Breaking News

६५ वर्षावरील कलाकारांना चित्रीकरणास परवानगी : सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख



मुंबई :  चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटिटि उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोवीड-19 च्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती पूर्ण काळजी घेऊन चित्रीकरण करण्यास परवानगी देण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली.


    कोविड-19 पार्श्वभूमीवर बंद असलेली चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका / ओटिटि यांच्या चित्रिकरणाची कामे, नियंत्रित स्वरुपात पुन्हा सुरु करण्याकरीता ;  मार्गदर्शक सूचना, शासन निर्णय दिनांक 30 मे 2020 व दिनांक 23 जून 2020 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या होत्या. या सूचनांमध्ये, 65 वर्षावरील कोणत्याही कलाकार / क्रू सदस्यांना चित्रीकरण स्थळावर परवानगी दिली जाणार नाही, अशी अट ठेवण्यात आली होती.


Artists above 65 years of age allowed to shoot: Cultural Affairs Minister Amit Deshmukh

Mumbai: Actors / crew members over 65 years of age who are collaborating with films, television series, OTT industry are being allowed to shoot with the necessary care on the background of Kovid-19, informed Cultural Affairs Minister Amit Vilasrao Deshmukh.



To resume filming of television series / OTT, closed in Covid-19 background, in a controlled format; The guidelines were issued under GR dated 30 May 2020 and 23 June 2020. In these instructions, it was stipulated that no artist / crew member above 65 years of age would be allowed on the scene.

No comments