Breaking News

दै. आपलं महानगरचे नितीन बिनेकर यांना "एसटी मित्र" पुरस्कार


 मुंबई, ता.२६ : महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसतर्फे "एसटी मित्र" पुरस्कार  दैनिक आपलं महानगरने पत्रकार नितीन बिनेकर यांना   महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगेसह   आमदार भाई जगताप  यांच्या हस्ते पुरस्कार देऊन  गौरविण्यात आले .    
         समाजाच्या दुःखाशी, वेदनांशी समरस होऊन आपल्या असण्याने, जाणिवेने समाजाचे  प्रश्न सोडवावेत या हेतूने पत्रकारीता करण्याचा निर्णय घेतला असे मत नितीन बिनेकर यांनी व्यक्त केले.
    राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागातून पदवी मिळविल्यानंतर  नितीनने थेट मुंबईत गाठत   चार वर्षांपासून  मुंबईतला प्रवास सुरु झाला.  गेल्या दीड वर्षापासून दैनिक आपलं महानगरने पत्रकार म्हणून काम सुरुवात झाली . यामध्ये एसटी महामंडळ व रेल्वे बीट सांभाळताना . सुरुवातीला अनेक अडचणींना  नितीनला सामोरे जावे लागले. मात्र वरिष्ठांनी, सहकाऱ्यांमुळे  नितीनला  पाठब मिळत त्याचा  हा प्रवास सुंदर झाला .  एसटी अर्थात लाल परिचं आकर्षण लहानपणापासून असल्यामुळे . कित्येकदा एसटीतुन प्रवास करताना छोट्याशा खिडकीतून बाहेर पळणारी झाडं पाहण्याचा आनंद लहानपणी मनमुरादपणे लुटायचा.
           एसटी महामंडळात बातम्या  शोधत असताना नेहमीच कामगार संघटनाबरोबर संपर्क येऊन  दीड वर्षात एसटीविषयी बऱ्याच विषयावर बातम्या करीत  कर्मचाऱ्याच्या तसेच एसटीच्या समस्या शासनाच्या निदर्शनात आणून दिले. 

अवघ्या महाराष्ट्राला जोडण्याचे काम एसटी करते त्यामुळे तिच्याशी आपल जिव्हाळ्याचं नात आहे. कर्तव्यात कसूर न करता निभावलेल्या बातमीदारीमुळे हा पुरस्कार मिळाला. आता पुरस्काराने जबाबदारी वाढली आहे. त्याहून अधिक पत्रकारिता क्षेत्रातील हा माझा पहिला पुरस्कार आहे. हा पुरस्कार मी #दैनिक_आपलं_महानगर आणि तेथील सर्वांना समर्पित करतो. 
     नितीन बिनेकर, पत्रकार , दैनिक आपलं महानगर 

1 comment: