बकरी ईद बाबत शासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे : जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे
रविंद्र ठाकरे : जिल्हाधिकारी नागपूर
नागपूर - कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी बकरी ईद साध्या पध्दतीने साजरी करण्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने, बकरी ईद (ईद-उल-अजहा) दिनांक 01 ऑगस्ट 2020 (शनिवार) रोजी असून या सणा निमित्ताने मुस्लीम बांधवाकडून लहान- मोठया जनावरांची कुर्बानी करण्याची प्रथा आहे.
कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी साध्या पध्दतीने साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार खाली नमूद केल्याप्रमाणे शासनाद्वारे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनाचे काटकोरपणे पालन करण्यात यावे असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले आहे.
नागपुरात 'बकरी ईदनिमित्त कसे असेल नियम वाचा...
१. कोविड- १९ उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे.
त्यास अनुसरून बकरी ईद नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न
करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी.
२. सध्या कार्यान्वीत असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची
असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीने अथवा दुरध्वनीवरून जनावरे खरेदी करावी.
३. नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी.
४. प्रतिबंधित (Containment) क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आल्नेले निबंध कायम राहतील.
५. बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये किंवा एकत्र जमू
नये.
६. कोविड- १९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण,
वेद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित
केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. असे जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
English Translate :
Government's instructions regarding Goat Eid should be strictly followed: Collector Ravindra Thackeray
Nagpur: Considering the contagious situation caused by Kovid-19, the government has decided to celebrate Goat Eid in a simple manner this year. Accordingly, Goat Eid (Eid-ul-Azha) is on 01 August 2020 (Saturday). It is customary to sacrifice small and large animals.
Considering the contagious situation caused by Kovid-19, it has been decided to celebrate this year in a simple manner. Accordingly, District Collector Ravindra Thackeray has appealed to strictly follow the guidelines issued by the government as mentioned below.
Read the rules on the occasion of 'Goat Eid' in Nagpur ...
1. Kovid-19 All religious activities are banned in the state due to contagious situation. Accordingly, the citizens should pay the goat Eid Namaz in their own homes without paying it in the mosque or Eidgah or public place
2. Currently operating livestock markets will remain closed. If citizens want to buy animals, they should do so online or over the phone.
3. Citizens should make symbolic sacrifices as much as possible. Essays currently applied in the Containment Area will remain.
4. Citizens should not crowd or gather in any public place on the occasion of Goat Eid.
In order to prevent the spread of the virus Kovid-19, it will be mandatory to comply with the rules prescribed by the government assistance and rehabilitation, health, environment, medical education department as well as the concerned municipalities, police and local administration. This is stated in the press release issued by the Collectorate.
No comments