Breaking News

डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा संबंध ' शिक्षक दिनाशी ' कसा ...?

पहिला भारतीय शिक्षक होण्याचा मानाचा मुकुट सावित्रीबाई फुले यांच्याकडेच जातो. माजी राष्ट्रपती एक थोर भारतीय विचारवंत  व विद्वान म्हणून  राधाकृष्णन  यांची जयंती जरूर साजरी व्हावी जयंतीदिनी अभिवादन करावे इतर कार्यक्रम घ्यावेत  शिक्षक दिन म्हणून त्यांचा जन्मदिन साजरा करणे म्हणजे सावित्रीबाईंचा अधिकार हिरावून घेण्यासारखे आहे समकालीन विचारवंतांनी यावर चर्चा करणे आवश्यक आहे.  असे मत प्राध्यापक डॉ.नारायण बा पाटील यांनी शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येस शासनास लिहिलेले पत्र  सध्या  वॉट्सअपवर   चर्चेचा विषय झाला आहे, काय लिहिले आहे पत्रात वाचा... 

मा. ना. वर्षा गायकवाड ( मंत्री शालेय शिक्षण)

मा. ना. उदय सामंत (मंत्री उच्च व तंत्रशिक्षण) 

मा. ना. धनंजय मुंडे (मंत्री सामाजिक न्याय) 
विषय शिक्षक दिना बाबत.......
सस्नेह नमस्कार विनंती की शिक्षक दिना बाबत खालील विचारांकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो 



शिक्षक दिनाशी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन  यांचा संबंध कसा?
कोणताही दिवस साजरा करण्यासाठी त्याचा सन्मान आद्य प्रवर्तक व्यक्तिमत्त्वाकडे देण्याचा प्रघात आहे पहिली  परिचारिका लॉरेन्स नाइटिंगेल यांचे जयंतीदिनी  परिचारिका दिवस,
पहिला इंजिनियर विश्वेश्वरय्या त्याच्या जयंतीदिनी  इंजीनियर्स डे साजरा केला जातो   भारतात शिक्षक दिन डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती दिनी का साजरा केला जातो हे कोडे खूपच अनाकलनीय आहे  भारतात तील पहिला शिक्षक कोण याचा शोध घेतला, इतिहासाला विचारले तरी भारतात पहिला शिक्षक म्हणून सावित्रीबाई फुले यांचे नाव इतिहासात अमर झालेले आहे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात  मुलींसाठी पहिली शाळा 1848 यावर्षी काढली आणि सर्वपल्ली यांचा जन्म  1888 या वर्षीचा आहे डॉ *सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म देखिल झाला नव्हता त्यांच्या 40 वर्ष आधीच सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी पुण्यात अस्पृश्यांसाठी आणि मुलींसाठी पहिल्या शाळा काढून त्यात शिक्षक म्हणुन सावित्रीबाईंनी काम सुरू केले होते हे देशाच्याच नव्हे तर इंग्लंडच्या इतिहासातही लिहिले आहे* त्याआधी मुंबई-पुणे कलकत्ता आदी महत्त्वाच्या शहरांमध्ये मिशनरी शाळा होत्या परंतु त्यात शिक्षक म्हणून ख्रिस्ती मिशनरी अथवा धर्मगुरू काम करीत असल्याने *पहिला भारतीय शिक्षक होण्याचा मानाचा मुकुट सावित्रीबाई फुले यांच्याकडेच जातो* माजी राष्ट्रपती एक थोर भारतीय विचारवंत  व विद्वान म्हणून  राधाकृष्णन  यांची जयंती जरूर साजरी व्हावी जयंतीदिनी अभिवादन करावे इतर कार्यक्रम घ्यावेत  शिक्षक दिन म्हणून त्यांचा जन्मदिन साजरा करणे म्हणजे सावित्रीबाईंचा अधिकार हिरावून घेण्यासारखे आहे समकालीन विचारवंतांनी यावर चर्चा करणे आवश्यक आहे


राधाकृष्णन यांचे कार्य काय?
डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म तामिळनाडू राज्यात एका ब्राह्मण कुटुंबात झाला ते खूप हुशार होते शिक्षण घेऊन ते तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक झाले ,दर्शन शास्त्र हा विषय विद्यापीठात शिकवू लागले आपल्या बुद्धी सामर्थ्याचा  जोरावर त्यांनी विद्यापीठाचे कुलगुरुपद प्राप्त केले भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ते नेहरूंचा खूप जवळ गेले त्यानंतर ते बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू झाले त्यानंतर ते रशियाच्या दौऱ्यावर गेले त्यानंतर पुन्हा परतल्यानंतर नंतर ते देशाचे उपराष्ट्रपती झाले
डॉ राजेंद्र प्रसाद यांच्या नंतर ते देशाचे राष्ट्रपती झाले त्यांनी लिहिलेली पुस्तके लेख आणि भाषणे यातून भारतीय संस्कृती  आणि अध्यात्मिक तत्त्वज्ञानाचा आढावा घेतला आहे याव्यतिरिक्त राधाकृष्णन यांचा जीवन परिचय अथवा चरित्रात काहीही विशेष आढळत नाही त्यांच्या जीवन कार्यात त्यांनी कुठेही गोरगरिबांसाठी एखादी शाळा काढण्याचे दिसत नाही विद्यापीठ उभारल्याचे दिसत नाही किंवा जनसामान्यांसाठी कोणतेही भरीव कार्य केल्याचे आढळून येत नाही ज्या पद्धतीने राज्यातल्या व देशातल्या समाजधुरीणांनी शिक्षण महर्षी आणि कर्मवीरांनी  शाळा शिक्षण संस्था विद्यापीठे बहुजनांसाठी उभारली आणि शिक्षणाची गंगा तळागाळातल्या समाज घटकांपर्यंत नेली त्या प्रकारे राष्ट्रपती होऊनही राधाकृष्णन यांनी सर्वसामान्य माणसांसाठी शैक्षणिक क्षेत्रात काही केल्याचे दिसून येत नाही *इतकेच काय ज्या ब्राह्मण समाजात त्यांचा जन्म झाला त्या ब्राह्मण समाजातल्या वंचित घटकांसाठी देखील राधाकृष्णन यांनी काहीही केल्याचे दिसत नाही* असे असताना डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जयंतीदिन हा शिक्षक दिन म्हणून का साजरा केला जातो हे जाणून घेतले पाहिजे

स्वतः च सांगून सुरू केला शिक्षक दिन
सामान्यपणे एखाद्या महान व्यक्तिमत्त्व असलेल्या माणसाच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यानंतर एखादा दिन सुरू केला जातो परंतु शिक्षक दिन  डॉ राधाकृष्णन यांनी स्वतः सुरू केला 1962 यावर्षी ते राष्ट्रपती असताना त्यांचे कार्यकर्ते व विद्यार्थी 5 सप्टेंबर रोजी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तथा सत्कार करण्यासाठी आले त्यावेळी डॉ राधाकृष्णन यांनी सांगितले की माझा एकट्याचा सत्कार न करता माझ्या जन्मदिनी सर्व शिक्षकांचा सन्मान करून शिक्षक दिन साजरा करावा  असे सांगितले त्यानंतर दरवर्षी 5 सप्टेंबरला शिक्षकांचा सन्मान करून शिक्षक दिन साजरा होऊ लागला अशाप्रकारे राष्ट्रपती असताना डॉ राधाकृष्णन यांनी आपला जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याची  सूचना केली आणि तो साजरा होऊ लागला  स्वतःचा जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याची सूचना  राधाकृष्णन यांनी स्वतःच केलेली आहे हा राष्ट्रपतीपदाचा एक प्रकारे गैरवापरच केलेला आहे असे दिसते

बहुजनां सह महाराष्ट्रावर अन्याय
भारतातील आद्य शिक्षिका म्हणून क्रांतीज्योती सावित्रीबाई यांचे नाव इतिहासात अमर असताना राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी  शिक्षक दिन साजरा करणे म्हणजे अखंड भारतातील शिक्षणाचे नेतृत्व महाराष्ट्राने केलेली असताना हा महाराष्ट्र राज्यावर अन्याय आहे याशिवाय अभिजनांनी बहुजनांचा आवाज दाबण्याचा हा सरळ सरळ प्रयत्न केलेला असल्याने हा *बहुजनांवर अन्याय आहे* याशिवाय पहिल्या  शिक्षक म्हणून सावित्रीबाईंचे नाव असताना एक स्त्री म्हणून त्यांची उपेक्षा केलेली असल्याने हा *समस्त स्त्रीवर्गावर देखील अन्याय आहे* या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम बहुजन समाजातील तळागाळातल्या  आणि आत्मभान आलेल्या  कार्यकर्त्यांनी करणे आवश्यक आहे

महाराष्ट्र शासनाने पावले उचलावीत
अधिक परखड बोलायचे झाले तर डॉ सर्वपल्ली यांनी  प्राध्यापक कुलगुरू  राजदूत उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती  इत्यादी पदांवर  काम केलेले असून या सर्व पदांचे मानधन अथवा वेतन व भत्ते त्यांनी घेतलेले आहेत  कोणतेही काम  मोफत केले नाही   शिक्षक दिन हा मानाचा मुकुट सावित्रीबाईंच्या डोक्यावर हवा परंतु तो हिरावून घेतला गेला आहे या लेखाद्वारे अतिशय महत्त्वाचा विषय मी आपल्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला आहे आपण तीनही मंत्री तळागाळातल्या समाज घटकांमधून  कार्यक्षम नेतृत्व म्हणून  समोर येत आहात आपल्या सरकारमध्ये पुरोगामी विचारांचे आणि निश्चयी बाण्याचे कणखर नेते आहेत तरी सदर मुद्द्यावर गांभीर्याने  विचार करून आपण निश्चितपणे सकारात्मक कार्यवाही करावी आणि *शिक्षक दिन 5 सप्टेंबर ऐवजी सावित्रीबाईंच्या जन्मदिनी 3 जानेवारी रोजी साजरा करण्याची कार्यवाही करावी अशी मी आपणास नम्र विनंती करतो.
 निदान महाराष्ट्रात तरी असा बदल केल्यास देशपातळीवरही परिवर्तन घडू शकेल असे माझे रास्त मत आहे या विनंतीची शासन पातळीवरून आपण योग्य ती दखल घ्यावी अशी आशा बाळगतो.

आपला विनीत
नारायण बा पाटील
9834981829


How does Dr. Sarvapalli Radhakrishnan relate to 'Teacher's Day' ...?


Savitribai Phule is the first Indian teacher to be crowned * Former President Radhakrishnan's birthday as a great Indian thinker and scholar should be celebrated Birthday greetings should be held Other events Is required. Such an opinion The letter written by Dr. Narayan Ba ​​Patil to the government on the eve of Teacher's Day has become a topic of discussion on WhatsApp, read what is written in the letter ...

Ma. No. Varsha Gaikwad (Minister of School Education) No. Uday Samant (Minister of Higher and Technical Education) Hon. No. Dhananjay Munde (Minister for Social Justice) About Teacher's Day ....... Dear Sir, I would like to draw your attention to the following thoughts about Teacher's Day.
How is Dr. Sarvapalli Radhakrishnan associated with Teacher's Day? To celebrate any day, it is customary to pay homage to the pioneer. First Nurse Lawrence Nightingale's Birthday Nurse's Day The puzzle is so mysterious that Savitribai Phule's name is immortalized in history as the first teacher in India. Mahatma Phule and Savitribai Phule started the first school for girls in Pune in 1848 and Sarvapalli was born in 1888. This year, Dr. Sarvapalli Radhakrishnan was not even born. 40 years ago, Savitribai Phule and Mahatma Phule started the first school for untouchables and girls in Pune and Savitribai started working as a teacher in it. Calcutta etc. There were missionary schools in important cities but as a Christian missionary or guru was working as a teacher in them  Savitribai Phule is the first Indian teacher to be crowned  Former President Radhakrishnan's birthday as a great Indian thinker and scholar should be celebrated on his birthday Celebrating her birthday as a day is like depriving Savitribai of her rights. Contemporary thinkers need to discuss this.

What is Radhakrishnan's job?

 Dr. Sarvapalli Radhakrishnan was born in a Brahmin family in Tamil Nadu. He was very intelligent. He studied and became a professor of philosophy. He started teaching philosophy at the university. He later became the Vice-Chancellor of Benaras Hindu University. He later visited Russia. After his return, he became the Vice President of the country. After Rajendra Prasad, he became the President of the country. There is nothing special in his character. In his life's work, he does not seem to have built a school for the poor anywhere, nor does he seem to have built a university, nor has he done much for the masses. Radhakrishnan does not seem to have done anything for the common man in the field of education even after becoming President in the same way that he set up schools, educational institutions, universities for the masses and brought education to the lower strata of society. * In such a situation, it is necessary to know why Dr. Sarvapalli Radhakrishnan's 

birthday is celebrated as Teacher's Day.
Teacher's Day usually begins a day later in memory of a great personality, but Teacher's Day was started by Dr. Radhakrishnan himself in 1962. When he was President, his activists and students came on September 5 to wish him a happy birthday. Radhakrishnan said that Teacher's Day should be celebrated by honoring all teachers on my birthday without honoring me alone. After that, Teacher's Day was celebrated by honoring teachers on September 5 every year. It seems that Radhakrishnan himself has suggested celebrating his birthday as Teacher's Day. It seems that the presidency has been misused in a way.

Celebrating Radhakrishnan's birthday Teacher's Day while Krantijyoti Savitribai's name is immortalized in history as the first teacher of injustice in Maharashtra with Bahujans

No comments