डॉ. बाबासाहेब आंबेडकर राजगृहावर झालेल्या हल्ल्याच्या आरोपीला अटक करा , सीआयडी चौकशी करा
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले 'राजगृहा'वर मंगळवारच्या संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. राजगृहावरील झालेल्या हल्ल्याची संपूर्ण देशभारात सोशलमीडिया, वॉट्सअप , सामाजिक , राजकीय,
क्षेत्रातून
तीव्र निषेध व्यक्त होत आहे, सीआयडी द्वारे चौकशी करून तातडीने आरोपीला अटक करावी अशी मागणी होत आहे.
राजगृहावरील हल्ल्याची सीआयडी मार्फत चौकशी करावी
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृह या ऐतिहासिक पवित्र वास्तूवर झालेल्या हल्ल्याच्या तीव्र निषेध करून रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी या हल्ल्याची सीआयडी द्वारे चौकशी करावी अशी मागणी केली आहे .याबाबतचे पत्र त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाठविले आहे.
राजगृह हे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ निवासस्थान आहे. या निवासस्थानात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे वास्तव्य होते.त्यामुळे राजगृह ही पवित्र वास्तू आहे. मुंबईत दादरमधील राजगृह हे ग्रंथांसाठी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेली वास्तू आहे. ही वास्तू ग्रंथांसाठी म्हणून उभारलेली एकमेव वास्तू ठरू शकते.जगभरातील आंबेडकरी अनुयायांचे राजगृह प्रेरणास्थान ऊर्जास्थान आहे. ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण आणि पवित्र असणा-या राजगृह या वास्तूवर हल्ल्याचा प्रकार अत्यंत निंदनीय आणि धक्कादायक आहे. राजगृहाचा अवमान करण्याचा हा पहिलाच निंदनीय प्रकार घडला आहे. या हल्ल्यात सहभागी असणाऱ्यांना अटक करून कठोर शिक्षा करावी या मागे कुणाचा हात आहे हे शोधण्यासाठी या हल्ल्याची सीआयडीद्वारे सखोल चौकशी करावी अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान म्हणजे आमची अस्मिता व आमच्या पवित्र राजगृहावर तोडफोड करणा-याना अटक करा
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले 'राजगृहा'वर आज संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे.
दोन माथेफिरुंनी हा प्रकार केलाय. यात त्यांनी घराबाहेरील CCTV चेही मोठे नुकसान केलंय. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे CCTV फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे. आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यानी केलीआहे..
राजगृह मधे झालेला अमानवीय हल्ला
राजगृह मधे झालेला अमानवीय हल्ला जाहिर निषेध सर्व संघठन आणि पक्ष या संदर्भात एकत्रित येऊन लढ़ा दिला पाहिजे या प्रकरणातून राजकारण करण्यापेक्षा एक जुटी ने येऊन समाजावर होते असलेले हल्ले आणि अत्याचार व इतर घटना या करीत एकत्रित लढने काळाची गरज अशी विनंती युथ फॉर रेव्होल्यूशन नागपुरचे पवन पाटील यांनी केली आहे.
-------------------------------------
English Translate :
Arrest the accused in the attack on Dr.Babasaheb Ambedkar Rajgriha, CID inquiry
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar's residence in Mumbai was vandalized by two unidentified persons on Tuesday evening. The attack on the palace is being strongly protested across the country on social media, WhatsApp, social, political, the field, the CID should investigate and arrest the accused immediately.
The attack on the palace should be investigated by the CID
Republican National President and Union Minister of State for Social Justice Na. Ramdas Athavale has demanded an inquiry into the attack by the CID. He has sent a letter to Maharashtra Home Minister Anil Deshmukh.
Rajgruh is the original residence of the great man Dr. Babasaheb Ambedkar. This residence was inhabited by the great man Dr. Babasaheb Ambedkar. Therefore, Rajgruh is a sacred structure. The Rajgruh in Dadar, Mumbai is a building erected by the great man Dr. Babasaheb Ambedkar for texts. This building may be the only one built for texts. The attack on the historically important and sacred palace is highly reprehensible and shocking. This is the first reprehensible act of insulting the palace. Ramdas Athavale has demanded that the CID should conduct a thorough inquiry into the attack to find out who was behind the attack.
Dr. Babasaheb Ambedkar's residence is our identity and arrest those who vandalized our holy palace
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar's 'Rajgriha' in Mumbai was vandalized by two unidentified persons this evening. It also smashed CCTV cameras in the vicinity of the house. Stones have also been hurled at the glass of the house. This has caused great damage to the pots in the house. Rajgruh is Dr. It is the residence of Babasaheb Ambedkar. This house was built by Babasaheb Ambedkar for books. Ambedkar's followers from all over the world visit here daily. This is such an important place. This is an important place for Ambedkar's followers.
This is not the case. They also damaged the CCTV outside the house. Police have arrived at the scene. CCTV footage of the incident has been handed over to the police by the Ambedkar family. NCP MLA Prakash Gajbhiye has demanded immediate search and arrest of the accused.
Inhumane attack on the palace
Pawan Patil of Youth for Revolution Nagpar said that all organizations and parties should come together and fight against the inhumane attack on Rajgruh. Is done.
No comments