ना.गडकरी यांनी घरीच केले श्रीराम पूजन रामरक्षा, हनुमान स्तोत्राचेही पठन
अयोध्येत आज ऐतिहासिक आणि भव्यदिव्य अशा श्रीराम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्याचवेळी
नागपुरात केंद्रीय भूपृष्ठ परिवहन, वाहतूक व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या घरीच सहकुटुंब श्रीरामाचे पूजन केले.
नागपुर, ५ ऑगस्ट : अयोध्येत आज ऐतिहासिक आणि भव्यदिव्य अशा श्रीराम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्याचवेळी नागपुरात केंद्रीय भूपृष्ठ परिवहन, वाहतूक व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या घरीच सहकुटुंब श्रीरामाचे पूजन केले. याप्रसंगी ना.नितीन गडकरी यांच्या संपूर्ण कुटुंबाने रामरक्षा पठन, हनुमानचालिसा पठन करून आरती केली.
नागपुरात केंद्रीय भूपृष्ठ परिवहन, वाहतूक व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या घरीच सहकुटुंब श्रीरामाचे पूजन केले.
कोरोनामुळे अयोध्येस जाणे शक्य नसल्यामुळे अनेक मान्यवरांना आज आपापल्या घरीच भूमिपूजन समयी श्रीरामाचे पूजन करावे लागले. ना. गडकरी यांच्या निवासस्थानी झालेल्या श्रीराम पूजन प्रसंगी सौ कांचन गडकरी, मुलगा सारंग गडकरी, स्नुषा ऋतुजा निखिल गडकरी, मधुरा सारंग गडकरी, नातवंडे निनाद, अर्जुन, सानवी व नंदिनी गडकरी सहभागी झाले होते.
---------------------------
Gadkari performed Shriram Pujan at home
Recitation of Ramraksha, Hanuman Stotra too
Prime Minister Narendra Modi today paid homage to the historic and magnificent Shri Ram Temple in Ayodhya. At the same time in Nagpur, Union Minister for Land Transport, Transport and MSME Nitin Gadkari paid homage to Shri Ram at his home.
Nagpur, August 5: Prime Minister Narendra Modi paid homage to the historic and magnificent Shri Ram Temple in Ayodhya today. At the same time in Nagpur, Union Minister for Land Transport, Transport and MSME Nitin Gadkari paid homage to Shri Ram at his home. On this occasion, the entire family of Nitin Gadkari performed Aarti by reciting Ramraksha and Hanuman Chalisa.
As it was not possible to go to Ayodhya due to Corona, many dignitaries had to worship Shri Ram at their homes during Bhumi Pujan today. No. Mrs. Kanchan Gadkari, son Sarang Gadkari, Snusha Rituja Nikhil Gadkari, Madhura Sarang Gadkari, grandchildren Ninad, Arjun, Sanvi and Nandini Gadkari were present on the occasion of Shri Ram Pujan held at Gadkari's residence.


No comments