 |
नागपूर माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचं सत्कार करतांना मान्यवर |
नागपूर,ता. ७ : काटोल रोड पोलीस लाईन येथील नागपूर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना मेकोसबाग मेथडिस्ट शाळात आयोजित उत्तर विभाग विज्ञान प्रदर्शनीत द्वितीय पुरस्कार प्राप्त झाले.
सौर ऊर्जा वर आधारित पाणी थंड करण्याची आणि वातानुकूलित कूलर सोबत शीतगृह असे बहुउपयोगी मॉडेल्स प्रदर्शनीत नागपूर माध्यमिक शाळेचे जयेश बन्सोड आणि मोईन खान या विध्यार्थ्यांनी तयार करून सादर करण्यात आले. शाळेतील शिक्षक नितिन बर्गे आणि हिरा सहारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जयेश बन्सोड आणि मोईन खान या विद्यार्थ्यांनी द्वितीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मुख्याध्यापक विनोद पूरकाम , सहसचिव राजेश्री जिचकार यांनी शिक्षकांचे आणि विध्यार्थी चे अभिनंदन केले.
 |
उत्तर विभाग विज्ञान प्रदर्शनीत द्वितीय पुरस्कारसह विद्यार्थी जयेश बन्सोड , मोईन खान |
No comments