कोरोना कोविड-19 कर्तृत्ववान पत्रकार योध्यांना नागपूरकरांचा सलाम
कोरोना योद्धे - कोविड-19 च्या बातम्या पोहचविणारे पत्रकारीतेतील विश्वसनीय चेहरे
आजच्या या डिजिटल युगात मोठी क्रांती झाली आहे, मात्र आजही नागरिकांचे विश्वास हे वृत्तपत्रावर कायम टीकून आहे. कोरोनाच्या संकट कालीन परिस्थिती पत्रकार आपले जीव धोक्यात टाकून आपल्या पर्यंत बातम्या कसे पोहचवितात यांचे सुंदर वर्णन अशियन न्यूज आंतरराष्ट्रीय (ANI)चे वरिष्ठ पत्रकार सौरभ जोशी यांनी फेसबुक पोस्टवर केले आहे.
नागपूर : नागपूरच्या वृृृृत्तपत्र सृृृष्टीतील हे पत्रकार कोविड विरुद्धच्या लढ्यात योद्धे म्हणून रणांगणात आहेत. कोरोना संक्रमणाविषयीची बित्तंबातमी वृत्तपत्रांच्या माध्यमातून ते आपल्या पर्यंत पोहचवत असतात. दिवसातले अनेक तास मेयो-मेडीकलमध्ये घालवून ते बातम्यांचे संकलन करतात. यातले काही तर थेट कोविडच्या रेड झोनमध्ये जावून आपल्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. लोकसत्ताचे महेश बोकडे आणि लोकमतचे सुमेध वाघमारे म्हणजे कोविडच्या माहितीचा सर्वात मोठा आणि भरवशाचा स्त्रोत, मेडीकल-मेयोतून येणारी प्रत्येक बातमी सर्वात आधी यांच्याकडे असते. सकाळच्या केवल जीवनतारे यांची तर मेडिकल बीटमधले मास्टर अशीच ओळख आहे. या बीटमधील बारकावे त्यांच्या इतके क्वचितच कुणाला ठावूक असतील. हितवादच्या विकास वैद्य यांचा प्रशासकीय पातळीवरुन अचूक माहिती गोळा करण्यात हातखंडा आहे. दांडगा संपर्क ही त्यांची आणखीन जमेची बाजू आहे. दैनिक भास्करच्या सोनाली सिंह यांची अभ्यासपूर्ण मांडणी वाखाणण्याजोगी आहे. आॅफिस, फिल्ड आणि घर अशा तीन आघाड्यांवर सातत्याने त्यांना लढावे लागते. महाराष्ट्र टाइम्सचे आनंद कस्तुरे म्हणजे ख-या अर्थाने फिल्ड रिपोर्टर, फिल्डवर गेल्याशिवाय बातमी होऊच शकत नाही हा त्यांचा ठाम विश्वास आहे. नवभारतचे दिनेश टेकाडे जेवढी मेहनत आपल्या शरीरावर घेतात त्यापेक्षा दुप्पट मेहनत बातम्यांवर घेतांना दिसतात. टाईम्स आॅफ इंडियाच्या चैतन्य देशपांडे यांची विषय मांडण्याची शैली उत्कृृृष्ट आहे. विदर्भातील कोविडचा रिपोतार्ज ते आपल्या स्टोरीतून वाचकांसमोर मांडत असतात. भास्करचे युवा पत्रकार विजय ऋषी फक्त बातम्याच देत नाहीत तर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातूनही वाचक वर्गाला शहाणं करण्याचं काम करतात. कोरोना व्याधीतून बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्जच्यावेळी थेट जावून भेटणारा हा पठ्ठ्या आहे. अशी ही नागपूरातील कर्तृत्ववान पत्रकारांची टीम कठीण परिस्थितीतही सातत्याने आपल्यापर्यंत बातम्या पोहोचवत आहे. या कोरोना योध्यांना नागपूरकरांचा सलाम
कोरोना कोविड-19 कर्तृत्ववान पत्रकार योध्यांना नागपूरकरांचा सलाम
Reviewed by Nilesh Raut : N7 News Voice
on
April 27, 2020
Rating: 5

No comments