लाँकडाऊनमध्ये राज्यात २ लाख १९ हजार गुन्हे : गृहमंत्री अनिल देशमुख
१८ कोटी रुपयांची दंड आकारणी, ६ लाख ८२ हजार पासचे वितरण
मुंबई, २ : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार २ लाख १९ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
राज्यात लॉकडाऊनच्या कालावधीत म्हणजे दि.२२ मार्च ते १ ऑगस्ट पर्यंत कलम १८८ नुसार २,१९,९७५ गुन्हे नोंद झाले असून ३२,४६७ व्यक्तींना अटक करण्यात आली, यातील विविध गुन्हांसाठी १८ कोटी २४ लाख४६ हजार १०४ रु. दंड आकारण्यात आला.
तसेच अत्यावश्यक सेवेसाठी ६ लाख ८२ हजार ५५५ पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले.*कडक कारवाई* कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या ३२४ घटना घडल्या. त्यात ८८३ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.१०० नंबर- १ लाख ९ हजार फोन पोलीस विभागाचा १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर १,०९,०६२ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली.
तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा ८२४ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. अशी माहिती श्री. देशमुख यांनी दिली. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३४६ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
पोलिस कोरोना कक्ष
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील ५१ पोलीस व ४ अधिकारी अशा एकूण ५५, ठाणे शहर १२ व ठाणे ग्रामीण २ व १ अधिकारी,रायगड २,पुणे शहर ३, नाशिक शहर १,सोलापूर शहर ३,अमरावती शहर १ wpc,मुंबई रेल्वे ४,नाशिक ग्रामीण ३,जळगाव ग्रामीण १,जालना SRPF १ अधिकारी,नवी मुंबई SRPF १,पालघर ग्रामीण २ व १ अधिकारी,ए.टी.एस. १,उस्मानाबाद १,औरंगाबाद शहर १,जालना ग्रामीण १,नवी मुंबई १, सातारा१, अहमदनगर १,औरंगाबाद रेल्वे १,SRPF अमरावती १,अशा १०२ पोलिस बांधवांचा मृत्यू झाला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. सध्या २२४ पोलीस अधिकारी व १७१० पोलीस कोरोना बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टेन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.
--------------
English Translate :
2 lakh 19 thousand crimes in the state in Lankdown: Home Minister Anil Deshmukh
Fines of Rs 18 crore, distribution of 6 lakh 82 thousand passes
Mumbai, 2: Since the lockdown started, 2 lakh 19 thousand cases have been registered in the state under section 188. Home Minister Anil Deshmukh also gave such information.
During the lockdown period in the state from March 22 to August 1, 2,19,975 offenses under Section 188 were registered and 32,467 persons were arrested, out of which Rs. 18 crore 24 lakh 46 thousand 104 were charged for various offenses. A fine was imposed.
Also, 6 lakh 82 thousand 555 passes were issued by the police department for essential services. * Strict action * Our police force, health department, doctors and nurses are working day and night to combat corona. But some evil tendencies are attacking them. The police department has been directed to take strict action against such attackers. During this time there were 324 incidents of assault on police. 883 persons have been arrested and further action is being taken. * 100 number - 1 lakh ** 9000 phones * 100 number of police department is working 24 hours in all the districts. During the lockdown, 1,09,062 calls were received on this phone, all of which were duly noted.
Police across the state also tracked down 824 people with Quarantine stamps and sent them to segregation rooms. Such information was provided by Shri. Deshmukh gave. During this period, cases were registered against 1346 vehicles carrying illegal vehicles.
Police Corona Room In the ongoing efforts to control the spread of Corona virus, unfortunately, there are 51 police and 4 officers in Mumbai, a total of 55, Thane City 12 and Thane Rural 2 and 1 officers, Raigad 2, Pune City 3, Nashik City 1, Solapur City 3, Amravati City 1 wpc, Mumbai Railway 4, Nashik Rural 3, Jalgaon Rural 1, Jalna SRPF 1 Officer, Navi Mumbai SRPF 1, Palghar Rural 2 and 1 Officer, ATS. 1, Osmanabad 1, Aurangabad City 1, Jalna Rural 1, Navi Mumbai 1, Satara 1, Ahmednagar 1, Aurangabad Railway 1, SRPF Amravati 1, 102 policemen were killed. Control rooms have been set up all over the state for the police to take immediate action if they notice any symptoms related to corona. At present, 224 police officers and 1710 police corona are affected and are undergoing treatment.
Every citizen in the state is expected to participate in the fight against Corona. We all have a big responsibility to maintain social distance. The Home Minister has appealed to all to abide by the rules and cooperate.
No comments