Home
/
शिक्षण / आरोग्य
/
महालक्ष्मी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिला "स्पर्श" कुष्ठरोग जनजागृतीचा संदेश
महालक्ष्मी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिला "स्पर्श" कुष्ठरोग जनजागृतीचा संदेश
नागपूर ,ता. ८ : "औषधांची नको दिरंगाई, कुष्ठरोग त्वरेने पळून जाई " , "कुष्ठरोगा विरुद्ध अखेरचे युद्ध" "चला लावूया एकच नारा कुष्ठ मुक्त करूया भारत सारा" अश्या घोष व्याक्यातून विद्यार्थ्यांनी कुष्ठरोगाबद्दल समाज प्रबोधन करीत "स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान" रॅलीतून नागरिकांमध्ये जनजागृतीचा दिला संदेश.
यावेळी उत्तर नागपुरातील पंचशीलनगर येथील स्व.हिराबाई गायकवाड शिक्षण संस्था अंतर्गत संचालित महालक्ष्मी उच्च प्राथमिक विद्यालय आणि राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने "स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान" रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
रॅलीचे राणीदुर्गावती चौक ते वैशाली नगर येथील बोध्द विहार शेवट झाला. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून नागरिकांना कुष्ठरोगा विषयी माहिती दिली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानोबा केंद्रे , कुष्ठरोग वैद्यकीय आरोग्य विभागाचे डॉ. स्नेहल मानकर , राजेश येरकेवार, राजीव देशपांडे, दीपक सालवे, यावेळी शिक्षण संस्थेतील आम्रपाली दहीवाले, नंदकिशोर सवालाखे, अयजुद्दीन झडीये, लेखाश तुषार येसकर सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी रॅलीत सहभागी होते.
महालक्ष्मी विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानोबा केंद्रेसह आरोग्य अधिकारी "स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान रॅलीला हिरवी झंडी दाखवितांना.
महालक्ष्मी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिला "स्पर्श" कुष्ठरोग जनजागृतीचा संदेश
Reviewed by Nilesh Raut : N7 News Voice
on
February 08, 2020
Rating: 5

No comments