राष्ट्रवादी कांग्रेस पक्षातर्फे अन्नधान्य,मास्क व सैनिटिझरचे वाटप : प्रकाश गजभिये
राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या वतीने लॉकडाउन मध्ये अडकलेल्या शेकडो गरीब आटोरिक्शाचालकांना अन्नधान्यसह भाजीपाला देऊन त्यांच्या प्रकृतीची कोरोनाबाबत चौकशी करून मास्क व सैनिटिझरचे वाटप करून आमदार प्रकाश गजभिये यांनी मदतीचा हात पुढे केला.
नागपुर, ता.२६ : शहरात कोरोना महामारीमुळे आलेल्या गंभीर संकटामुळे शहरात लॉकडाउन असल्यामुळे ऑटोचालकांचे व्यवसाय संकटात आलेला असून त्यामुळे आटोरिक्शाचालकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. ही बाबत लक्षात घेता राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश गजभिये यांनी आपली जबाबदारी समजून शेकडो आटोचालकांना रविनगर चौक नागपुर येथे अन्नधान्य व भाजीपाला वाटप करुन मदतीचा हात पुढे केलेला आहे. गरिब आटोचालकांच्या तब्बेतीची आमदार प्रकाश गजभिये यानी जातीने लक्ष देऊन चौकशी केली व आटो चालकांना सैनिटायझर व मास्कचे शासनाच्या ठरविलेल्या नियमानुसार सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून वाटप करण्यात आले.
आटोचालकांचा ऑटो व्यवसायाशिवाय दूसरा व्यवसाय नाही व लॉकडाउन मुळे आटो व्यवसाय संकटात सापडलेला आहे म्हणून महाराष्ट्र शासनाने दिल्ली सरकारच्या धर्तीवर ऑटो चालकांना रु 5000/-ची आर्थिक मदत करावी व ऑटो चालकांकरिता ऑटोरिक्शा आर्थिक विकास महामंडळ निर्माण करावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी केली .यावेळी मनोज नागपुरकर,अब्दुल शाहिद, रवि नागपुरकर, मून ,ढोबळे , खान , किलनाके, मड़ावी, जावेदभाई आदिनी परिश्रम घेतले.
No comments