Breaking News

साईकृपा जिनिंगला भेट देऊन कापूस खरेदीचा आढावा घेतला : जिल्हाधिकारी एम.डी.सिंह



 खरीपाला सुरुवात झाल्यामुळे शेतक-यांना पैशाची गरज आहे. अशावेळी नोंदणीकृत शेतक-यांच्या घरात असलेला कापूस जिनिंगने त्वरीत खरेदी करावा असे मत  जिल्हाधिकारी एम.डी.सिंह व्यक्त केले. 

यवतमाळ,  : वणी येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने जिल्हाधिकारी एम.डी.सिंह हे गुरुवारी वणीच्या दौ-यावर होते. यादरम्यान त्यांनी वणी येथील साईकृपा जिनिंगला भेट देऊन कापूस खरेदीचा आढावा घेतला. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, सीसीआयचे प्रतिनिधी कृष्णा रेड्डी, जिनिंग मालक सुनील कातकडे, तहसीलदार, सहाय्यक निबंधक आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, खरीपाला सुरुवात झाल्यामुळे शेतक-यांना पैशाची गरज आहे. अशावेळी नोंदणीकृत शेतक-यांच्या घरात असलेला कापूस जिनिंगने त्वरीत खरेदी करावा. वणी येथील जिनिंगवर नेर, दारव्हा, दिग्रस आणि आर्णी तालुक्यातून जास्तीत जास्त गाड्या पाठविण्यासाठी सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक यांनी गांभिर्याने प्रयत्न करावे, अशा सुचना त्यांनी दिल्या.
वणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दारव्हा, दिग्रस, नेर आणि आर्णी येथून गत आठवड्यात एकूण 1075 गाड्यांची आवक झाली.  यात 16 जून रोजी चारही तालुक्यातून 81 गाड्या, 17 जून रोजी 108 गाड्या, 18 जून रोजी 118 गाड्या, 19 जून रोजी 155, 22 जून रोजी 132, 23 जून रोजी 166 तर 24 जून रोजी 149 गाड्यांचा समावेश आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
English  Translate  :


Visited Sai Kripa Jinning and reviewed cotton procurement: Collector MD Singh

 With the onset of kharif, farmers need money. In such a case, the cotton ginning in the house of a registered farmer should be procured by Jinning immediately, said District Collector MD Singh.

Yavatmal: District Collector MD Singh was on a visit to Wani on Thursday as a corona-infected patient was found at Wani. Meanwhile, he visited Sai Kripa Jinning in Wani and reviewed the cotton procurement. At this time, the sub-divisional officer Dr. Sharad Jawale, CCI representative Krishna Reddy, Jinning owner Sunil Katkade, Tehsildar, Assistant Registrar etc. were present.
At this time, the Collector said, farmers need money as kharif has started. In such cases, cotton ginning in the house of a registered farmer should be procured immediately by ginning. He suggested that the Assistant Registrar of Co-operative Societies should make serious efforts to send maximum number of trains from Ner, Darwha, Digras and Arni talukas to Jinning at Wani.
The Agricultural Produce Market Committee at Wani received a total of 1,075 vehicles from Darwha, Digras, Ner and Arni last week. This includes 81 trains from all four talukas on June 16, 108 trains on June 17, 118 trains on June 18, 155 trains on June 19, 132 trains on June 22, 166 trains on June 23 and 149 trains on June 24.



No comments