Breaking News

वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी विशेष शिबीर : ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत



“शासन आपल्या दारी” या संकल्पनेनुसार, शहरी भागात महत्वाच्या/मोक्याच्या ठिकाणी तर ग्रामीण भागात आठवडी बाजाराच्या दिवशी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने बाजाराकरिता येत असतात, तेथिल नजीकच्या हॉल/कार्यालयात सामाजिक अंतराचे पालन करून “विशेष शिबीरे/ग्राहक मेळावे” घेऊन वीज ग्राहकांचे समाधान करावे
Dr. Nitin Raut

                                                 डॉ. नितीन राऊत , ऊर्जा मंत्री महाराष्ट्रराज्य 

नागपूर, 26  : वीज ग्राहकांच्या बिल विषयक तक्रारी सोडविण्यासाठी राज्यभरात विशेष शिबिरांचे आयोजन करावे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून शंकेचे प्राधान्याने निवारण करण्याचे स्पष्ट निर्देश ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी प्रधान सचिव(ऊर्जा) दिनेश वाघमारे आणि  महावितरणचे  संचालक(संचलन) दिनेशचंद्र साबू यांना दिले. 

लॉकडाउनच्या काळातील एकत्रित वीज बिलामुळे ग्राहकांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे. हा संभम तातडीने दूर करण्यासाठी डॉ. राऊत यांनी सदर कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. महावितरणच्या  https://billcal.mahadiscom.in/consumerbill  या लिंक वर ग्राहकांनी वीज बिल तपासून घ्यावे आणि शंका असल्यास नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून समस्येचे निवारण करावे असे आवाहन ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केले आहे. महावितरण वीज ग्राहकांचे समाधान करण्यास कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.




यासोबतच, ग्रामीण व शहरी भागातील लोकप्रिनिधीं, प्रतिष्ठित नागरिक आणि पत्रकारांचा सर्वसमावेशक स्वतंत्र व्हॉट्सएप ग्रुप उप विभागीय अधिकारी स्तरावर  तयार करून त्यावर वीज बिलाची संपूर्ण माहिती देऊन वीज विषयक समस्या/शंकांचे संपूर्ण समाधान करावे, त्यांचे सोबत वेबिनार आयोजित करून  संवाद साधावा असे त्यांनी सुचविले. 
  
“शासन आपल्या दारी” या संकल्पनेनुसार, शहरी भागात महत्वाच्या/मोक्याच्या ठिकाणी तर ग्रामीण भागात आठवडी बाजाराच्या दिवशी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने बाजाराकरिता येत असतात, तेथिल नजीकच्या हॉल/कार्यालयात सामाजिक अंतराचे पालन करून “विशेष शिबीरे/ग्राहक मेळावे” घेऊन वीज ग्राहकांचे समाधान करावे, तसेच तक्रारींचे निरसन करण्याच्या दृष्टीने केलेल्या उपाय योजनांबाबत विविध  प्रसार माध्यमे, सोशल मिडियाच्या माध्यमातून व्यापक प्रसिद्धी देण्याच्या सूचना ऊर्जा मंत्र्यांनी दिल्या आहेत.

महावितरण मुख्यालयाने या संदर्भात राज्यातील सर्व मुख्य अभियंत्यांना  पत्राद्वारे कळविले असून या माध्यमातून राज्यातील वीज ग्राहकांचे लवकरात लवकर समाधान होण्यास हातभार लागेल असा विश्वास डॉ. राऊत यांनी व्यक्त केला.
---------------------------------------------------------------------

English Translate : 

Special camp for solving power consumers' problems: Energy Minister Dr. Nitin Raut


According to the concept of "Government at Your Doorstep", a large number of people come to the market on important market days in urban areas and in rural areas on weekday market days, to satisfy the power consumers by holding "special camps / customer meetings" in the nearby halls / offices.



Nagpur, 26: Special camps should be organized across the state to resolve the grievances of electricity consumers and clear instructions to address the doubts by contacting the local people's representatives. Nitin Raut to Principal Secretary (Energy) Dinesh Waghmare and MSEDCL Director (Operations) Dinesh Chandra Sabu.

Consolidated electricity bills during the lockdown period have created some confusion among consumers. To remove this confusion immediately, Dr. Raut has ordered the action to be taken. Energy Minister Dr. Nitin Raut has appealed to the consumers to check the electricity bill on the link https://billcal.mahadiscom.in/consumerbill of MSEDCL and if there is any doubt, they should contact the nearest MSEDCL office and resolve the issue. He also said that MSEDCL is committed to satisfy the power consumers.

He also suggested that an all-inclusive WhatsApp group of people's representatives, eminent citizens and journalists from rural and urban areas should be formed at the sub-divisional level to provide complete information on electricity bills and solve problems / doubts related to electricity.
  
According to the concept of "Government at your doorstep", a large number of locals come to the market on important market days in urban areas and in rural areas on weekly market days. The Energy Minister has also instructed to give wide publicity through various media and social media about the measures taken to resolve the grievances.

MSEDCL has informed all the Chief Engineers of the state in this regard through a letter. Expressed by Dr. Nitin Raut.

 

No comments