भारतीय कृषी विद्यालय आणि ज्युनियर काॅलेजचे वार्षिक स्नेहसंम्मेलन उत्साहात
नागपूर,ता. २१ : झिंगाबाई टाकळी येथील अंजनादेवी सभागृहामधे गोपाल एज्युकेशन सोसायटी अंतर्गत संचालित आदर्श प्राथमिक शाळा, राकेश बालवाडी,काशिबाई पन्नासे इंग्लिश स्कूल, भारतीय कृषी विद्यालय व जुनियर काॅलेज यांच्या संयुक्त विद्यामाने वार्षिक स्नेहसंम्मेलन मोठया उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाचे उदघाटन वृंदाताई विकास ठाकरे , गोपाल एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पन्नासे ,उपाध्यक्षा अनुसयाबाई पन्नासे , प्रमुख अतिथी म.न. पा. सत्तापक्षनेता संदीप जाधव ,महिला व बालकल्याण समीतीच्या सभापती संगीता गिऱ्हे , गोपाल एज्युकेशन संस्थेचे संचालक लिलाधरजी डाफ , सचिव राकेश पन्नासे , कोषाध्यक्षा प्रज्ञाताई पन्नासे , समाजसेवक बंडु ठाकरे, दिपक गि-हे, , आशाताई चौधरी, तिर्थराज पन्नासे, अशोकराव भोयर यांच्या हस्ते करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या यशस्वी जिवनासाठी शिक्षण, खेळ , सांस्कृतिक, कार्यक्रमासह त्यांचे आरोग्य जपणे गरजेचे आहे असे मार्गदर्शन विद्यार्थी व पालकांना बाळासाहेब पन्नासे यांनी केले. विद्यार्थ्यांनी रंगमंचावर सांस्कृतिक रंगारंग कार्यक्रमातून आपले कलागुणांना सादर करत प्रेक्षकांची मने जिंकून. यावेळी संस्थेच्या व्यवस्थापिका अनिता पवार यांनी शाळेचा अहवाल सादर केला तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना पन्नासे यांच्या नेतृत्वात व सर्व शिक्षकांच्या सहकार्याने कार्यक्रम संस्मरणीय केला.
कार्यक्रमाचे संचालन पर्यवेक्षिका दिपीका तुपकर यांनी केले , आभार मनोज महल्ले यांनी मानले. यावेळी शिक्षकवृंदसह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments