संजय पळसकर यांना राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्कार
![]() |
राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्कार प्राप्त कला शिक्षक संजय पळसकर यांचे अभिनंदन करतांना मुख्याधापक प्रदीप बिबटेसह मान्यांवर |
पुणे ता.२७ : महाराष्ट्र राज्य कलाध्यपक संघ महामंडळ पुणे व सिंधुदुर्ग कलाध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ४१ वी राज्यस्तरीय कला शिक्षण परिषद कार्यशाळा मालवण येथील मामा वरेकर नाट्यगृह येथे ६ ते ८ फेब्रुवारीत तीन दिवसीय परिषद आयोजित करण्यात आले होते.
परिषदचे उदघाटन जेष्ठ चित्रकार अरुण दाभोकळर यांच्याहस्ते करून राज्यस्तरीय आदर्श कला ध्यापक पुरस्कार शांतीनगर येथील विनायकराव देशमुख हायस्कुलचे संजय पळसकर यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी आमदार मनीषा कायंदे , आमदार वैभव नाईक, महाराष्ट्र राज्य कलाध्यापक महामंडळाचे अध्यक्ष पी.आर पाटील , राज्य सरचिटणीस कादरी, उपाध्यक्ष दादा बगाटे , कोषाध्यक्ष नरेंद्र बाराई, हिरामण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
तीन दिवसीय शिक्षण परिषदेत नवीन बदल चित्र, शिल्प, नाट्य , नृत्य , गायन, वादन, हस्तकला परीक्षा पद्धती व मुल्याकंन या घटक विषयातील अध्यापानातील नवीन सामंत व सुसंगती यावी या उद्देशाने घेण्यात आले. या परिषदेला संपूर्ण महाराष्ट्रातील ६५० कलाध्याक सहभागी होते.
No comments