Breaking News

पँथरसेनेतर्फे नयनी पाटीलचा सत्कार


 नयनी पाटीलचा सत्कार करतांना पँथर सेनेचे अध्यक्ष आनंद खापर्डे , भन्ते नागाप्रकाश, जोतीराव बारसागडे.

नागपूर,ता. २ : सुगत नगर येथील नयनी गोवर्धन पाटील या विद्यार्थ्यीने कोणत्याही प्रकारची खाजगी शिकवण न घेता स्वतः च्या परिश्रमाच्याबळावर आय.सी.एस.सी.बोर्डाच्या परिक्षेत ९३ टक्के गुण मिळवून घवघवीत यश मिळविल्याबद्यल पँथर सेनेचे अध्यक्ष आनंद खापर्डे, वरिष्ठ  भंन्ते नागाप्रकाश,सेंट रोबेन पब्लिक स्कूल अँड ज्युनियर काँलेजचे संचालक जोतीराव बारसागडेयांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना  विद्यार्थीनीने या पुढेही अधिकाधिक परिश्रम घेऊन डाँक्टर बनून आई-वडिलांचे स्वप्नं पुर्ण करणार असल्याचे इच्छा नयनी पाटील   व्यक्त केली .यावेळी मुलीचे वडील गोवर्धन पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
-----------
English  translate : 

Nayani Patil felicitated by Panthersena

Nagpur, Tal. 2: Nayani Govardhan Patil, a student from Sugat Nagar, did not take any private tuition. Panther Sena President Anand Khaparde, Senior Bhante Nagaprakash, Director of St. Robben Public School and Junior College Jotirao Barsagade felicitated the students by giving them a bouquet of flowers. He expressed his desire to become a doctor and fulfill the dreams of his parents. The girl's father Govardhan Patil was present at this time.


No comments