabhoomi. Greeted Babasaheb Ambedkar and Tathagata Gautam Buddha. This year, followers should simply celebrate Dhamma Chakra Pravartan Day at home with vigilance against the backdrop of the corona. At home, Tathagata Gautam Buddha and the great man Dr. Salute to Babasaheb Ambedkar and appeal to the administration to cooperate. Nitin Raut had made Buddhist followers on behalf of the administration. It was appealed that the Dhamma Chakra Pravartan Din, which is celebrated every year on Vijayadashami, should be celebrated at home as per the Central and State Government's communicable disease prevention decision. Guardian Minister Dr. The followers spontaneously responded to the call made by Nitin Raut, the local administration and the memorial committee. Therefore, throughout the day, in the presence of very few Buddhists, they simply came to the holy initiation ground, following the rules of safety and wearing masks. Every year on the occasion of Dussehra and Dhamma Chakra enforcement day, Dr. Babasaheb Ambedkar Memorial Committee organizes grand ceremonies. This grand ceremony is attended by Buddhist followers from home and abroad. However, this year the global epidemic has stopped the whole world. Therefore, Dr. The Babasaheb Ambedkar Memorial Committee took utmost care that the incidence of all corona should not increase. 



As a result, many followers came to Deekshabhoomi throughout the day and greeted him very simply. Security was maintained at the initiation ground in the background of Kovid 19. So the followers greeted from the entrance. Samata Sainik Dal National Organizer Marshal Sunil Sariputtaji, National Intellectual Chief Marshal Prakash Darshanik, Central Committee Member Marshal Kishor Chahande, Maharashtra State Organizer Marshal Avinash Digvijay, Telangana State Organizer Marshal Ravichandra Jabhade were present on the occasion. On this occasion, Samata Sainik Dal led by Riteish Gaimukhe paid homage. Drinking water facilities, mobile toilets, ambulances, fire brigade teams were deployed in the initiation ground area.
Secretary of the Memorial Committee Dr. Public thanks from Sudhir Fulzele
Due to the outbreak of Kovid 19 epidemic this year, Dr. The Babasaheb Ambedkar Memorial Committee had appealed to all the people and Buddhist followers. This year's Dhamma Chakra Enforcement Day should be celebrated at home so that the incidence of Kovid 19 does not increase. The people also responded to the call of the memorial committee from their own homes. He paid homage to Babasaheb Ambedkar. Dr. about that. Secretary of Babasaheb Ambedkar Memorial Committee Dr. Sudhir Fulzele thanked.
******

No comments