ज्ञानोदय बहुउदेशीय संस्थेचे वाहतूक सुरक्षेवर जनजागृती
नागपूर,ता.४ : वैशाली नगर, मेहन्दीबाग कॉर्नर येथील ज्ञानोदय बहुउदेशीय जनकल्याण संस्था व सॉफ्टपॉईंट कॉम्पुटर इन्स्टीट्युट यांच्या संयुक्त विद्यमाने "वाहतूक सुरक्षा" या विषयावर विशेष कार्यक्रम आयोजनातून नागरिकांनमध्ये जनजागृती करण्यात आली.
देशात वाहतूक नियम न पाऴल्यामुऴे होणारे अपघात कश्या प्रकारे होतात आणि ती संख्या किती भयानक आहे याची जाणीव करून दिली व त्यापासून आपण कसे स्वतःला वाचवू शकतो असे मार्गदर्शन वरिष्ठ पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्षचे अशोक बाघुल यांनी विद्यार्थ्यांनसह नागरिकांना दिले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे ज्ञानोदय बहुउद्देशीय जनकल्याण संस्थेचे अध्यक्ष राहुल वासनिक, वरिष्ठ निरीक्षक अशोक बाघुल, जिल्हा बालविकास अधिकारी मुशताख पठाण, बालविकास प्राधिकरणचे अध्यक्ष राजीव थोरात, दस्तक फौंडेशनचे अध्यक्ष फिरोज खान उपस्थित होते.
कार्यक्रमात सहभागी झालेले विद्यार्थ्यांनी व परिसरातील नागरिकांनी वाहतूक नियम पाऴण्य़ाची प्रतिज्ञा घेतली. या प्रसंगी गणतंत्र दिवसा निमित्त आयोजित ऑनलाईन परीक्षेमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सोहन दुबे यांनी केले. आभार ब.स.पा.चे उत्तर नागपूर प्रभारी कपिल मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाला संकेत सावरकर, उज्ज्वल धानके, अश्विनी सहारे, दिपाक्षी मारावी, संध्या नागदेवे, प्रेरित देशभ्रतार यांचे सहकार्य लाभले.
No comments