Breaking News

गोंदिया जिल्ह्यात 14 रुग्ण कोरोनामुक्त झाले


कोरोना विषाणूच्या संसर्गाने संपूर्ण जग ग्रासले असतांना गोंदिया जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात यश येत आहे. 


गोंदिया : (जिमाका) कोरोना विषाणूच्या संसर्गाने संपूर्ण जग ग्रासले असतांना गोंदिया जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात यश येत आहे. जिल्ह्याची वाटचाल पुन्हा तिसऱ्यांदा कोरोनामुक्तीकडे सुरू झाली आहे.आज नवा बाधित रुग्ण आढळून आलेला नाही.आज 25 जून रोजी आणखी 14 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. आतापर्यंत 100 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. तर केवळ 4 कोरोना क्रियाशील रुग्ण जिल्ह्यात शिल्लक आहे.
 
जिल्ह्यात काल 24 जूनला सलग सहा दिवसानंतर दोन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.विशेष म्हणजे हे रुग्ण ते थेट आखाती देशातून जिल्ह्यात आले.जिल्ह्यात दाखल होताच त्यांना संस्थात्मक विलगिकरणात ठेवण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील कोणताही व्यक्ती त्यांच्यामुळे बाधित झाला नाही.तर काल कोरोना बाधित असलेले 14 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे.आज देखील 14 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.आतापर्यंत जिल्ह्यातील 100 बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

आज जे 14 रुग्ण कोरोनामुक्त झाले ते सर्व तिरोडा तालुक्यातील असून ते 20 ते 50 वर्ष वयोगटातील आहे.

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग कोणालाही होऊ नये यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीने स्वतः च्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.कामाशिवाय घराबाहेर जाऊ नये.शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. प्रत्येकाने शारीरिक अंतर राखावे.वारंवार हात साबण व पाण्याने स्वच्छ धुवावे.कोणत्याही वस्तूला हाताळण्यापूर्वी आणि नंतर हात स्वच्छ धुवावे.हाताला सॅनिटायझर लावावे.सार्वजनिक ठिकाणी वावरतांना चेहऱ्यावर आणि नाकावर मास्क किंवा रुमालचा वापर करावा.सर्दी,ताप किंवा खोकला असल्यास नजीकच्या दवाखान्यात किंवा फिवर क्लीनिकमध्ये आरोग्य तपासणी करून घ्यावी.असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात 104 कोरोना बाधित रुग्ण आढळले. 100 रुग्ण हे आतापर्यंत कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे.जिल्ह्यात क्रियाशील कोरोना रुग्णांची संख्या आता केवळ 4 इतकी आहे.

जिल्ह्यात आढळलेले 104 कोरोना बाधित रुग्ण हे अर्जुनी/मोरगाव तालुका - 31,सडक/अर्जुनी तालुका - 10, गोरेगाव तालुका - 4, आमगाव तालुका -1, सालेकसा तालुका - 2, गोंदिया तालुका - 22 आणि तिरोडा तालुक्यातील 34 रुग्ण आहे.

गोंदिया येथील प्रयोगशाळेत कोरोना संशयित 2239 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले.त्यामध्ये 104 रुग्ण हे कोरोना बाधित आढळुन आले.119 नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेत अद्यापही प्रलंबित आहे.आतापर्यंत 100 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहे.

जिल्ह्यातील विविध शाळा व संस्थांमध्ये 706 आणि घरी 1907 अशा एकूण 2613 व्यक्ती विलगीकरणात असून जिल्ह्यातील चोवीस कंटेंटमेंट झोनपैकी  सालेकसा तालुक्यातील बामणी हे झोन वगळता उर्वरित 23 कंटेंटमेंट झोनमधील नागरिकांना उपलब्ध सेवामध्ये शिथीलता देण्याची कार्यवाही करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे यांनी दिली

----------------------------------------------------------------------------------

English Translate : 

In Gondia district, 14 patients were corona free

Corona virus infection is affecting the entire world while Gondia district is succeeding in preventing the spread of Corona virus.



Gondia :  Corona virus infection in the Gondia district is on the rise. The district is on its way to coronation for the third time. No new infected patients have been found today. On June 25, another 14 patients have been coronally released. So far, 100 patients have returned home free of corona. So only 4 corona active patients remain in the district.
 
Two corona-infected patients were found in the district on June 24 after six consecutive days. In particular, these patients came to the district directly from the Gulf countries. As soon as they were admitted to the district, they were kept in institutional isolation. He has returned home. Even today, 14 patients have been relieved from corona. So far, 100 infected patients from the district have been corona free.

Today, all the 14 patients who were released from the corona are from Tiroda taluka and are in the age group of 20 to 50 years.

Everyone in the district should take care of their own health so that no one gets infected with the corona virus in the district. Do not go out of the house without work. Avoid going to crowded places if possible. Everyone should keep a physical distance. Wash hands frequently with soap and water. Wash hands before and after handling any object. Apply hand sanitizer. Use a mask or handkerchief on face and nose when using in public places. The health department has made such an appeal.

So far 104 corona infected patients have been found in the district. So far 100 patients have returned home without corona. The number of active corona patients in the district is now only 4.

The 104 corona affected patients found in the district are Arjuni / Morgaon taluka - 31, Sadak / Arjuni taluka - 10, Goregaon taluka - 4, Amgaon taluka - 1, Saleksa taluka - 2, Gondia taluka - 22 and Tiroda taluka 34 patients.

Throat secretion samples of 2239 suspected corona were sent to the laboratory at Gondia for testing. Of these, 104 patients were found to be infected with corona. Report of 119 samples is still pending in the laboratory. So far 100 patients have been corona free.

A total of 2613 persons including 706 in various schools and institutions in the district and 1907 at home are being segregated.

No comments