Breaking News

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्हतर्फे अन्नधान्य वाटप : राकेश पन्नासे

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स कार्पोरेशनचे संचालक राकेश पन्नासे अन्नधान्य वाटप करतांना
नागपूर,ता. २३ : देशभरात ३ मे पर्यंत लॉकडाउन असल्याने  वस्त्यांमध्ये रोजंदारी कामकाज करणाऱ्यांसमोर खाण्या पिण्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेता. पन्नासे ले-आऊट येथे  महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स कार्पोरेशनचे संचालक राकेश पन्नासे यांच्या पुढाकाराने अन्नधान्य  धान्य  वाटप करण्यात आले.
     महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स कार्पोरेशनतर्फे  २०० कुटूंबियांना सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून  तांदूळ ,  डाळ, तेल , तिखट, वाटप करण्यात आले.
सरकारने ठरवून दिलेल्या नियमांचे गांभिर्याने नागरिकांनी पालन केले तरच कोरोना विषाणू रोगाला पळवून लावू शकतो असे आवाहन राकेश पन्नासे यांनी केले. 
यावेळी अखिलेश पन्नासे, ईश्वर रंगारी, धनराज बागडे, अर्चना पन्नासे, अश्विन धनविजय, आदित्य मेश्राम, चंद्रकांत काकडे यांचे विशेष सहकार्य लाभले.

No comments